Friday, 25 May 2018

शिक्षण हक्क २००९ : अभ्यासवृत्ती कुठे? भाग २

  इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याना ‘प्रमोशन’

शासन परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा वि•ााग/पत्र क्रमांक २९२/प्राशि/ दि़ १० मे २०१० अन्वये दिनांक १ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आलेले आहे, त्यानुसार इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही मंडळाची परीक्षा द्यावी लागणार नाही़ संदर्•ााधीन दिनांक १६ जून २०१० च्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे व त्यांची संपादणूक पातळी वाढविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले़.


महाराष्ट्र राज्याच्या निर्णयानुसार इयत्ता आठवीपर्यंत आपली मुले अनुत्तीर्ण होणार नाहीत, असे कळल्यावर तर अनेक पालकांना ती कसा अ•यास करतील, असा प्रश्न पडलेला दिसून येतो़ उत्तीर्ण-अनुत्तीर्णचा प्रकार नसेल तर कुठलीही परीक्षा कशासाठी? आणि परीक्षा नसेल तर अ•यास कशासाठी ? आणि अ•यास नसेल तर शाळा कशासाठी ? अशा प्रश्नांची ‘मारुतीशेपटी’ निर्माण होणे साहजिकच आहे़

मात्र, तुर्तास राज्याच्या शिक्षण खात्याने शाळांसाठी ठरवून दिलेली पद्धत समजून घेणे गरजेचे आहे़ इयत्ता आठवीपर्यंत मुलांच्या वर्ष•ारात ३०० ऐवजी २००गुणांसाठी संकलित / सर्वकष आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन होणार आहे़ यात केवळ पुस्तकातील वाचलेले कितपत लक्षात ठेवले आणि उत्तरपत्रिकेत किती लिहिले, यावर आधारित असणार नाही, तर वर्गात शिकलेले, वाचलेले समजले का? त्यावर विचार करता येतो का? केलेला विचार तोंडी, लेखी सांगता/ लिहिता येतो का? केलेला विचार वागण्यात आलाय का? खरे बोलणे, मोठ्यांचा आदर राखणे यावर उत्तम निबंध लिहितो; प्रत्यक्षात मात्र त्याच्या उलट वागत असेल तर खºया अर्थाने पुस्तकामधल्या धड्यातील चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या, असे म्हणता येणार नाही़ त्यामुळे मुलांच्या शाळेतील वर्तनाचे निरीक्षण करून शिक्षकांनी त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या नोंदी ठेवणे आणि एवढेच नव्हे तर त्याला गुण देणे अपेक्षित आहे़ मुलाचे वर्गातील काम, ते करताना त्याने केलेले प्रयत्न, इतरांना केलेले सहकार्य, त्यात दिसून येणारी त्याची जिज्ञासूवृत्ती,चिकित्सकपणा, चिकाटी यावरून सदर निरीक्षणे करणे गरजेचे आहेत़ वर्ष•ारात प्रत्येक इयत्तेत त्याने एक प्रकल्प करायचा आहे़ इयत्तेनुसार त्याने विषय आणि स्वरूप निवडण्यास शिक्षक मदत आणि मार्गदर्शन करणार आहेत़ त्याविषयीची माहिती गोळा करणे, ती लिहिणे, त्यावर स्वत:चे मत मांडणे हे सर्व मुलांनी करावयाचे आहे़ यामधून त्याला स्वत:चे काम स्वत: जबाबदारीने पूर्ण करण्याची सवय लागणे अपेक्षित आहे़

थोडक्यात, ‘सातत्यपूर्ण मूल्यमापन’ म्हणजे वर्ष•ार सतत केलेले मूल्यमापन होय़ प्रत्येक क्षणी मुलाच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण करून त्याच्या अडचणींचा शोध घेवून त्याला वेळच्या वेळी मार्गदर्शन केले जाणार आहे़ यासाठी शिक्षकांना ज्यादाचा वेळ देवून कष्टही घ्यावे लागणार आहे़

दुसºया औपचारिक पद्धतीत स्वाध्याय, वर्गपाठ, गृहपाठ, प्रात्यक्षिक, गटकार्य या सगळ्या गोष्टीत वर्ष•ारातील मुलाचे काम पाहून त्याच्या नोंदी करून त्याला ‘आकारिक मूल्यमापना’ साठी असलेले गुण दिले जातील़ आकारिक याचा अर्थ विद्यार्थ्यांचे व्यक्तित्व आकार घेत असताना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन होय़

प्रत्येक विषयातील मुलाच्या प्रगतीचे शाब्दिक वर्णन, त्यावरून या विषयात मुलाला काय येते व कोणत्या बाबी अजून सुधारण्याची गरज आहे, हे मुलाला, त्याच्या पालकांना व पुढील इयत्तेच्या शिक्षकांना समजणार आहे़ पूर्वी सारखे प्रथम, दुसरा असा गुणक्रमांक असणार नाहीत़ सर्व विषयांची मिळून एकत्रित श्रेणीही असणार नाही़ एका प्रश्नपंित्रकेत ८५ गुण मिळविणारा मुलगा ८४ गुण मिळविणाºया मुलापेक्षा अधिक हुशार आहे, असे समजण्यात धोका आणि अन्यायही आहे़

तात्पर्य, परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे मुलांना घोकंपट्टी करून लिहिता येणार नाही, तर समजले किती? त्यावर किती विचार केला? हे तपासले जाणार आहे़ त्यासाठी ‘ओपन एन्डेड’, पुस्तकासह परीक्षा या दोन नव्या बाबी असणार आहे़ उदा़ पूर्वी इयत्ता पहिलीच्या अंकगणिताच्या प्रश्नपत्रिकेत ६ अधिक ३ बरोबर किती किंवा एक अधिक आठ बरोबर किती, असे प्रश्न असत़ आता मात्र ९ ही बेरीज येण्याकरिता कोणते दोन अंक घ्यावे लागतील, अशा स्वरूपाचे प्रश्न असतील़ तसेच, कागद आणि लोखंडापासून बनवलेल्या कोणत्या वस्तू तुमच्या घरात आहेत ? असे विचारांना चालना देणारे प्रश्न राहणार आहेत़


लेखक-संपादन

संजय इस्तारी मुंदलकर


टीप : सदर ‘अभ्यासवृत्ती कुठे?’ हा शैक्षणिक अहवाल इयत्ता आठवीपर्यंत परीक्षा नाहीत, या मुद्यावर सन २०१०-११ मध्ये तयार करण्यात आला.  महाराष्ट्र राज्याचे तत्कालिन शालेय शिक्षण मंत्री श्री. राजेंद्र दर्डा यांना औरंगाबाद येथे २१ नोव्हेंबर २०११ रोजी सादर केला.


(सर्वाधिकार सुरक्षित)