गावातला ढासळलेला पार
काही वर्षांपूर्वी
कोणतंही गांव हे
आपल्या परीनं परिपूर्ण असतग़ावातील
वाद ,•ाांडणं, तंटे
गावातचं मिटवल्या जातं़ त्यातून
आपसांतील प्रेम,जिव्हाळा कायम
राहत असे़ मदतीची
•ाावना ओतप्रोत असायची़ परक्या
गावांचा डोळा नसायचा़
चोर-उचक्के वचकून
राहतं़ करमणुकीची साधनं आणि
सादरकर्ते गावातचं होते़ सार्वजनिक
उत्सवात गंगासागर, नकला, दिवाळीतील
गवळण, शंकरपट, दुर्गादेवीची
स्थापना, गणेशोत्सव, •ाजन, कीर्तन,
प्रवचन, विविध खेळ, कुस्तीचा
फड आदी कार्यक्रमाचे
आयोजित करण्यात येत़ त्यातून
समाज एकसंघ राहत
असे़ परस्परांत स्नेह•ाावाची •ाावना राही़
गावातील मुख्य चौकात
किंवा चावडीसमोर हा
कार्यक्रम होईक़धीकधी मारुतीच्या पाराचीही
निवड होत असे़
हा पार
म्हणजे गावाचा प्राण असे़
हा पार कधी
रिकामा असलेला योग फार
कमी येई़अगदी सकाळपासून ते उत्तर
रात्रीपर्यंत हा पार
गजबजलेला असे़ उन्हाळ्याच्या
दिवसांत अनेकजण याठिकाणी रात्रीच्या
वेळी झोपत असे़
दिवसा तर अंग
टाकणारी व्यक्ती चांगलीच झोप
काढत असे़ कारण
त्याच्या बाजूलाच कडुलिंबाचे •ाले
मोठे झाड होते़
त्याची सावली
संपूर्ण पारावर पडे़ त्यामुळे
त्या झाडाचे एकप्रकारे छप्परच तयार
होई़ एखादा व्यक्ती
जर आपल्या घरी
न दिसला तर तो
पारावर हमखास गवसत असे़
कोणतीही चर्चा या पाराच्या
साक्षीशिवाय पूर्ण होत नसे़
या जागेने अनेक
महत्त्वाच्या घटना बघितल्या
असतात़ कुणाच्या वावरातील धुºयावरील बा•ाळीचं
झाडं तोडल्याचं प्रकरण
असो, की कुणाच्या
मारामारीची गोष्ट असो़ अशा
कितीतरी ‘केसेस’ आपोआप सुटल्या
जात, ते या
पारावर! कित्येक घटनांचा तो
मूक साक्षीदार असे़ एखादा
व्यक्ती जर आपल्या
घरी न दिसला
तर तो पारावर
हमखास गवसत असे़
कोणतीही चर्चा या पाराच्या
साक्षीशिवाय पूर्ण होत नसे़
या जागेने अनेक
महत्त्वाच्या घटना बघितल्या
असतात़ कुणाच्या वावरातील धुºयावरील बा•ाळीचं
झाडं तोडल्याचं प्रकरण
असो, मारामारीची गोष्ट
असो अशा कितीतरी
‘केसेस’ आपोआप सुटल्या जात,
ते या पारावर!
कित्येक घटनांचा तो मूक
साक्षीदार असे़
एखादा आजोबा तिथं
जमलेल्या पोराटोरांना कथा सांगायचा,
त्यावेळी पारावरील लहानच काय
मोठी माणसेही कान
टवकारून ऐकत असे़
आमच्या बेंबळा नदीला आलेला
पूर आम्ही मारुतीच्या
पारावरूनच बघायचो़ यावेळी म्हातारीकोतारी
आपल्या जमान्यातील पुराचे तंतोतंत
कथन करीत असे़
जणू तो पूर
आपण अनु•ावतोय,
असा •ाास होत़
पाराचे सण, उत्सवातही
मोठं योगदान असे़
हनुमान जयंती, पोळा, •ाजन
असे किती तरी
धार्मिक कार्यक्रम त्याठिकाणी साजरे
होत़ लग्नाच्या अगोदर
नवरदेव याच
पारावरील मारुतीचं दर्शन घेत
असे़ अनेकजणांच्या गप्पाटप्पा
येथेच रंगत़ सुखदु:खाची चर्चा
होत़ कधीकधी बायकाही
येऊन बसत़ हिवाच्या
दिवसांत तर हा
पार फुल्ल राहत असे़
हनुमान मंदिराजवळच्या घरातील बायका तुरीच्या
शेंगांचे दाणे काढण्यासाठी
घोळक्यांनी बसत़ कुणी
कुणी आपल्या घरचे
धान्यही वाळवायला घालत असे़
आता टीव्हीच्या
जमान्यात गावातील अनेकजण मालिकांच्या
रगाड्यात रंगला आहे़ बसस्थानकावरील
पानठेल्याच्या संगतीत तंबाखू, गुटख्याची
चव घेत आणि
बिडी-सिगारेटच्या झुरक्यात
पाराला ‘पार’ विसरला
आहे़ तरुण पिढी
मोबाईलच्या ‘गेम’ मध्ये
व्यस्त असून त्याला
आता पारावरील गप्पात
अजिबात रस नाही़
मोबाईलवर तासन्तास फालतू बोलण्यात
वेळ घालवत असल्याचे
चित्र दिसून येते़
म्हतारी-कोतारीही चष्म्याच्या दांडी
सां•ााळत टीव्हीसमोर
नातवांना खेळवत असतात़ तर
गावातील काही टपोरी
पोरं पारावर ‘गंजिब्या’ची पत्ते
कुटताना दिसतात़ नाही म्हणायला
गावातील दोन-चार
कुत्री पेंगुळलेली दिसून येतात़
कधी एखादा गाढवही
त्याठिकाणी उ•ाा
राहून उगीचच •ोकत
असतो़ आता तिथं
गप्पा रंगत नाही़
आता कोणत्याही कार्यक्रमासाठी
खास स्टेज तयार करण्यात
येतो़ कित्येक उन्हाळे,
पावसाळे अंगावर झेललेला हा
पार आता एकाकीपण
•ाोगत आहे़ मनाने
‘पार’ ढासळला असून
•ाकास दिसत आहे
© संजय मुंदलकर