बायको नूतन आणि नवरा संजय यांच्यातील सकाळचा संवाद...
नूतन : काल तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता.
संजय : नाही गं!
नूतन : मी ऐकल्या. तुम्ही झोपेत मलाच शिव्या देत होता.
संजय : तुझा गैरसमज आहे.
नूतन : कसला गैरसमज ?
संजय : हाच, की मी झोपलो होतो.
***
बंकी : मला तुझे दात खूप आवडतात
निक्की : अय्या खरंच!
बंकी : अगं हो... कारण पिवळा माझा फेव्हरेट रंग आहे़
***
शिक्षक : मुलांनो, निष्पाप आणि मुक्या प्राण्यांवर आपण प्रेम करायला हवे!
विद्यार्थी : हो ऽऽऽ सर
शिक्षक : मी जर कुण्या माणसाला, एका निष्पाप गाढवाला मारहाण करताना बघितलं, तर अशावेळी मी काय करावं?
विद्यार्थी : त्याला थांबवायला हवं.
शिक्षक : बरं,मी त्याला मार खाण्यापासून वाचवले, तर ही बाब काय दर्शवते?
विद्यार्थी (एका स्वरात) : भाऊबंदकी
***
चंकीनं त्या सुंदर मुलीला विचारलं, तुम्ही कुठं राहता?
मुलगी : नूतन्स सिव्हिल रोड
चंकी : इतक्या सुंदर असूनही तुम्ही रोडवर राहता!
*****
No comments:
Post a Comment