Wednesday, 22 November 2023

SAANJANTANOO वेदना सरल्या नाही ...






वेदना सरल्या नाही


तू दिल्या वेदना सरल्या नाही

                     तुझ्यासवे चाफा कधी फुलला नाही


चंद्रही लोपला, कुणी न सोबती

कशी जपावी या चांदण्यांशी नाती

श्वास कधी हा बहरला नाही


जरी फाटले आभाळ पेलेन सारे 

गाईन मग मी सूर मिलनाचे

खेळ हा सखे गं नित्याचा नाही



संजय मुंदलकर 

गीतकार : सावरू कशी ...(अल्बम)

यू ट्यूब : नूतन्स म्युझिक डॉट