Wednesday, 15 February 2023

मानवाने आपल्यातील जनावर बाहेर काढलाच ...

 

मानवाने आपला मूळ स्वभाव सोडला नाही. तो आधुनिक झाला असला, कितीही तंत्रज्ञानाच्या बाता मारत असला, तरी यासाठी तो कधीचाच जनावर होऊन निसर्गाच्या विरोधात गेला आहे. आणि मग त्याच्या करणीमुळे पूर, महापूर, चक्रीवादळे, भूकंप, ओला आणि कोरडा  दुष्काळ असे अस्तित्वहीन करणारे संकटे कोसळत आहेत. 


मानव उत्क्रांतीतून निर्माण झाल्याचे सांगण्यात  येते़ तो  माकडापासून बनला, असेही ऐकत आलो आहोत़ अर्थातच आपली उत्पत्ती ही प्राणी वा जनावरापासून झाली. आताच्या युगात ही उत्पत्ती मानवात रुपांतरित झाली असली तरी  मानवाने आपला मूळ स्वभाव सोडला नाही. तो आधुनिक झाला असला, कितीही तंत्रज्ञानाच्या बाता मारत असला, तरी यासाठी तो कधीचाच जनावर होऊन निसर्गाच्या विरोधात गेला आहे. आणि मग त्याच्या करणीमुळे पूर, महापूर, चक्रीवादळे, भूकंप, ओला आणि कोरडा  दुष्काळ असे अस्तित्वहीन करणारे संकटे कोसळत आहेत. अगदी त्याने स्वत:ला जिवंत ठेवणारा हवेतील आॅक्सिजन सुद्धा नासवून ठेवला. तहान भागविणारे पाणी सुद्धा दूषित केले. मागील  ६ फेब्रुवारी  रोजी तुर्की आणि सीरिया या दोन देशांमध्ये आलेला भूकंप तेच सांगतोय. 

NAVANTIKA ... SANJAY MUNDALKAR STORY एखाद्यावर प्रेम करणे म्हणजे प्रामाणिक मनानं देवाची प्रार्थना करण्यासारखं आहे. भाग १

सहा महिने नव्हे तर चक्क दोन वर्षांच्या कालावधीत त्यांच्यात केवळ संवाद व्हायचा. चेहरा बघितलाच नाही. छायाचित्रातून तो पाहण्यात आला. तिला भेटण्याचा क्षण आला नाही, असेही नाही. तिच्यासोबतच्या बोलण्यातून तिचं सर्वांग मन निर्भय अनुभवायचा़ तिचा कण कण प्रत्यक्ष रूपात भासायचा, श्वास न श्वास, रंग आणि गंध तो प्राशून घ्यायचा. 




माणसाच्या मनात प्रेम काठोकाठ भरून जाते, तेव्हा स्वाथार्साठी कणभरही जागा उरत नाही. प्रेम ही समर्पणाची, त्यागाची भावना. म्हणूनच आपण प्रिय व्यक्तिला आनंदी बघण्यासाठी काहीतरी मार्ग शोधत राहतो. कुणीतरी म्हटलंय, एखाद्यावर प्रेम करणे म्हणजे प्रामाणिक मनानं देवाची प्रार्थना करण्यासारखं आहे. प्रेम हे सुखाचं घर, आगर आहे. प्रेमाचा खरा अर्थ जीवऩ  त्याशिवाय कुणीही जगणं, श्वास घेणं अशक्य आहे.


निर्भयच्या प्रेमाची गाथाच वेगळी़़़ साधारणपणे कुणी एकानं वा कुणी एकीनं त्याला किंवा तिला पहिल्या नजरेनं पाहिल्यास प्रेम होऊन बसते़ जीव जडतो़... कासावीस होतो. निर्भयनं तर तिला बघितलंच नाही़  महिना, सहा महिने नव्हे तर चक्क दोन वर्षांच्या कालावधीत त्यांच्यात केवळ संवाद व्हायचा. चेहरा बघितलाच नाही. छायाचित्रातून तो पाहण्यात आला. तिला भेटण्याचा क्षण आला नाही, असेही नाही. नियतीनं नित्या आणि निर्भयला दोन ते तीन फुटांपर्यंत समोरासमोर आणले सुद्धा; परंतु तो तिचा चेहरा बघू शकला नाही़  


तिच्यासोबतच्या बोलण्यातून तिचं सर्वांग मन निर्भय अनुभवायचा़ तिचा कण कण प्रत्यक्ष रूपात भासायचा, श्वास न श्वास, रंग आणि गंध तो प्राशून घ्यायचा. ‘ती खूप सुंदर आहे. तिच्या चेहºयावर भाळलो’, असा सर्वसामान्याचा अनुभव त्याला आला नाही. तरीही प्रेम होऊन बसले, अगदी निस्सिम! नित्या तिचं नाव.


file photo

...काळ असा पुढं सरकत गेला की, निर्भयनं नित्या आणि निरजला स्वीकारलं. या दोघांच्या जोडीला निधी आणि निहारिका अशा दोघी दुसºया बाजूला होत्या. ही चौघे एकत्र बंधनात आली, तेव्हा यातील दोघींची मनं कोसळली. त्यांना वाळवंटात उभं असल्याचा भास झाला़  


नित्या आणि निरज मात्र स्थितप्रज्ञ होते, त्यांना निश्चितच हिरवळीची गरज होती. आधाराची, प्रीतीची गरज होती. निर्भय तर अशा परिस्थितीतून तावून सुलाखून निघाला होता. भविष्यातील वावटळ, वादळांबद्दल त्याला अगोदरच जाण होती. त्यामुळं तो या चौघांना घट्ट धरून होता. निरज रक्ताचा नसूनही त्याला प्राणप्रिय होता आणि रक्तातून जन्मलेली निहारिका त्याचा जीव की प्राण होती ..



