वाहन उत्पादक कंपन्यांनी ग्राहकांवर अधिक भार टाकत मासिक हप्त्यांनी सवलत दिल्याच्या दिवसांपासून आजतागत हा प्रकार सुरूच आहे. त्यावर आता तरी अंकुश बसणे अगदी काळाची गरज होऊन बसली आहे. रस्ते आहेत तेवढेच आहेत आणि वाहतूक नियमांबाबतची बेफिकीरी वाढत आहे.
मृत्यू हा शाश्वत आणि सत्य. संपूर्ण जीवनमात्र त्याला स्वीकारतात ; परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना कुणाच्या तरी चुकीने आयुष्याचा अंत होतो़ ही बाब स्वीकारण्याजोगी नाहीच़ सध्या मानवजात नको तितकी ‘फास्ट’झाली आहे़ सर्व गोष्टी चुटक्यासरशी व्हाव्यात अशी ज्याची त्याची उपेक्षा असते आणि त्यासाठी त्याची कोणत्याही परिणामाला सामोरे जाण्याची तयारी असते. मग निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित असो नियमांना पायदळी तुडविणे, हे फार शहाणपणाचे समजले जाते. त्यात प्राण गेला तरी बेहत्तर! असंच काहीसं सध्या होत आहे़ वाहनातून इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी हा मानव पार नियम तोडत आहे आणि पदरी मात्र अपघाती मृत्यू ओढवून घेतोय.
देशातील प्रत्येक मार्गावर अपघात होत आहेत़ रस्ता एकपदरी असो वा सहापदरी कोणताही जीव त्यावर सुरक्षित नाही़ कोणताही चांगला मार्ग वाहनांच्या सुरक्षित वेग ासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी असला तरी सुरक्षिततेचा हेतू कधीच मागे पडला आहे. यापैकी अतिवेगाचा हेतू तर साध्य झाला;परंतु सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा (वाहतुकीचा) हेतू साध्य झालेला आहे, असे ठाम सांगता येणार नाही. कारण रस्तोरस्ती अजूनही अपघातांची मालिका आहे. भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहेच़भरीसभर चार वा सहापदरी अशा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरही असे अपघात वारंवार व्हावेत, हे मोठे दुर्दैवच म्हटले पाहिजे.
अपघातांच्या मागे केवळ रस्ते हे एकमेव कारण नसल्याचे अनेकदा आढळून आले आहे. मानवी चुकाही अपघातास कारणीभूत ठरत आहेत. रस्ता कितीही सुरक्षित असला तरी तेवढे पुरेसे नाही. रस्त्यावरून जाणाºया वाहनांमध्ये किती प्रवासी (वा माल) कोंबावेत, वाहनचालकाने सलग किती तास ‘ड्रायव्हिंग’ करावी आणि वाहनाचा वेग किती असावा यावर सरकारने लक्ष ठेवावे,असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.म्हणजेच अपघातांना इतर कारणांपेक्षा मानवी चुका अधिक कारणीभूत असल्याचे लक्षात येते. या चुकांची साखळी वाहतुकीची परवाने देण्यापासून सुरू होते, तिथून ती अतिवेगाने वाहने चालवण्याची प्रवृत्तीपर्यंत संपते.
अगदी बनावट परवाधारक चालकापासून वळणावर वाहन असताना मोबाईलवर बोलण्यापर्यंतची साखळी अपघाताला कारणीभूत ठरली आहे़ आज अशी स्थिती आहे की परवाना असलेला चालक अ सो वा नसलेला चालक असो, दोघांनाही अन्य कुणाच्या जीवांची पर्वा नाही़ मोबाईल कानाशी ठेवत वाहन चालवणारे समाजद्रोही अनेकदा पाहावयास मिळतात. ते कदापिही वाहतुकीच्या नियमांबाबत दक्ष नसतात. वेगाची मर्यादा न पाळणे, भरधाव गाडी ‘लेन’ तोडून दुसºया ‘लेन’मध्ये घेणे अशा प्रकारातून ते अपघातास कारणीभूत ठरतात. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना मानवी चुकांमुळे झालेल्या आहेत. भारतात रस्ते अपघातात मरणाºयांची संख्या मोठी आहे आणि त्यावरून भारतीय किती बेशस्त आहेत, यावर प्रकाश पडत असतो. या बेशिस्तीमध्ये बेफाम वेगाने गाड्या चालवणे,‘ओव्हरटेक’ करण्याची चुकीची पद्धत आदी बाबी प्रामुख्याने आढळतात.अनेकदा प्रवासीही चालकाला गाडी वेगाने चालवण्याबाबत प्रोत्साहित करत असतात. अशाप्रकारामुळे वेगाची ‘झिंग’ पूर्ण होत असली तरी हा आपल्या आणि वाहकाच्या जीवाशी खेळ असतो, ही जाणीव त्यांना नसते. भारतात वाहनांची संख्या वाढत आहे. (वाहन उत्पादक कंपन्यांनी ग्राहकांवर अधिक भार टाकत मासिक हप्त्यांनी सवलत दिल्याच्या दिवसांपासून आजतागत हा प्रकार सुरूच आहे. त्यावर आता तरी अंकुश बसणे अगदी काळाची गरज होऊन बसली आहे.) मात्र, रस्ते आहेत तेवढेच आहेत आणि वाहतूक नियमांबाबतची बेफिकीरी वाढत आहे. त्यामुळे ‘सुरक्षित वाहतूक’ हे आव्हान समाजासमोर दिवसांगणिक बिकट होत चालले आहे. कारण दुर्घटनांचा बळी हाच समाज ठरत आहे.
संजय मुंदलकर (सर्वाधिकार सुरक्षित)

No comments:
Post a Comment