Thursday, 23 December 2021

देव्हाºयातली भक्ती ‘बाबां’च्या ताब्यात

हळूहळू गावातल्या भक्तीने कूस फेरली़ देव्हाºयाचे रूप पालटू लागले़ शेगावीच्या राणाचे,शिर्डीच्या साईबाबांचे छायाचित्र भिंतीवर लटकले़ देवाच्या जागी भलत्याच ‘बाबां’नी आक्रमण केले़ भक्तीची,श्रद्धेची जागा ‘अध्यात्म’च्या नव्या क्रांतीने घेतली़ देव्हाºयापुढे ‘नत’ होण्यासाठी झुकलेले मस्तक आता तासभºयासाठी बाबांपुढे झुकू लागले़ गळ्यासह आता मनगटाभोवती माळा गुरफटल्या जावू लागल्या़ 


गावात राबता शेतकºयांचाच असायचा! गाव आणि शेती असंच समीकरण बनलं होतं़ नोकरदार वर्ग फारच कमी होता़ असायचे ते मास्तर, चपराशी, कोतवाल, तलाठी असे काही महत्त्वाचे नोकरदार असे़ तरीही शेतकºयांचा आवाका रग्गड होता़ शेतीच्या कामातून थोडी फुरसत मिळाली की तो सण,उत्सवात रमवून घेत असे़ गावात किंवा पंचक्रोशीत यात्रा,शंकरपट,दंडार,गंगासागर असे कार्यक्रम असले की कामातून सवड काढत आपल्या कुटुंबीयांसह सहभागी होत़

याशिवाय गावात प्रवचन, कीर्तन, खंजरी भजन, अवधुती भजन,भारूड,ज्ञानेश्वरी  पारायण, काकडा, अखंड रामायण आदी कार्यक्रम होत़ यावेळी गोपालकाला आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असे़ थंडीत कुडकुडत आंघोळ करीत  पहाटे पहाटे काकड्याला जाण्यात मोठी मजा येत असे़ अगदी चार वर्षांचा बालकही त्यासाठी तयार असे़ 

गावात पंगत होत़  कधीकधी खिचडा करण्यात येई़त्यासाठी गावातून रोख रक्कम, धान्य अशा स्वरूपात वर्गणी स्वीकारण्यात येत असे़ गावकरी तनमनधनाने मदत करीत़ गावाशिवाय परिसरातील कित्येक लोक आपल्या घरातील कार्य समजून कार्यक्रमात सहभागी होत़ गावात एकजूट होती़ तसेच, संत गाडगेबाबा, वंदनीय तुकडोजी महाराज, लहानुजी महाराज यांची जयंती आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम होई़ पालखीतून मिरवणूक काढण्यात येत़  त्यानिमित्ताने ग्रामसफाई होत़ महिला, पुरुष, युवक, युवती मोठ्या उत्साहाने श्रमदान करीत़ 

काळ बदलला, गावात गाड्या धावू लागल्या, दुचाकी वाढल्या, शहरातले गुटखे गावात आले़ गावातली पोरं बाहेरगावी शाळेत पळायला लागली़ नवी लफडी तयार झाली़ बाहेरची गावात पोहोचली़ हळूहळू गावातली भक्तीने कूस फेरली़ देव्हाºयाचे रूप पालटू लागले़ शेगावीच्या राणाचे,शिर्डीच्या साईबाबांचे छायाचित्र भिंतीवर लटकले़ देवाच्या जागी भलत्याच बेगड्या‘बाबां’नी चाल केली़ भक्तीची,श्रद्धेची जागा ‘अध्यात्म’च्या नव्या क्रांतीने घेतली़ देव्हाºयापुढे ‘नत’ होण्यासाठी झुकलेले मस्तक आता तासभºयासाठी बाबांपुढे झुकू लागले़ गळ्यासह आता मनगटाभोवती माळा गुरफटल्या जावू लागल्या़ गावात आश्रम बांधण्यावर चर्चा होवू लागली़ सार्वजनिक हिताच्या कामासाठी खिश्यात हात घालण्यास ‘काकूं’ करणारे आता अघळपघळ पैसा मोजू लागले़ खरं तर हा समाजाविरुद्ध मोठा कट होता़

