Tuesday, 4 July 2023

‘चित्रपती’ शांताराम

शांताराम बापूंना चित्रपट माध्यमाची भाषा उत्तमपणे अवगत होती. माध्यमांवर त्यांची जबरदस्त पकड होती. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माता-निर्देशक-नट चार्ली चॅप्लिन यांनी  सुद्धा शांताराम बापू यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले होते. शांताराम बापूंना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य प्र. के. अत्रेंनी शांताराम  बापूंना  ‘चित्रपती’ ही पदवी दिली.


 शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपटांतील सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेले नाव. शांताराम बापू  या नावाने ते ओळखले जात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत  त्यांनी आपला खोल  ठसा उमटवला. दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना त्यांनी पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत वापरल्या. जवळजवळ साठ वर्षे  ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. 

शांताराम बापूंचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ रोजी कोल्हापूर येथील एका सुखवस्तू घरात झाला. त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती कोल्हापुरातील बाबुराव पेंटर यांच्या मालकीच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीपासून. कंपनीत पडेल ते काम करता करता १९२१ साली निर्माण झालेल्या एका मूकपटात छोटीशी भूमिका केली. येथून त्यांची घोडदौड सुरू झाली. चित्रपट निर्मितीचे मर्म आत्मसात करीत ते भराभर पुढे जात राहिले. १९२५ साली निर्माण झालेल्या ‘सावकारी पाश’चित्रपटात त्यांनी तरुण शेतकºयाची भूमिका केली. १९२७ साली त्यांनी ‘नेताजी पालकर’हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला.



बाबूराव पेंटर यांच्याकडे नऊ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी श्री. दामले, श्री. फत्तेलाल, श्री. धायबर आणि श्री. कुलकर्णी यांच्या भागीदारीत कोल्हापुरात ैप्रभात फिल्म्सची स्थापना केली. तेथे शांताराम बापूंना आपली कला विकसित करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. गोपाळ कृष्ण, राणी साहेबा, खुनी खंजर, उदयकाल  असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांनी दिले.

प्रभातचा पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजा १९३२ साली प्रदर्शित झाला. १९३३ साली त्यांनी सैरंध्री हा भारतातला पहिला रंगीत चित्रपट काढण्याचे धाडस केले; पण चित्रपटाच्या प्रिंट्स नीट डेव्हलप न झाल्यामुळे हा प्रयत्न फसला. त्यामुळे प्रभातला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले.  डगमगून न जाता शांताराम यांनी ‘अमृतमंथन’ची निर्मिती केली. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. त्यानंतरचा १९३७ साली तयार केलेला ‘संत तुकाराम’ बोलपट भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. भारतात-विशेषत: महाराष्ट्रात-हा चित्रपट धो धो चालला. त्याची कीर्ती सातासमुद्रापार गेली. व्हिनिस चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला. भारताबाहेर दाखविला गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट. 

प्रभात फिल्म्सचा विस्तार करण्यासाठी चारही मालकांनी पुण्यात जागा घेतली आणि तेथे भव्य अशा अत्याधुनिक प्रभात स्टुडिओची स्थापना करण्यात आली. चित्रपटनिर्मितीला आधुनिक रूप प्राप्त झाले. एकीकडे पौराणिक चित्रपट बनवत असतानाच शांताराम बापूंनी अनेक उत्तमोत्तम सामाजिक चित्रपटांचीही निर्मिती केली. जरठ विवाहावर टीका करणारा ैकुंकू(दुनिया ना माने), वेश्येच्या पुनरुज्जीवनावर भाष्य करणारा माणूस (आदमी) आणि हिंदू-मुस्लीम दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मैत्रीचा संदेश देणारा शेजारी (पडोसी) हे सामाजिक चित्रपट अफाट गाजले.

राजकमल कला मंदिर

शांताराम बापूंनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडली. त्यांनी मुंबईत येऊन ैराजकमल कला मंदिर ही स्वत:ची  संस्था स्थापना केली. राजकमलच्या माध्यमातूनही त्यांनी दर्जेदार चित्रपटांची मालिका सुरू ठेवली. 

१९४६ साली डॉ. कोटणीसांच्या जीवनावर आधारित डॉ. कोटणीस की अमर कहानी, १९५१ मध्ये  होनाजी बाळांचा अमर भूपाळी, उत्तम नृत्ये असलेला १९५५ सालचा रंगीत झनक झनक पायल बाजे, कैद्यांना प्रेमाने वागविण्याचा संदेश देणारा १९५७ मधील दो आँखे बारह हाथ आणि एका कवीच्या मनोराज्याचा वेध घेणारा १९५९ चा नवरंग  हे चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरले. 

डॉ. कोटणीस... आणि दो आँखे... या चित्रपटांमध्ये त्यांनी स्वत: नायकाची भूमिका केली होती. १९७२ मधील  ‘पिंजरा’ने मराठी चित्रपटांच्या लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मागे टाकले. ‘पिंजरा’ हा मराठीतील पहिला संपूर्ण रंगीत चित्रपट होता.

शांताराम बापूंना चित्रपट माध्यमाची भाषा उत्तमपणे अवगत होती. माध्यमांवर त्यांची जबरदस्त पकड होती. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माता-निर्देशक-नट चार्ली चॅप्लिन यांनी  सुद्धा शांताराम बापू यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले होते. शांताराम बापूंना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य प्र. के. अत्रेंनी शांताराम  बापूंना  ‘चित्रपती’ ही पदवी दिली. चित्रपट माध्यमातील व्यक्तींना दिला जाणारा भारतातला सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार १९८५ साली शांताराम बापूंना प्रदान करण्यात आला, तर १९९२ साली भारत सरकारने  त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.

