Thursday, 22 August 2019
मैं हवा हूँ कहाँ वतन मेरा...
मैं हवा हूँ कहाँ वतन मेरा...
जमिनीवर, पाण्यावर इतकेच काय आकाशावरही आपला मालकी दावा सांगत त्याने इतरांचा हक्क नाकारला. दुसºयाच्या अस्तित्वाला धोका निर्माण केला आणि त्यातून सत्तासंघर्ष सुरू झाला. सीमा बांधल्या गेल्या. मना-मनात भींती उभ्या राहिल्या. दुसºयांना हीन लेखणे, खालच्या दर्जाची वागणूक सुरू झाली.
माणूस ...एक हाडा मांसाचा देह. पंचमहाभूतापासून बनलेला असल्याचे सांगण्यात येते. या माणसाजवळ असलेल्या मेंदूने आकाश, पाताळ, धरती, भूकंप, वारा, पाऊस, उन्ह, थंडी, वादळवारा, वावटळ, चक्रीवादळ आदींवर विजय मिळवला. इतकेच काय चंद्र, मंगळ ग्रहावरही त्याने पाऊल ठेवले. आता तर तो सूर्यावरही जाण्याचा भाषा करत आहे. हाती आलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याने साºया अत्याधुनिक सुविधांना आपल्या पायाशी लोळण घेण्यास भाग पाडले़ आरामदेही सुखानेही त्याच्यापुढे शेपूट हलवले. मात्र, त्याचवेळी त्याच्या अधोगतीचे संकेतही मिळाले होते. कारण या मानवाला सत्तेचा अहंकार, संपत्तीचा माज, अधिकाराचा गर्व होणे हे निश्चित होते.जमिनीवर, पाण्यावर इतकेच काय आकाशावरही आपला मालकी दावा सांगत त्याने इतरांचा हक्क नाकारला. दुसºयाच्या अस्तित्वाला धोका निर्माण केला आणि त्यातून सत्तासंघर्ष सुरू झाला. सीमा बांधल्या गेल्या. मना-मनात भींती उभ्या राहिल्या. दुसºयांना हीन लेखणे, खालच्या दर्जाची वागणूक सुरू झाली.
या सत्तासंघर्षातून काही महिन्यांपूर्वी जगातील माणुसकीला ओरडून आपल्या अस्तित्वाची ओरडून साद घालणारे छायाचित्र साºया जगाने पाहिले. आॅस्कर अलबर्टो मार्टिनेज रामिरेज आणि त्यांची अवघी २३ महिन्यांची चिमुरडी वालेरिया यांच्या नदीतील मृतदेहाचे ते छायाचित्र होते. ज्यावेळी माणुसकीने डोळे मिटले, त्याचवेळी या दोघा बापलेकीने डोळे मिटले असणार. मध्य अमेरिकास्थित अल सल्वाडोर या देशातील आॅस्कर अलबर्टो मार्टिनेज रामिरेज हा आपल्या वालेरिया नावाच्या मुलीसोबत अमेरिकेत शरण घेण्यासाठी निघाला होता. मात्र, यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घालत सीमेवरील रियो ग्रांडे नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने आपल्या लाडक्या चिमुरडीला आपल्या टी-शर्टमध्ये बांधले होते. नदीच्या प्रवाहात आपल्यापासून विलग होऊ नये यासाठी त्याने मुलीला स्वत:ला टी शर्टच्या बांधले होते. त्या चिमुकलीनेही आपल्या वडिलाच्या गळ्यात मागून हात टाकत घट्ट धरून ठेवले होते. दोघांचेही दुर्दैव आड आले आणि सुरक्षित आयुष्याचे स्वप्न नदीत वाहून गेले. त्यांच्याकडे पाहून पाठमोरे झोपलेले असल्याचे भासते. काही क्षण असे वाटून जाते की ते खरोखरच झोपलेले असणार; पण नाही, कधीही न उठण्यासाठी नियतीने त्यांना कायमची झोप घातली होती. ते दृश्य पाहून अनेकांच्या संवेदनशील मनाला कापरे फुटले, डोळे डबडबले, अंग शहारले, मन मन ओरडले असणार! आणि तसे घडले नसेल तर या जगाची किंमत शून्य आहे...