दुसरे संकट म्हणजे आता शहरातल्या त्यांच्या ‘एजंटां’ नी खेड्यापाड्यांत आपले हातपाय पसरविणे सुरू केले आहे़ त्यामुळे ह्या नव्या महा‘राजां’नी गावात धुमाकूळ घातला असून त्यांचे कार्यकर्ते अत्यंत नियोजितपणे आपापले काम करीत आहेत़ गावातील विठ्ठल,राम आणि हनुमान मंदिरातील भजनकºयांचा गोतावळा आता दुसरीकडेच वळताहेत़ आता तर काहीशा मोठ्या गावात अनेक बुवांनी आपले बस्तान ठोकले आहे़भाविक मंडळी महाराजांच्या, बुबांच्या विविध गटात विभागली आहेत़ काही वर्षांपूर्वी खेड्याखेड्यात करणी, बुवाबाजीचा मोठा जोर होता़ त्यामुळे मांत्रिकांची चांदी होती़ पाणी वा लिंबू भारून देणे,भानामती, लावडीन असाही प्रकार होता़ संपूर्ण गावाची ‘बांधणूक ’ करण्यासारखे प्रकार घडून येत़ त्यासाठी गावकरी वर्गणी करीत़ गावदैवतांची आस्थेने पूजाअर्चा करण्यात येत असे़ या सर्व प्रकारात अंधश्रद्धेचा गंध असला तरी कुणाचा विरोध होत नव्हता़ कारण त्यात भावना, श्रद्धा होती़ त्यानंतर मात्र महाराज, बुवांनी आक्रमण केले़ या वर्गांचा राखणदार होता खेड्यातील शिकलेला वर्ग़ सुशिक्षित माणूस पुढे असल्याने खेड्यातील माणसाने त्याच्यावर विश्वास ठेवला़ परिस्थितीनुसार नव्या संक्रमणाची चाहूल लागल्याने सामान्य व्यक्तीनेही त्यावर विश्वास ठेवला़आज या ‘सत्संगा’ला पैशांसह हजारो लोक उपस्थित राहत आहे़आणि यातील बुवा, महाराज काजू, मनुक्याचा बोकणा भरीत तृप्तीची ढेकर देत या गावाहून त्या गावी लोळण घेत आहेत़ महाप्रसादाच्या नावाखाली पैसा आणि धान्य गोळा होत आहे़ दुसºयाच्या पोटाची सोय करीत त्यावरील ‘साय’ मात्र आपल्या घशात कशी उतरवता येईल, यातच विचारमग्न आहे़ यात दोष कुणाला त्यांच्या लुटारू चलाखीला की लोकांच्या भोळ्या आणि भ्रामक कल्पनांना? शेवटी प्रश्न कायमच राहणार आहे़ बदलत्या दिवसांबरोबर आपल्या गावदैवतांना न विसरता परंपरेने चालत आलेल्या श्रद्धेला मात्र विसरू नये, इतकंच!                                                                                                                                                                                                                                                                                                                                © संजय मुंदलकर

Wednesday, 22 September 2021

घरावरची कौलं गेलीत कुठं ?

 कौलांना बरेच आयुष्य असायचं़ पावसाने कितीही ‘ओतणे’ चालू ठेवले तरी त्यातून एक थेंब पडत त नसे़ झडीच्या दिवसांत मात्र कवेलू ओलेगच्च व्हायचे़ मग त्यातून पाणी थेंबथेंब ठिबकायचे़ गावातील गरीबगुद्या माणसाचं घर हे निसर्गाची देणगीच असायची़ पºहाट्या, तुराट्या, बाभळीच्या नाहीतर कडुलिंबाच्या डिया हे सर्व फुकटातच मिळायचं़  फक्त हातात मेहनत हवी़


