त्याला आणि तुलाही मी प्रत्यक्ष बघितलं नाही़ कुठल्या दिव्यदृष्टीनं बघतो तुला, अनुभवतो तुझं अस्तित्व? कां करतोय ओढल्या जातोय मी तुझ्याकडं? माझ्या प्रेमात आसक्ती आहे. वासना नक्कीच नाही़ निर्व्याज्य प्रेम करतोय मी तुझ्यावर आणि त्यासाठी कुठलाही त्याग करायची तयारी माझी!
file photo ‘‘हा सगळा खेळ तुच खेळलास़ स्वार्थाचा गोचिड अजूनही पोसतेस आपल्या मनावर! आणि हे जे तू, माझं वन केलं...माझं वन केलं म्हणून आव आणतेस ना, सब नाटक है...सब्ब नाटक! आपल्या पोटच्या पोराचं स्वत:पेक्षा हजारपटीनं नुकसान केलंस़ नाकारणार हे सर्व ? आणि कसं? कुठला पुरावा आहे. अगं, समाजाचं सोड... तू आपल्या अंर्तमनाला तरी पुरावा देऊ शकतेस का?’’
नित्या केवळ हुंदके देत होती. निर्भय शब्दांच्या अस्त्र-शस्त्रांनी अगदी तुटून पडला.
‘‘ज्या वयात त्याला आई हवी होती, त्यावेळी कुणाच्या तरी संसारात मग्न होतीस़.. स्वार्थात मग्न होतीस ... स्पष्ट सांगायचं तर वासनेत तुडुंब होतीस. हे सर्व स्वीकारलसं आणि त्या लहानग्याचं मन धिक्कारलं? हेही तुला माहिती होतं, की त्याला वडील नाहीत आणि तू दहा-अकरा वर्षांच्या चिमुकल्यास आपल्या नणंदेच्या पदराआड लपवलं!’’
‘‘हो हो ... मी चुकलेचं...त्यावेळी परिस्थितीच तशी होती; पण मी हे सर्व वासनेसाठी केलं नाही. मी खोटं बोलत नाही. माझ्या घरातील लोकांनीच ही परिस्थिती जाणीवपूर्वक ढकलली माझ्यावर.’’
‘‘खोटं, साफ खोटं ... परिस्थिती तशी नव्हती, तर तसं ढोंग केलसं तू. काय होतं वय त्याचं आणि कोणती समज होती त्याला! आपली आई दुसºया कुण्या पप्पाजवळ राहायला गेली, हे त्यानं स्वीकारलं, असं समजतेस का तू? किती उन्हाळे-पावसाळे झेलले होते त्यानं? तुझ्यापासून दूर झाल्यानं त्याच्या मनावर जे काही ओरखडे पडले, ते नक्कीच पुसले जाणार नाहीत़, कदापिही नाही. ते व्रण आजन्म पुरेल त्याला.’’
नित्या काय बोलणार आणि कसं! सत्यता नाकारू शकणार नव्हतीच. आयुष्य आणखी एक वळण घेऊ पाहत होती. आपल्यावर आत्यंतिक प्रेम करणारा हा माणूस कुठून आणि कसा आपल्या आयुष्यात आला, हे आकलनही तिला होईना.
‘‘नित्या, माझा निरजवर तेवढा अधिकार नाही, जितका तुझा आहे.तुझ्या उदरातून जन्म घेतलायं त्यानं. त्याची नाळ तुझ्याशी अधिक जुळलीयं. मी खूप पे्रम करतोय त्याच्यावर आणि तुझ्यावरही आणि हे सर्व जाणतेस, अनुभवतेस तू़. त्याला आणि तुलाही मी प्रत्यक्ष बघितलं नाही़ मात्र, कुठल्या तरी दिव्यदृष्टीनं बघतो तुला, अनुभवतो तुझं अस्तित्व़ कां ओढल्या जातोय मी तुझ्याकडं? प्रेमात आसक्ती आहे. वासना नक्कीच नाही़ निर्व्याज्य प्रेम करतोय मी तुझ्यावर आणि त्यासाठी कुठलाही त्याग करायची तयारी माझी! कुठल्या बंधनांनं एकत्र आणलंय आपल्याला. कुठल्या परिस्थितीनं जुळलोयं तुझ्याशी? नियतीनं आणखी कुणी नाही आणि तुलाच कसं माझ्या आयुष्यात आणलं, तेही अशा स्थितीत की जिथं वाटा तर दिसताहेत; पण चालता येत नाही...
file photo नित्या स्तब्ध ऐकत होती.