कथानकाची निवड, त्याचा आशय, कॅमेºयाचे तंत्र, संकलन या  बाबतीत बापूंचे चित्रपट काळाच्या पुढे असत. चित्रपट हे कला, मनोरंजनाचे माध्यम तर आहेच; पण  यातून  समाजाला  योग्य संदेशही प्रभावीपणे देता येतो हे त्यांनी जाणले होते. या महान दिग्दर्शकाचे ३० आॅक्टोबर १९९० रोजी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी मुंबईत निधन झाले.              

    Ⓒ SANJAY MUNDALKAR

Saturday, 1 July 2023

पुष्पा, आय हेट टीअर्स ...

 आपल्या चतुरस्त्र अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या अंत:करणावर अधिराज्य गाजवणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आगामी १८ जुलैला स्मृतिदिन. राजेश खन्ना यांच्या निधनानंतर ७० च्या दशकातील एक सदाबहार  युग संपुष्टात आले. राजेश खन्ना यांनी १९६९ ते १९७२ या काळात लागोपाठ एकापेक्षा एक १५ सुपरहिट चित्रपट दिले, ही कामगिरी मोठी मानली जाते.



राजेश खन्ना यांनी चेतन आनंद यांच्या ‘आखरी खत’ चित्रपटापासून (१९६५)  अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. आनंद, आराधना, आन मिलो सजना, मर्यादा, दो रास्ते,अंदाज, बावर्ची, मेरे जीवन साथी, कटी पतंग, हम दोनो,अवतार, अमर प्रेम यासारखे अनेक हिट चित्रपट दिले. दो दिलों के खेल मे हा प्रदर्शित झालेला चित्रपट अखेरचा (२०१०) ठरला. तब्बल १०१ चित्रपटांमध्ये त्यांनी सोलो हिरो म्हणून काम केले, हा एक विक्रम मानला जातो. 

संगीतातून रोमान्स

राजेश खन्ना यांच्या यशामागे संगीतकार आर. डी. बर्मन आणि गायक किशोर कुमार यांचे मोलाचे योगदान आहे. किशोर कुमार यांनी अनेक चित्रपटांमधून राजेश यांना स्वर दिला.आर. डी. बर्मन यांनी संगीत दिले. मेरे सपनों की राणी कब आएगी तू म्हणत शर्मिला टागोर यांच्या रेल्वेमागे चारचाकीने पाठलाग करणारा, जिंदगी कैसी हे पहेली...कभी ये हसाए कभी ये रूलाये, असे म्हणत आयुष्याची गणिते मांडणारा तर कधी एक अजनबी हसीना से यू मुलाकात हो गई, असे म्हणत तिच्या सौंदर्याचे गुणगाण करणारा, गुनगुना रहे है भंवरे खिल रहे है...म्हणत प्रेमाचे गीत गाणारा तर कधी ये जो मोहब्बत है, म्हणत नशेत बुडून आता प्रेम कधीच करणार नाही म्हणणाºया रोमँटिक राजेश खन्नांची आठवणीतील गाणी अनेकांच्या तोंडावर रूळलेली दिसतात. 

काका... कसे

आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान राजेश यांनी त्यांना काका नाव कसे मिळाले, याविषयी सांगितले होते. काका या शब्दाचा पंजाबी भाषेतील अर्थ  लहान गोंडस मुलगा असा होतो. मी जेव्हा हिंदी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले. त्यावेळी तरुण होतो. त्यामुळे सर्वजण काका म्हणू लागले. अनेकवेळा पंजाबीमध्ये ‘काके’ अशीही हाक मारण्यात येते. मलाही तशीच हाक मारली जायची. हळूहळू ‘काका’ हेच नाव पुढे लोकप्रिय झाले. 


हृषिकेश मुखर्जी यांची निर्मिती असलेला आनंद १९७१ मध्ये पडद्यावर आला होता.  राजेश  खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणले. गाण्यांसोबत संवादही लोकप्रिय ठरले. राजेश खन्ना  यांचा रेकॉर्ड केलेला आवाज टेपच्या माध्यमातून ऐकवला जातो-‘बाबू मोशाय...जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में है जहाँपनाह...जिसे  ना आप बदल सकते है ना मै.....हम सब तो रंगमंच की कठपुतलिया है, जिसकी डोर उपरवाले की उंगलीयों मे बंधी है...कौन, कब, कैसे उठेगा कोई नही जानता’ राजेश खन्ना  यांचे असे संवाद अमर बनले. 


१४  फिल्मफेअर नामांकन

राजेश खन्ना यांना  आनंद, बावर्ची, नमक हराम,अमृत या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. दादासाहेब फाळके पुरस्कार, आयफा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, अप्सरा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी  गौरवण्यात आले. 


सुपरहिट गाणी

#  मेरे सपनों की राणी कब आएगी तू 

#   जिंदगी कैसी है पहेली

#  एक अजनबी हसिना से 

#  गुनगुना रहे है भंवरे खिल रहे है गली गली

#  ये जो मोहब्बत है

#  हजार राहें मुड के देखी

#  जय जय शिवशंकर

#  जिंदगी प्यार का गीत है

#  ससुरा तिरथ, तिरथ साला साल ी है

#  कभी दोसती ने मारा

#  यू ही तुम मुझसे बात करती हो

#  नदीया  से दरिया

#  इतना तो याद है मुझे

#  ये जो चिलमन है

# नाच मेरी बुलबुल

#  जिंदगी के सफर में

#  ये लाल रंग मुझे 

#  जा ना याद आ मुझे