गावातली घर चंद्रमौळी असतात़ मागे पुढे अंगण़ अंगणात एका कोपºयात वृंदावऩ त्यात तुळशी माय़ कधी कधी भगवान शंकराची पिंड, शंखही विराजमान असतो़ शक्य असल्यास त्याच ठिकाणी विहीरही असते़ मागील बाजूस हीच स्थिती़ सकाळी पूजा करताना तुळशीला पाणी वाहतात, अगरबत्ती लावतात, तर सायंकाळी तिच्यापुढे दिवा लावतात़ अनेक घरातील आजीआजोबा यापैकी कुणी एक सायंकाळी नातवांसोबत शुभंकरोती म्हणतात़ यावेळी ते आपल्या पिढीतील संस्काराचा ठेवा त्यांच्या हवाली करीत असतात़

file photo

सधन कास्तकारांची घरे बैठी, मातीच्या भिंतीची, धाब्याची असत़ काहींची सिमेंटचीही असे़ त्यावर बंगलोरी कवेलू वा लोखंडी टिनाची पत्रे वापरण्यात येई़ सिमेंटच्या टिना महाग असल्याने त्यांचा वापर होत नसे़  प्रशस्त जागा, बैठकीची खोली वेगळी, स्वतंत्र स्वयंपाकघर, झोपण्याच्या खोल्या वेगळ्या,सामानसुमानाच्या अलग तर शेतमाल ठेवण्यासाठी वेगवेगळ्या खोल्या असत़ गरीब किंवा शेतमजुरांची घरे ‘कुडा’ची असत़ पुढची ‘सपरी’ आणि मागे स्वयंपाकघर अशी रचना असे़ पºहाटी, तुरट्यांंना ‘डियां’च्या मदतीने एका खोल पट्टीत रोवून त्यांना ‘कांबटी’ने घट्ट बांधण्यात येई़ त्यानंतर पांढºया मातीचे लिंपण देण्यात येत़ अशारितीने तो कुड तयार होत असे़ वरील बाजूला जुने-नवे बांबू टाकून त्यावर  तुराट्या आच्छादण्यात येई़ मग त्यावर कवेलू ‘शाकारली’ जात़ गावातली काही व्यक्ती अशी कौलं शाकाराण्यात वस्ताद असतात़ एकेका दिवशी ते चार-पाच घरे हातावेगळी करतात़ रोहिणीच्या सरी पडल्या की त्यांचे भाव वधरतात़ आमच्या गावातील नामदेव तेली, तुक्या वाघ, विठ्या, पुरुषा ही मंडळी कौलाचं घर शाकारण्यात तरबेज होती़ गावातील पूर्ण घरांचा जणू ठेका त्यांच्याचकडे असायचा़ इकडे शेतीची कामे आणि घर शाकारण्याची वेळ एकाच वेळी येई़

त्यापूर्वी उन्हाळाभर आमच्या गावातील देवा कुंभार कौलांचा कारखाना होता़ बेंबळा नदीच्या काठावर तो आपल्या बायको-लेकरांसह कौल तयार करण्याच्या कामात गुंतून घेई़ गाळाची माती शोधणे,तिला बारीक करणे, गाळणे, भिजवणे, त्यानंतर तिला पायाने तुडविणे अशी कामे करावी लागत़ मग कुठे ती तयार होई़ त्याचे ते काम बघण्यासाठी आम्ही दोस्तमंडळी बेंबळेच्या काठावर जात असू़ भरदुपारी जेवण झाल्यानंतर डोक्यावर एखादा जुना शेला बांधून घरातील मोठ्यांचा  डोळा चुकवून आम्ही तिकडे धूम ठोकायचो़ मग दिवेलागण होईपर्यंत तिकडेच राहायचो़ 