‘‘प्रेमव्यासंगी मानव आहे मी़ तुझ्यासारख्या विवाहितेवर प्रेम जडले. काय चूक त्यात? मी चोर नाही़ कुणाचं घर फोडलं नाही, कुणाला लुटलं नाही, ‘ओटीपी’ मागून फसवणूक केली नाही. मी कदाचित पत्रकार म्हणून समाजाप्रति अधिक संवेदनशिल आहे, हे नक्कीच़ कारण मी समाजाचा अभ्यास करतो, त्याला अनुभवतो़ लोकांच्या अडचणीतून माना काढतोयं़ रस्त्यांवर संताप पाहतोय़ हाता-तोंडाशी मोठ्या कठीण परिस्थितीत गाठ भेट होणारी माणसं पाहतोय़अशा लोकांवर प्रेम करणं मी का नाकारावं? आणि त्या धाग्यातील तू सुद्धा एक. कुणावर प्रेम करणं हा गुन्हा कसा ठरावा आणि कुणी ठरवावा?’’
‘‘...याबाबत मला काहीही सांगता येणार नाही; पण मी त्यांच्या घरात गुदमरतेयं इतकंच मला सांगायचं... तिथं नाही राहू शकणार मी! माझ्या आणि माझ्या बाळाच्या आयुष्याला दिशा देणार ते तुम्हीच, इतकंच बोलू शकते.’’ नित्या बोलली.
file photo नक्कीच नात्यांमध्ये वेगवेगळी वळणं येऊ लागली होती. निर्भय आता नित्या आणि निरजमध्ये पूर्णपणे गुंतला होता. या प्रसंगापासून निशा आणि निहारिका अजाण असल्या तरी नित्या, निर्भयच्या त्यांच्याशी असलेल्या नात्याबाबत अवगत होती़ निर्भय एका मुलीचा बाप आहे, ही जाणीव सुद्धा तिला होती. दोन बाजू निर्भयपर्यंत पोहोचत होत्या़ त्यांच्यात त्रिकोण नव्हता, हे ही सत्य होतं; परंतु त्या पाचजणांचं भविष्य कसं असेल, हे आजच्या घडीला कुणालाही सांगता येणं शक्य नव्हतं, अगदी नियतीला सुद्धा नाही...
Friday, 24 March 2023
NAVANTIKA ... SANJAY MUNDALKAR STORY त्या धाग्यातील तू सुद्धा एक, मग कुणावर प्रेम करणं हा गुन्हा कसा ठरावा आणि कुणी ठरवावा? भाग ३
Monday, 6 March 2023
NAVANTIKA ... SANJAY MUNDALKAR STORY जगावर मी प्रेम करतोय... पण माझं कोण...कोण माझं? ...... भाग २
‘‘या सगळ्या बाबींसाठी मानवी संवेदना असावी लागते. दुसºयांच्या मनाचा तळ गाठण्याची सवय असावी लागते़ इथं तर आपण स्वार्थ नावाच्या कोषातच बंदिस्त आहोत. कुठून कळणार दुसºयांचं शल्य...? कारण ते टोच्चकं...बोच्चकं?
