कोरोना आणि वसुंधरा
चीन देशातून पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे़ अनेकांना त्याची लागण झाली असून, हजारोंना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत. जगातील बोटावर मोजण्याइतपत देश त्यापासून मुक्त राहिले आहेत़ अनेक देशांत ‘लॉकडाऊन’(टाळेबंदी) करण्यात आली आहे़ महत्त्वाचे उद्योगधंदे, कारखाने, कंपनी बंद ठेवण्यात आल्या आहेत़ सर्वसामान्य नागरिकांसह कामगारांना, मजुरांना, शासकीय कर्मचाºयांना (अत्यावश्यक सेवा वगळता) घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे़ याशिवाय प्रत्येक भारतीय नागरिकाने वैयक्तिक स्वच्छता पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे; परंतु त्याचवेळी या कोरोना विषाणूमुळे सुरूअसलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे पृथ्वीला, धरणीमातेला, वसुंधरेला मोठा दिलासा मिळाला आहे. ही पृथ्वी आता अधिक स्वच्छ हवेचा श्वास घेत आहे. एका माहितीनुसार, धरतीवर अशी स्वच्छ हवा सुमारे ७५ वर्षांनंतर आढळली आहे. यापूर्वी दुसºया जागतिक महायुद्धानंतर इतकी स्वच्छ हवा होती, असेही सांगण्यात येत आहे. काही प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, दुसºया महायुद्धानंतर ही पहिली वेळ असेल, जेव्हा कार्बन उत्सर्जन सर्वांत कमी होत आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये ‘लॉकडाऊन’ जाहीर केल्याने जगभरात प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे.
‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’चे प्रमुख रॉब जॅक्सन यांनी म्हटले, की यावर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये ५ टक्के घट झाली आहे. याआधी २००८ च्या आर्थिक मंदीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी झाले होते. यावेळी १.४ टक्के घट दिसून आली होती. दुसºया महायुद्धाच्या काळात प्रामुख्याने युरोप, आशियातील अनेक देशांतील कारखाने, बाजारपेठा, वाहतूक, उद्योग पूर्णपणे बंद होते. त्यामुळे प्रदूषण कमी झाले. आता इतक्या वर्षांनंतर चित्र पाहायला मिळत आहे, असेही रॉब जॅक्सन यांनी म्हटले आहे. पर्यावरणतज्ज्ञ तसेच वैज्ञानिकांच्या मते, कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे जागतिक कार्बन उत्सर्जनमध्ये १० ते २० टक्के घट झाली आहे; पण हे जास्त काळ नसणार आहे. कारण २०२१ च्या सुरुवातीला तापमान पुन्हा वाढायला लागेल. त्यामुळे चिंता पुन्हा वाढणार, हे अपेक्षित आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्राने (युनो) मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक अहवाल प्रकाशित केला होता. प्रत्येक वर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये ७.६ टक्के इतकी घसरण झाली तरच ‘ग्लोबल वॉर्मिंग’अर्थात जागतिक तापमानात १.५ अंश से
ल्सियसची कमतरता येईल.
हिंदी वृत्तपत्र राज एक्सप्रेसनुसार, एका नव्या अभ्यास सर्वेक्षणात पृथ्वी सभोवती असलेले सुरक्षा कवच अर्थात ओझोनच्या थरात सुधारणा होत आहे. पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील संशोधन संस्था ‘सीआयआरईएस’ च्या (को-आॅपरेटिव्ह इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन एन्व्हायर्नमेंटल सायन्स) संशोधक अंतरा बँनर्जी यांनी युनिव्हर्सिटी आॅफ कोलोराडो बोल्डर येथे यासंदर्भात माहिती दिली. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात पर्यावरण बदलाविषयीचे संकेत मिळाले आहेत. हे बदल ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’मुळे ओझोनच्या थराचे छिद्र आंकुचन पावत असल्याने होत आहेत.
मॉन्ट्रियल प्रोटोकॉल...
‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’ हा एक जागतिक पातळीवरील करार आहे. या करारात ओझोन थराला कमजोर करणाºया घटकांचे उत्सर्जन थांबवण्यासाठी काही देशांनी सहमती दर्शवली आहे. हा करार ओझोन थराच्या संरक्षणासाठी व्हिएन्ना संमेलनात पारित केला होता. या करारावर १६ सप्टेंबर १९८७ रोजी स्वाक्षºया करण्यात आल्या़ तसेच, हा करार १ जानेवारी १९८९ लागू करण्यात आला होता. विशेष म्हणजे या करारात आतापर्यंत सातवेळा संशोधन करण्यात आले आहेत. शास्त्रज्ञांनुसार ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’चे पूर्णत: पालन केल्यास २०५० पर्यंत ओझोन थराच्या छिद्राला पूर्ण झाकण्यात यश मिळू शकते.‘लॉकडाऊन’ कारणीभूत
कोविद-१९ अर्थात कोरोना व्हायरस डिसीज 2019 पासून झालेल्या संक्रमणाला परतून लावण्यासाठी जगभरातील देशांनी ताळेबंदी(लॉकडाऊन) लागू केली आहे. यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्याने पृथ्वीभोवतीच्या वातावरणात तसेच पर्यावरणात तीव्र गतीने सुधार झाला आहे. धरतीच्या दहाही दिशांतून होणारी वाहतूक बंद असून जगातील लाखो कारखाने, उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे विकसित, अर्धविकसित देशांतून होणाºया प्रदूषण उत्सर्जन प्रमाणात घट झाली आहे. परिणामी वायुमंडळातील हवा स्वच्छ झाल्याचे आढळून आले आहे.
भारतासंदर्भात प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील ९० शहरांमध्ये नाममात्र वायुप्रदूषणाची नोंद करण्यात आली. यात असेही सांगण्यात येते की यामुळे श्वास घेणे सोपे झाले झाले़ (अर्थातच सर्वांना स्वच्छ हवा मिळाली.)
कोरोनामुळे देशात लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’च्या प्रभावामुळे प्रदूषणात घट झाली असली तरी सरकाराला या क्षेत्रात अधिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे संकेतही पर्यावरण तज्ज्ञांनी दिले आहेत. याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. कोरोनासंबंधित महामारीने जगातील मानवजातीला झोपेतून जागे केल्याचे दिसून येत आहे. यापुढील काळात मानवाला केवळ आपले आरोग्यच नाही, तर धरतीमातेचे आणखी शोषण करण्याऐवजी तिच्या अधिक सुरक्षिततेसाठी, तिच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न राहण्याची गरज दाखवून दिली आहे.
गंगा नदीही स्वच्छ
केंद्र सरकारने देशव्यापी ‘लॉकडाऊन’ घोषित केल्यानंतर गंगा नदीचे पाणी स्वच्छ होत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकत आहेत. वाराणसी येथील आयआयटी अर्थात भारतीय प्रऔद्योगिकी संस्थातील रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक पी. के. मिश्रा यांनी सध्या बंद स्थितीत असलेले औद्योगिक कारखाने गंगा नदीच्या पाण्याची पत सुधारण्यास मदत करत स्पष्ट केले आहे. नदीच्या पाण्यात स्वच्छतेबाबत ४० ते ५० टक्क्यांनी सुधारणा झाली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) सुमारे ३६ देखरेख केंद्रांनी गंगा नदीचे पाणी विविध ठिकाणांवरून गोळा केले. विरघळलेला प्राणवायू, जैव रासायनिक प्राणवायूची गरज, एकूण कोलीफॉर्म, पीएच पातळी हे निकष पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी वापरण्यात आले. विविध पातळीवर केलेल्या तपासून सुमारे २७ बिंदूंच्या आधारे हे पाणी आंघोळ, वन्यजीव तसेच मत्स्यांच्या प्रसारासाठी योग्य दर्जाचे असल्याचे सीपीसीबीने आपल्या अहवालात म्हटले आहे. उद्योगांकडून होणाºया प्रदूषणाचे प्रमाण तपासण्याची संधी ‘सीपीसीबी’ला प्राप्त झाली आहे. त्याआधारे उपाययोजना करता येईल, असेही सांगण्यात येत आहे. याशिवाय दिल्लीतील अनेक भागातील हवा स्वच्छ झाल्याने आकाश निळेशार दिसून येत आहे.
हिमालयाचे दर्शन
वाहतूक आणि औद्योगिक कारखाने बंद असल्याने पर्यावरणाची स्थिती सुधारली आहे़ वायु प्रदूषण कमी झाल्याने वातावरण बिल्कुल साफ झाले आणि तब्बल ३० वर्षांनंतर हवा इतकी स्वच्छ झाली की पंजाबमधील जालंधर शहरापासून सुमारे १६० किमी अंतरावर असलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा स्पष्ट दिसू लागल्या. या शहरातील नागरिकांनी या दृश्याचा पुरेपूर आनंद घेतल्या़ या गोष्टीवरून असे दिसून येते की, आपण निसर्गाच्या सौंदर्याला किती मुकलो आहोत.© संजय मुंदलकर