उन्हाळाभर मेहनतीने कवेलू तयार केल्यानंतर गावकरी देवाचा माल तर घेऊन जात; पण बरेच जण त्याचे पैसे उधार ठेवी़ यातील काही नगदी पैसे देत़ काही आपले काम संपले की त्या कुंभाराचे तोंड पाहणे टाळत असे़ ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ असा त्यांचा धर्म असे़ मग दुसºया वर्षी मात्र देवा त्यांना आपल्या दारातही उभा करीत  नसे़ संपूर्ण गावकरी याच कौलांनी आपली घरे शाकारून घेत़ देवाच्या कौलांना बरेच आयुष्य असायचं़ पावसाने कितीही ‘ओतणे’ चालू ठेवले तरी त्यातून एक थेंब पडत नसे़ झडीच्या दिवसांत मात्र कवेलू ओलेगच्च  व्हायचे़ मग त्यातून पाणी थेंबथेंब ठिबकायचे़ गावातील गरीबगुद्या माणसाचं घर हे निसर्गाची देणगीच असायची़ पºहाट्या, तुराट्या, बाभळीच्या नाहीतर कडुलिंबाच्या डिया हे सर्व फुकटातच मिळायचं़  फक्त मेहनतीची गरज असायची़

दिवस बदलले़ गावकºयांनी आता कौलांना बाजूला सारलं़ आणि मंगलोरी किंवा बंगलोरी कौलांना वर चढवलं़ कुंभाराच्या कौलांना भाव मिळेनासा झाला़ इतर बलुत्यांसारखा तोही आपल्या कारागिरीला मुकला़


© संजय मुंदलकर


Saturday, 9 January 2021

गावातली मन नासत आहेत

‘गाव करी ते राव न करी’, असं म्हणतात़ कारण गावातलं खेटरही गावकºयांच्या मर्जीबिगर बाहेर जात नाही़ गावात एकोपा असतो़ एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची भावना असते़ दुसºयाची दु:ख वाटून घेण्यासाठी रात्री जागण्यात येतात़ मरणधरण, लग्न अशाप्रसंगी वाट्टेल ती मदत करण्याची तयारी असते़ गावाच्या एका टोकावरून आलेली हाक कानात साठवून घेत हातातली कामं सोडून मदतीला क्षणात हजर होण्याची ताकद केवळ गावकºयांतच असते़ आपला-परका, कपट, द्वेष, स्वार्थ, गर्व,अभिमान हा भेद तिथं नसतोच; पण सावधान गाव आता बदलतो आहे़

गावाच्या चारित्र्याला ‘डाग’ लावला तो राजकारणाने!  फार पूर्वी गाव हे स्वयंशासित, स्वयंसंचालित अशी संस्था होती़ गाव मस्त होतं़ स्वविकास साधत होतं़ बाह्यहस्तक्षेप तिथं होत नव्हता़ गावकरीही ते सहन करीत नव्हते़ मात्र, जिल्हा पातळीवरील राजकारणाने बोट लावलं़ हे राजकारण गावात घुसलं़ राजकीय पक्षानेही आपापल्या चुली मांडल्या़ गावात ही तशी नवीच समस्या होती़ सुरुवातीला कुणीही शेकलं नाही़ मात्र, 

त्यांनी चार बूक शिकलेल्यांना हातीशी धरले़ त्यानंतर गट पडले़ तट पडले़ बाहेरच्या ‘पांढºया बगळ्यां’ची संख्या वाढली़ गावातलं खाद्य त्यांना आवडतं गेलं़ तेही त्यांच्या पचनी पडलं़ इथं प्रदूषण नव्हतं़ त्यामुळं आरोग्याला चांगलंच मानवलं़

गावाचा सरपंच बिनविरोध निवडून येण्याचं तंत्र गेलं़ निवडणूक रंगू लागली़ बाहेरच्या राजकारण्यांनी गावात दारू आणली, मटका आणला, जुगारही आणला़ पार्ट्याही आणल्या़ ग्रामपंचायत निवडणुकीत पैश्यांनी जोर  केला़ दारूच्या शिश्या, लुगडं,धोतरं हातोहात घरांघरात पोहोचतं झालं़ अशिक्षितांना आपल्या बाजूनं वळवलं़ मतांचं महत्त्व त्यांना कळू दिलं नाही़ ते त्यापासून अलगच राहावे,यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले़

निवडणुकीत बाहेरच्यांच्या गटाचा विजय झाला़ तो कसा हे सर्वांनाच ठाऊक होतं़ करणार काय?बुडाशीच कोलीत लावून घेतलं़ ते केव्हाही पेट घेणार हे त्यांना उमगून आलं़ झालं गावातली मन नासली़ शंकेखोर वातावरण तयार झालं़ जो-तो इतरांकडे संशयीवृत्तीने पाहू लागला़ बाहेरच्यांना मात्र हक्काचं घरच मिळालं़ राज्याच्या खुर्चीत बसण्यासाठी गावाचा चांगलाच उपयोग होणार होता़ 

पंचायत समिती़, जिल्हा परिषद आणि विधानसभा, लोकसभेतील खुर्चीसाठी त्यांनी सरपंचाला हाताशी धरलं़ काही वर्षांपासून सरपंचपद हे गावकºयांच्या भल्याशी झटत होतं़ आता मात्र स्वत:च घर कसं भरेलं,याचं चिंतन होताना दिसत आहे़ गावातल्या नाल्याचं, कोंडवाड्याचं, पाण्याच्या टाकीचं बांधकाम करताना त्यातील सीमेंट, रेती, विटा या सरपंचाच्या घशात ओतण्यात येत आहे़ जमाखर्च अगदी बरोबर दाखविण्यात येतो़ यात ग्रामसेवकही आपले हात ओले करून घेत आहे़ भरीसभर हा सरपंच जिल्ह्याच्या राजकारण्यांच्या दावणीला बांधला गेला आहे़ मुंबई, दिल्लीच्या वाºया करतो आहे़ कधीकाळी गावाच्या विकासासाठी समोरचे ताट बाजूला सारून धावून जाणारा हा पुढारी आता दुसºयाचा घास  पाहून लाळ घोळतो आहे़

आता ‘ते’ दलालही बनले

जिल्ह्याच्या राजकारणात भाव न मिळालेल्यांनी नवा फंडा तयार केला़ गावातील शेतजमिनी विकत घेण्यास सुरुवात केली़ बसमार्गावरील शेतीवर त्यांचा चांगलाच डोळा होता़ महत्त्वाच्या मार्गावरील गावात त्यांनी हातपाय पसरविणे सुरू केले़ गावातील काही ऐतखाऊ आणि आळशी शेतकºयांनी त्यांच्या इच्छेला खतपाणी दिले़ आता गावात नवीनच वर्ग जन्माला आला़ स्वत:ला ते आता ‘लँड डेव्हलपर’ किंवा ‘बिल्डर’ असे उपनाव देत गेले़ मात्र, ते ‘भू माफिया’ ठरले़ काळ्या आईचा बाजार मांडणारे दलाल ठरले़ गरीब शेतकºयांच्या शेतजमिनी घेण्यासाठी त्यांनी खास माणसे तयार केली़ पिकाचे उत्पादन कसे कमी होते, ती परवडत का नाही,याबाबत ते पुराव्यानिशी ‘मार्गदर्शन’करू लागले़ ही कामे त्यांनी गावातील माणसांवरच सोपविली़ पैश्यांची चटक लावून देण्यात ते तरबेज होते़ वेळप्रसंगी धमकाविण्याचेही प्रकार घडले़ एखाद्याने जमीन देण्यास नकार दिल्यास त्याच्या शेजारची मिळवू लागले़ त्यामुळे पहिला त्रस्त होत आपली शेतजमीन संबंधितांना विकू लागला़ गावातील जमिनी ताब्यात घेण्याचा जणू चंगच त्यांनी बांधला आहे़ तालुकापातळीवरील गावात त्यांना सिमेंटची जंगले उभी करायची आहे़ शहरातील गुन्हेगारी गावातही पोसायची आहे़  जिवापाड जपलेली जमीन हडपण्यात येत आहे़ ही कीड आता गावोगावी लागली असून त्यापासून वेळीच सावध होणे गरजचे आहे़ 


© संजय इस्तारी मुंदलकर