कारकुनी •ाार
मागीलवर्षी संपूर्ण देशात शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली़ त्यानंतर प्रचलित मूल्यमापन पद्धतीमधील दोष दूर करून सातत्याने सर्वकष शिक्षण ही नावीण्यपूर्ण मूल्यमापन पद्धती इयत्ता पहिली ते आठवीकरिता चालू शैक्षणिक सत्रात सुरू झाली. मात्र, प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना बालकांमधील विविध बदलांच्या नोंदी घेणे बाध्य असल्याने शाळा आता ‘कार्यालय’ बनले असून शिक्षकांवर कारकुनाचा •ाार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सन १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सातत्यपूर्व सर्वकष मूल्यमापन पद्धतीचा आग्रह धरण्यात आला असून त्यात मुलांना वाचायला, लिहायला येण्यासोबतच त्यांना उत्तम बोलता यावे, चांगले खेळणे, परिसरातील घटकांचे निरीक्षण करून ज्ञान मिळावे, हाताने विविध काम करणे, दैनिक नोंदी ठेवण्याच्या कामी शाळा व शिक्षक पूर्णत: गुंतल्याने शिक्षकांचा पूर्णपणे कारकून झाला आहे. दिवस•ाराच्या नोंदी नोंदवहीत ठेवण्यात शिक्षकांचा सर्वाधिक वेळ जात असल्याने वर्गातील शिकविण्याकडे व शाळेत अध्यापनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी पालकवर्गामधून होत आहे.
पालकांना आपल्या मुलाची परीक्षा व्हावी,असे वाटते. पूर्वी तिमाही सहामाही व वार्षिक होत असत. त्या मनावर कायम असल्याने तो परीक्षाबांबत आग्रही असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे शिक्षणप्रक्रि येत झालेला बदल पालकांपर्यत पोहचला नसल्याने शाळेत सध्या सुरू असल्याचे प्रकारच्या बाबतीत पालकवर्ग अद्यापही साशंक आहे. या प्रक्रियेत काम करणाºया बहुतांश शिक्षकांचे पुरेशे प्रशिक्षण झाले नसल्याने नवीन मूल्यमापन प्रक्रियेबद्दल संशयी वातावरण प्रथम सत्र आटोपल्यानंतर अधिक संशयपूर्ण झाले असल्याचे दिसून येत आहे. या प्रक्रियेतील वरिष्ठांनी लगेच याची दखल न घेतल्यास शिक्षक व शाळांना पालकांच्या रोषाला नाहकच बळी पडावे लागेल.
***
‘श्रेणीपत्रिका’
मागील वर्षापर्यंत इयत्ता आठवीपावेतो विद्यार्थ्यांना ‘गुणपत्रिका’ मिळत होती़ २०१०-११ या शैक्षणिक वर्षात मात्र ‘श्रेणीपत्रिका’ मिळाली आहे़ ‘अ-१’,‘ ब-१’ आदी प्रकारातून ९१ ते १०० टक्के, ८१ ते ९० टक्के आदी श्रेणींचा प्रसाद वाटण्यात आला आहे़ तरीही यातून ठोस असा आकडा मिळत नाही़ आपण वर्ष•ार केलेल्या अ•यासाचा परिणाम कसा मिळाला, हा प्रकार विद्यार्थी आणि पालकांना दिसून येत नाही़ एखाद्या विषयात मिळविलेले गुण किती हे कळल्याशिवाय विद्यार्थी त्या विषयात अधिक मेहनत घेणार कसा? किंवा त्यात विशेष प्राविण्य मिळवायचे असल्यास त्याला आपण कितपत ‘मजल ’ गाठायला हवी, हे समजणार कसे? एकीकडे शासनाने त्यांना अनुत्तीर्ण न करता पुढील वर्गात ‘ढकलण्याचा’ उपक्रम राबविला आहे़ मग हे श्रेणीचे बुजगावणे कशासाठी ? विद्यार्थी वर्गात काय करतो, हे त्याच्याकडे टक लावून बसणारा शिक्षक अ•यासातील त्याची श्रेणी ठरविणार कसा? केवळ ‘श्रेणीपत्रिके’ त अमुक एका विषयाकडे लक्ष द्या,असा शेरा मारून तो विषय सुधारणार कधी?
‘अ’ नावाच्या विद्यार्थ्याला दुसºया सत्रात गणित विषयात कमी गुण मिळाल़े ‘श्रेणीपत्रिके’ त ‘श्रेणी’ तील टक्केवारी दर्शवून आणि सदर विषयाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद करून तो विषय सुधारण्याकडे लक्ष देणार कधी? आणि विद्यार्थ्याला केवळ पुढील वर्गांत ढकल्याचा उपक्रम असल्याने तो विषय सुधारण्याची मनाची तयारी होईल काय? हा प्रश्न सुद्धा अनुत्तरित आहेच़
लेखक-संपादन
संजय इस्तारी मुंदलकर
[ SANJAY MUNDALKAR ]
टीप : सदर ‘अभ्यासवृत्ती कुठे?’ [ ABHYASUVRUTTI KUTHE ] हा शैक्षणिक अहवाल इयत्ता आठवीपर्यंत परीक्षा नाहीत, या मुद्यावर सन २०१०-११ मध्ये तयार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे तत्कालिन शालेय शिक्षण मंत्री श्री. राजेंद्र दर्डा यांना औरंगाबाद येथे २१ नोव्हेंबर २०११ रोजी सादर केला.
छायाचित्र केवळ विषयानुरुप वापरण्यात आले असून, प्रतिकात्मक
(सर्वाधिकार सुरक्षित)