लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. केवळ ११ जुलैला लोकसंख्यावर चिंता आणि चिंतन करून चालणार नाही. लोकसंख्यामुळे निर्माण झालेल्या समस्या पदोपदी आणि क्षणोक्षणी प्रत्येकाला भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे दररोज त्याविषयी विचारमंथन, जनजागृतीपेक्षा प्रत्यक्ष कृतीची गरज निर्माण झाली आहे.
प्रसंग १ : लहानपणी आई केसाला फक्त तेलाचं बोट लाव, असं सांगायची. आम्हाला मात्र मोठ्या अनिच्छेनं केलेल्या आंघोळीनंतर केसांना चिप...चिप करायची सवय होती. त्यामुळं हा प्रकार आईच्या लक्षात आला की, कधी कधी तिच्या हातचा धपाटा बसायचाच बसायचा! मात्र, आई फक्त तेलाचं बोटच लाव, असं का म्हणते, हे काही अजूनही समजलंं नाही.
प्रसंग २ : एकदा आई जेवताना म्हणाली होती, की भाजी ‘लव लव’ खा. असं ती अनेकदा म्हणायची. यातून हा जेवायचा, तो जेवायचायं, असं तिला सूचवायचं असे. ‘लव लव’ खा, या वाक्याचा अर्थ तिला भाजीला भाकर ही ‘लावून लावून’ खा अर्थात भाजी थोडी खा. जेवणारी मंडळी बाकी आहे, असं काहीसं सांगण्याचा तिचा हेतू असायचा; पण आईच्या बोलण्यातून येणाºया तेवढ्या दोन-चार वाक्याचा अर्थ समजायला आम्हाला अर्ध आयुष्य लागलं.
प्रसंग ३ : तिदस्ताच्या दिवाळीपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये पेट्रोलचे भाव शंभरीच्या आसपास पोहोचले होते. तो ८२ रुपयांवर अनेकदा टांगता राहिला़ आज काल ८० रुपयांच्या आसपास झुलता असतो. सांगायचे हे की पेट्रोल महाग झाले तरी दुचाकी वा तत्सम वाहने वापरणाºयांची संख्या कमी झालेली नाही़़़होणारही नाही. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने महागाईची झळ नको तितकी सोसावी लागत असली तरी भारतवासी ज्याप्रमाणे नेटपँक कितीही महाग झाला तरी मोबाईलचा वापर करणे सोडणार नाही, त्याचप्रमाणे वाहन विकत घेणे आणि त्याला रस्त्यावर दौडवणे (चालवणे) सोडणार नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. अर्थातच आजच्या अर्थपूर्ण आर्थिक घडीला मागणी तसा पुरवठा होण्याची स्थिती नाहीच मुळी...कारण लोकसंख्या...

सांगायचं असे की १९ व्या आणि २० व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मोठ्या बदलामुळे अर्थात विविध संशोधनामुळे जगाचा जन्मदर वाढला. यात मनुष्याचे आयुर्मान वाढले असले तरी तीव्र गतीच्या लोकसंख्यावाढीमुळे अन्नधान्य, निवारा, बेकारी, गरिबी, गुन्हेगारी यासारख्या अनेक समस्या आ वासून उभ्या राहिल्या. विकासाच्या प्रत्येक टप्प्यात प्रगती साधली असली तरी आता कोणत्याही क्षेत्रातील विकासाला ही अवाढव्य लोकसंख्या मुख्य अडथळा ठरला आहे, याकडे दुर्लक्ष करता येत नाही.ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासन आणि प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असले तरी आपली, समाजाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
जगाची ऐशोआरामाची वृत्ती वाढली. दुचाकी, चारचाकी वाहनांची गरज सरली; पण शौक निर्माण झाला. कुठलीही गरज नसताना महागडे मोबाईल हाती आले. सर्व आयुष्य आँनलाईन झाले. कुणालाही वेळ राहिला नाही़ संवाद संपला. सुख-दु:खाची विचारणा संपली़ महिला, बालकांवरील अत्याचार वाढले आणि अधोगती सुरू झाली.
जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक लोकसंख्यादिन साजरा करण्यात येतो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. केवळ ११ जुलैला लोकसंख्यावर चिंता आणि चिंतन करून चालणार नाही. लोकसंख्यामुळे निर्माण झालेल्या समस्या पदोपदी आणि क्षणोक्षणी प्रत्येकाला भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे दररोज त्याविषयी विचारमंथन, जनजागृतीपेक्षा प्रत्यक्ष कृतीची गरज निर्माण झाली आहे.
श्वास तुटत चालला
लोकसंख्यावाढीने केवळ खाण्यापिण्याच्याच समस्या निर्माण झाल्या नाहीत, तर जमिनीतील पाणी संपतेय, प्रदूषण इतके वाढले की हवेतील प्राणवायू संपतोय, दुष्काळ पडतोय, महापूर येतोय, सूर्याचं तापमान वाढतेय, हे सर्व एका दिवशी झालेले नाही, तर मागील अनेक वर्षापासून तीळतीळ सुरू आहे आणि त्यातूनच मानवाचा श्वास तुटत चालला आहे. परिणामी मोठ्या समस्या निर्माण झाल्याने विकासकामे जागच्या जागी थांबली. लोकांना मूलभूत सुविधाही मिळेनाशा झाल्या. मुलगाच हवा म्हणून तीन-चार अपत्यांना जन्म दिला जातो. अशिक्षित असो शिक्षित लोकसंख्यावाढीच्या परिणामाची चिंता कुणातही दिसून येत नाही. यावाढीमुळेच समाजात विसंगत आर्थिक स्थिती निर्माण झाली. आजच्या घडीला एकीकडे एका घरात सरासरी चार-चार दुचाकी गाड्या आणि एक चारचाकी वाहन, प्रशस्त महागडे घर आणि आधुनिक सुविधा दिसून येत आहे, तर दुसरीकडे बेरोजगारी, गरिबी, एक वेळच्या भुकेसाठीही अन्न मिळत नाही, भीक मागण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे, हे विरोधी चित्र अनुभवास येते. ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणाचा उपाय होता़ मात्र, ती वेळही कधीचीच निसटून गेली आहे. आता ओढूनताणून केलेल्या उपायांचा परिणाम तत्काळ दिसून येणार नाही. त्यासाठी पुढील १०० वर्षे वाट पाहावी लागेल, असे तज्ज्ञ सांगतात़ ते सर्व पाहायला आम्ही असू की नाही, शंका आहे. तितकीच शंका या जगाच्या अस्तित्वाबाबतची आहे.© संजय इस्तारी मुंदलकर