ऐ माझ्या राजसा
ऐ माझ्या राजसा,कां रुसला असा?
घे ना जवळी, नको रे दुरावा
हे प्रीतीचे बंध सरेना कधी गंध
जीवनी तुझा श्वास जाहला जीव धुंद
वेडावली राधिका़
व्यर्थ तुजविन जगणे तू भ्रमर, मी फुलणे
नाते हे युगांतरीचे कधी ना सरे
रोमांचली प्रेमिका़
सप्तपदी चालुनी मी येईल तुज अंगणा
धागा शतजन्मीचा मोक्ष मिळता तुटेना
लाजरी बावरी़
संजय इस्तारी मुंदलकर