अगदी शून्य! आॅस्करची आई रोजा रामिरेज यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून अलबर्टो अमेरिकेत शरण मिळवण्याच्या प्रयत्नात होता. यासाठी त्याला अमेरिकन अधिकाºयांसमोर हजर व्हायचे होते. मात्र, त्याला यश मिळत नव्हते. यासाठीच २३ जून रोजी अलबर्टोने मुलगी वालेरिया आणि पत्नी तानिया वानेसा अवालोस हिच्यासोबत नदी पार करत अमेरिकेत दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. नदी पार करत असताना नदीच्या प्रवाहात बाप-मुलीला आपला जीव गमवावा लागला. तानिया यांच्यानुसार, त्यांचे संपूर्ण कुटुंब व्हिजावर मागील दोन महिन्यांपासून मॅक्सिकोमध्ये वास्तव्यास होते. त्यांना अधिकृतरित्या अमेरिकेत वास्तव्य करावयाचे होते; परंतु संधी मिळत नसल्याने नदीतून जाण्याचे ठरवले. घटनेच्या दिवशी सुरुवातीला आॅस्करने वालेरियाला हिला सुरक्षितरित्या दुसºया किनाºयावर पोहोचवले. ते मला घेण्यासाठी परत निघाले असता वालेरिया घाबरली. तिनेही नदीत उडी घेतली. मग तिला वाचवण्यासाठी आॅस्करने प्रयत्न केला;पण दोघेही वाहून गेले. ज्या ठिकाणी या बाप-मुलीचे शव आढळले ते ठिकाण अमेरिकेच्या टेक्सास सीमेपासून केवळ १०० यार्ड म्हणजेच ३०० फुटांवर होते, तर जवळपास केवळ दीड किलोमीटर अंतरावर मॅक्सिको आणि अमेरिकेला जोडणारा एक आंतरराष्ट्रीय पूल आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मॅक्सिकोच नव्हे तर संपूर्ण जगातून अवैध पद्धतीने अमेरिकेत शरण घेणाºयाप्रति कठोर भूमिका घेतली आहे.
मॅक्सिकोच्या संपूर्ण सीमारेषेवर भिंत घालण्याचाही निर्णय त्यांनी घेतला असला तरी देखील अमेरिका-मॅक्सिकोच्या सीमेवर हजारो शरणार्थी अमेरिकेत दाखल होण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेच्या संसाधनांवर पहिला हक्क स्थानिक नागरिकांचा आहे. शरणार्थींमुळे त्यांना रोजगार मिळत नाही, अशी कठोर भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. यूएस बॉर्डर पोलिसांनुसार २०१८ मध्ये सीमेवर २८३ शरणार्थींचा मृत्यू झाला आहे. आॅस्करलाही अमेरिकेत प्रवेश न मिळण्यावर सत्तासंघर्ष, बांधलेल्या सीमा आणि मना-मनात उभ्या राहिलेल्या भींती कारणीभूत ठरल्या होत्या. यावेळी उस्ताद अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन यांनी गायिलेली गझल आठवते, मैं हवा हूँ कहाँ वतन मेरा...
मॅक्सिकोच्या संपूर्ण सीमारेषेवर भिंत घालण्याचाही निर्णय त्यांनी घेतला असला तरी देखील अमेरिका-मॅक्सिकोच्या सीमेवर हजारो शरणार्थी अमेरिकेत दाखल होण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेच्या संसाधनांवर पहिला हक्क स्थानिक नागरिकांचा आहे. शरणार्थींमुळे त्यांना रोजगार मिळत नाही, अशी कठोर भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. यूएस बॉर्डर पोलिसांनुसार २०१८ मध्ये सीमेवर २८३ शरणार्थींचा मृत्यू झाला आहे. आॅस्करलाही अमेरिकेत प्रवेश न मिळण्यावर सत्तासंघर्ष, बांधलेल्या सीमा आणि मना-मनात उभ्या राहिलेल्या भींती कारणीभूत ठरल्या होत्या. यावेळी उस्ताद अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन यांनी गायिलेली गझल आठवते, मैं हवा हूँ कहाँ वतन मेरा...
© संजय इस्तारी मुंदलकर
Subscribe to:
Posts (Atom)