Wednesday, 15 February 2023
NAVANTIKA ... SANJAY MUNDALKAR STORY एखाद्यावर प्रेम करणे म्हणजे प्रामाणिक मनानं देवाची प्रार्थना करण्यासारखं आहे. भाग १
सहा महिने नव्हे तर चक्क दोन वर्षांच्या कालावधीत त्यांच्यात केवळ संवाद व्हायचा. चेहरा बघितलाच नाही. छायाचित्रातून तो पाहण्यात आला. तिला भेटण्याचा क्षण आला नाही, असेही नाही. तिच्यासोबतच्या बोलण्यातून तिचं सर्वांग मन निर्भय अनुभवायचा़ तिचा कण कण प्रत्यक्ष रूपात भासायचा, श्वास न श्वास, रंग आणि गंध तो प्राशून घ्यायचा.
माणसाच्या मनात प्रेम काठोकाठ भरून जाते, तेव्हा स्वाथार्साठी कणभरही जागा उरत नाही. प्रेम ही समर्पणाची, त्यागाची भावना. म्हणूनच आपण प्रिय व्यक्तिला आनंदी बघण्यासाठी काहीतरी मार्ग शोधत राहतो. कुणीतरी म्हटलंय, एखाद्यावर प्रेम करणे म्हणजे प्रामाणिक मनानं देवाची प्रार्थना करण्यासारखं आहे. प्रेम हे सुखाचं घर, आगर आहे. प्रेमाचा खरा अर्थ जीवऩ त्याशिवाय कुणीही जगणं, श्वास घेणं अशक्य आहे.
निर्भयच्या प्रेमाची गाथाच वेगळी़़़ साधारणपणे कुणी एकानं वा कुणी एकीनं त्याला किंवा तिला पहिल्या नजरेनं पाहिल्यास प्रेम होऊन बसते़ जीव जडतो़... कासावीस होतो. निर्भयनं तर तिला बघितलंच नाही़ महिना, सहा महिने नव्हे तर चक्क दोन वर्षांच्या कालावधीत त्यांच्यात केवळ संवाद व्हायचा. चेहरा बघितलाच नाही. छायाचित्रातून तो पाहण्यात आला. तिला भेटण्याचा क्षण आला नाही, असेही नाही. नियतीनं नित्या आणि निर्भयला दोन ते तीन फुटांपर्यंत समोरासमोर आणले सुद्धा; परंतु तो तिचा चेहरा बघू शकला नाही़
तिच्यासोबतच्या बोलण्यातून तिचं सर्वांग मन निर्भय अनुभवायचा़ तिचा कण कण प्रत्यक्ष रूपात भासायचा, श्वास न श्वास, रंग आणि गंध तो प्राशून घ्यायचा. ‘ती खूप सुंदर आहे. तिच्या चेहºयावर भाळलो’, असा सर्वसामान्याचा अनुभव त्याला आला नाही. तरीही प्रेम होऊन बसले, अगदी निस्सिम! नित्या तिचं नाव.
| file photo |
...काळ असा पुढं सरकत गेला की, निर्भयनं नित्या आणि निरजला स्वीकारलं. या दोघांच्या जोडीला निधी आणि निहारिका अशा दोघी दुसºया बाजूला होत्या. ही चौघे एकत्र बंधनात आली, तेव्हा यातील दोघींची मनं कोसळली. त्यांना वाळवंटात उभं असल्याचा भास झाला़
नित्या आणि निरज मात्र स्थितप्रज्ञ होते, त्यांना निश्चितच हिरवळीची गरज होती. आधाराची, प्रीतीची गरज होती. निर्भय तर अशा परिस्थितीतून तावून सुलाखून निघाला होता. भविष्यातील वावटळ, वादळांबद्दल त्याला अगोदरच जाण होती. त्यामुळं तो या चौघांना घट्ट धरून होता. निरज रक्ताचा नसूनही त्याला प्राणप्रिय होता आणि रक्तातून जन्मलेली निहारिका त्याचा जीव की प्राण होती ..
लेखक : संजय मुंदलकर
कथा : नवंतिका
जिथं प्रेम हाच देव्हारा ...
ही कथा सलग नाही
छायाचित्र प्रतिकात्मक
(सर्वाधिकार सुरक्षित)