NAVANTIKA_SANJAY MUNDALKAR













लेखक : संजय मुंदलकर

कथा :   नवंतिका

    जिथं प्रेम हाच देव्हारा ...

            ही कथा सलग नाही

            छायाचित्र प्रतिकात्मक  

            (सर्वाधिकार सुरक्षित)

वाचनाचे महत्त्व नाकारणार तरी कसे?

 दोन  शब्दांने  काय  आणि  किती  खोल  किमया करून परिणाम साधला, हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अभ्यासातून आपण वारंवार अनुभवत आहोत. अक्षराने किमया साधली म्हणूनच जग आजची घडी पाहत आहे़ आणि म्हणूनही लिखाण आणि वाचनाची प्रवृत्ती  प्रत्येकाच्या अंगी असावीच. ती असली म्हणजे वाचकाच्या ज्ञानात आणि प्रगल्भतेत वाढ होते. वाचनामुळे लेखनाची सवय व कल्पनाशक्तीला देखील वाव मिळत असतो. वाचनामुळे रसिकता, सृजनशीलता वाढीस लागते. दुसºयाच्या भावनांविषयी आदर निर्माण होतो. यासारखे अनेक सकारात्मक बदल वाचनामुळे जीवनात होत असतात. 

आज मनुष्याजवळ असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी ताकत आहे़ आणि ती प्रत्येक शब्दांतून  पुढे  आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने ह्यज्ञानासक्तह्ण व्हावे, ती सक्ती मानू नये. या ज्ञानाच्या  सहाय्याने  माणूस प्रगल्भ आणि  समृद्ध तर होतोच आणि त्याचा प्रभावही त्याच्या सर्वांग कार्यशैलीवर पडत असतो. यामुळेच ह्यवाचाल तर वाचालह्ण ही म्हण आजच्या  पिढीला खूप  समर्पक आहे, याची जाणीव होते. 


नव्याने  येणाºया प्रत्येक पिढीत काही  ना काही प्रगती ही होत असते. आजची पिढी इंटरनेट, टी.व्ही., कॉम्प्युटर, स्मार्ट फोन, लॅपटॉप अशा तांत्रिक आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकल्याने वाचनापासून दूर गेली आहे. निवांतपणा मिळाला तरी सुद्धा मोबाईल, कॉम्प्युटर, टॅब, टी.व्ही. अशा मनोरंजनाच्या ह्यतांत्रिक साहित्याह्णत डोके घालून बसलेली पिढी आपण बघत असतो. याच पार्श्वभूमीचा सखोल विचार करून आणि  विविध गॅजेट्सच्या मागे धावणाºया  तरुण पिढीने  किमान  दिवसातील एक तास तरी वाचनासाठी देणे गरजेचे आहे. कारण कोणतेही वाचन हे मनावर कायम ठसत असते. त्याचा खोल प्रभाव रुतत जात असतो.


वाचनात आंबट कढी असे दोन शब्द आल्यास आपल्या मेंदूवर आंबट ही चव कायमची कोरली जाते आणि त्याचवेळी जीभ सुद्धा वळवळते़ असे का होते, याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. हा अनुभव आपण प्रत्येक आठवड्यात घेत असेल तर वाचनात तर कित्येक रंग आणि चविष्ट बाबी ओतप्रोत असतात, मग आपण या नैसर्गिक आस्वादापासून दूर का? वाचन मनाला सुसंस्कृतपणा,विचारप्रगल्भता आणि संशोधनवृत्ती  बहाल करते़  आणि  या वृत्तीतूनच साखळी तयार होत जाते, निरंतर विकासाची! मानवाने लिखाण, वाचनाची किमया साधली़़़सांधली सुद्धा; परंतु  तिचा प्रवाह सुद्धा खंडित केला, हे ही दुर्दैव स्वीकारावे लागते आणि तेही या आधुनिक युगात. दुसरे असे की आपण दिव्यांगांना जर डोळस करून वाचनाची दिव्यदृष्टी देत असेल, तर हा प्रवाह संपवण्याचा अधिकार आपणास कसा? 


महासत्ता होण्याच्या मार्गावर असणाºया देशाची  खरी शक्ती  ही देशातील तरुणाई असेल, असे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम  यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून सांगितले आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव  आदींमुळेच डॉ. कलाम यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. डॉ. कलाम यांचे  लेखन आजही आपणास स्फूर्ती व प्रेरणा देणारे आहे. डॉ. कलाम यांनी युवापिढीप्रति दाखविलेल्या विश्वासाला प्रत्यक्षात आणण्यासाठी व प्रगतीशील आणि सुसंस्कृत, सकारात्मक विचारांची पिढी घडविण्यासाठी वाचनाचे  महत्त्व नाकारणार तरी कसे? कुणालाही अवांतर वाचनासाठी वेळ मिळत नाही, अशी सबब पुढे येता कामा नये. वाचन हे व्हावेच़ मग ते वृत्तपत्र, असो जुने-नवे पुस्तक असो. पुढील काळ संस्कारांचा हवा असेल, तर चांगलेच वाचनच नव्हे तर चांगले लिखाण सुद्धा अभिप्रेत आहे. जर कुणी वाचनासाठी सक्ती करत असेल तर, ती स्वीकारणेही तितकीच मोठी जबाबदारी पार पाडण्यासारखे आहे, असे वाटते.

संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित)