Saturday, 14 March 2026

JOCKS........... बायको नूतन आणि नवरा संजय यांच्यातील सकाळचा संवाद...

 



बायको नूतन आणि नवरा संजय यांच्यातील सकाळचा संवाद...


नूतन : काल तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता.


संजय : नाही गं!


नूतन : मी ऐकल्या. तुम्ही झोपेत मलाच शिव्या देत होता.


संजय : तुझा गैरसमज आहे.


नूतन : कसला गैरसमज ?


संजय : हाच, की मी झोपलो होतो.

***

बंकी : मला तुझे दात खूप आवडतात

निक्की : अय्या खरंच!

बंकी :  अगं हो... कारण पिवळा माझा फेव्हरेट रंग आहे़

***

शिक्षक : मुलांनो, निष्पाप आणि मुक्या प्राण्यांवर आपण प्रेम करायला हवे!


विद्यार्थी : हो ऽऽऽ सर

शिक्षक :  मी जर कुण्या माणसाला, एका निष्पाप गाढवाला मारहाण करताना बघितलं, तर अशावेळी मी काय करावं?


विद्यार्थी : त्याला थांबवायला हवं.



शिक्षक : बरं,मी त्याला मार खाण्यापासून वाचवले, तर ही बाब काय दर्शवते?


विद्यार्थी (एका स्वरात) : भाऊबंदकी

***

चंकीनं त्या सुंदर मुलीला विचारलं, तुम्ही कुठं राहता?


मुलगी : नूतन्स सिव्हिल रोड


चंकी : इतक्या सुंदर असूनही तुम्ही रोडवर राहता!


*****

Friday, 13 March 2026

JOCKS................आपण या दोघांकडं रागानं आणि एकटक पाहूच शकत नाही

 



नवरा जय कार्यालयात...बायको नित्या घरी...

जय : काय सुरू बाईसाहेब

नित्या : रील बघत होते.

जय : काय हे,पूर्ण दिवस इंटरनेटवर घालवतेस.

या व्यतिरिक्तही बाहेर सुंदर जग आहे, ते बघ.

बायको : ठीक आहे, लिंक पाठवा.

***

बायको आणि सूर्यात काय साम्य आहे? 

.

कितीही प्रयत्न केला तरी,आपण या दोघांकडं रागानं आणि एकटक पाहूच शकत नाही.

***

एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते. लोकं जोरजोरात बोली लावत असतात...

.

१० लाख...

.

१२ लाख...

.

१५ लाख...

.

गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो, या खटारा गाडीचे एवढे पैसे का...?

विक्रेता : अहो, या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी १० अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृत्यू होतो...

.

गोलू: २० लाख...

***

लग्न झालेल्यांसाठी हा एक प्रश्ऩ.

उत्तर फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ असेच द्यायचे.

आता प्रश्न असा, की आता तुमच्या बायकोनं तुम्हाला

मारणं बंद केलं आहे का ?

*****

Thursday, 12 March 2026

JOCKS..............मला दोन डोळे दिले आहेत. तसे तुम्हाला ३२ दात पण दिले आहेत.

 



पती ( संजय ): देवानं तुला दोन डोळे दिले आहेत ना, तांदुळातील खडे काढता येत नाहीत ? 

 भात किती कचर कचर लागतो...


पत्नी (नूतन)  : मला दोन डोळे दिले आहेत. तसे तुम्हाला ३२ दात पण दिले आहेत. 

मग तुम्हाला २-४ खडे चावता येत नाहीत का ?


***


घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू असते...


वकील सोडे: एवढं काय झालं की मधुचंद्राच्या रात्रीच तुम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला?


पक्या : मी बायकोला लाडानं म्हटलं, जरा चेहºयावरचा पदर बाजूला कर. तर, ती म्हणाली तुम्हीच करा.


तेव्हाच समजलं, की ही बाई एक नंबरची कामचोर आहे.


***

बंकी: काल तुझा मूड आॅफ होता माझ्याशी बोलताना आणि आज एकदम मूडमध्ये ?


चंकी: यार, काल बायकोनं २० हजार रुपये साड्यांवर उडवलेत.


बंकी: मग आज मूड आॅन कसा ?


चंकी: अरे, आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीयं. 


*****

Wednesday, 11 March 2026

JOCKS.................... काल माझ्या बायकोचा वाढदिवस होता. आणि मी तिच्यासाठी केक आणला होता

 




खंड्या: तुझा डोळा का सुजलाय रे?


बंड्या : काल माझ्या बायकोचा वाढदिवस होता. आणि मी तिच्यासाठी केक आणला होता.


खंड्या: अरे, त्याचा डोळा सुजण्याशी काय संंबंध?


बंड्या : अरे, त्या केकवाल्यानं घोळ घातला. बायकोचं नाव तपस्या आहे, अन् त्या मूर्खानं ‘हॅप्पी बर्थ-डे समस्या’ असं लिहिलं...

***

कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला नसता... 


कारण बायकोने विचारले असते.


कुठे चाललात?


कोणा बरोबर?


कसे जाणार?


... काय शोधायला जातायं?


इकडे मिळणार नाही का?


नेहमी तुम्हीच का?


मी इथे एकटी काय करू?


मी पण येऊ का?


.

.

.

कोलंबस: आता मीच रद्द करतो तिकडं जाणं...

 

***

बळवंतराव एक दिवस अचानकच गेले...


त्यांच्या बायकोनं एका वृत्तपत्राला फोन करुन ‘ते’ गेल्याची जाहिरात द्यायची ठरवले.


त्यांनी फोन करुन सांगितले, जाहिरातीत छापा बळवंतराव आज सकाळी अचानक गेले.


पलीकडून जाहिरात घेणारा म्हणाला, अहो, शब्द फारच कमी होतात. यात काही शब्द वाढवा.

बायको म्हणाली, तर छापा,बळवंतराव आज सकाळी अचानक गेले. त्यांची सायकल विकायची आहे.


*****

Friday, 7 February 2025

CHHAVI JOCKS_SANAJY MUNDALKAR दुधात साखरेऐवजी गूळ घातला तर चालेल का?



नित्या : मला आज बर वाटत नाहीयं.

संजय: अरेच्चा!  पण, मी  तर  तुला शॉपिंगला नेण्याचा 

विचार करत होतो.

नित्या : जानू!  मी  गंमत करत होते.

संजय:  हो का!  मी पण गंमतच करतोय.

चला उठा आता आणि जेवणाचं बघा, पोटात कावळे ओरडतायेत.

***

 बिना टिकट यात्रा करने के जुर्म में एक बाबा को  चेकर ने 

पकड़ लिया.   इसके बाद...

चेकर : टिकट दिखाये, बाबा?

बाबा : नहीं है।

चेकर : जाना किधर है?

बाबा :  जहाँ मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम का जन्म  हुआ है.

चेकर : अच्छा, अब मैं आपको पहुंचा देता हूं.

बाबा :  कहां?

चेकर : जहां, बांसुरीवाले का जन्म हुआ है.


***

 नाम्याची सौभाग्यवती  सुभद्रानं दुधात चपातीचा 

चुरा कालवलेला फोटो  सोशल मीडियात शेअर केला.

यानंतर या रेसिपीबद्दल असे काही विचारेल, याबाबतचा तिनं स्वप्नात  सुद्धा विचार केला  नसेल. काही प्रश्न  उपस्थित केले.

पहिली : दुध गायीचे घ्यायचे का म्हशीचे?

दुसरी : चपाती चा चुरा हाताने करायचा की यंत्राने?

तिसरी : एका चपातीला किती दूध घ्यायचे?

चौथी : दुधात साखरेऐवजी गूळ घातला तर चालेल का?

पाचवी : एका चपाती चुºयासाठी किती चमचे साखर वापरता येईल?

सहावी : दूध थंड घ्यायचे का गरम?

सातवी : चपातीऐवजी भाकरी घेतली तर चालेल का?

आठवी : चपाती ताजी हवी का शिळी?

नववी : चपातीसाठी गहू दळून आणायचे की विकतचे पीठ चालेल?

एकीनंच तर  हद्दच केली़ तिनं विचारलं,

गहू रेशनचे हवेत की दुकानातील...



संजय इस्तारी मुंदलकर

NOOTANS SNAP_SANJAY MUNDALKAR आयुष्यात वळण नसेल, ते जगणं म्हणता येणार नाही़

 

umred road 

आयुष्य हा रस्ता आणि रस्त्याला वळणं येणारच.

ते कसं पार करायचं, हे आपण आपलं ठरवायचं.


जगातील कुठलाही रस्ता खाचखळग्यांनी भरलेला नसेल, असं सांगणं जरा हिम्मतीचं ठरेल.

त्याच धर्तीवर आयुष्यात वळण नसेल, ते जगणं म्हणता येणार नाही़

गोडीच्या संगतीनं आंबट असावंच आणि आंबटच्या संगतीनं तुरट आणि त्यासंगतीनं 

फिक्कट...


चव आणि बेचव याची रंगतच म्हणजे आयुष्य...



संजय इस्तारी मुंदलकर

Thursday, 6 February 2025

NOOTANS SNAP_SANJAY MUNDALKAR वाहतूक नियम न पाळल्याचा हा समाजावर झालेला परिणाम खोल असतो़

 

रस्त्यांवर वाहन चालविताना कुणाला कायदे पाळण्याची, समाजाप्रति कर्तव्यभावना असती, तर

नक्कीच भारतात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू झाला नसता.


वाहतूक नियम न पाळल्याचा हा समाजावर झालेला परिणाम खोल असतो़

दहा मिनिटांत बाजारातून भाजीपाला घेवून येतो, असं सांगणारे बाबा थेट रुग्णालयात 

पोहोचल्याचा निरोप येतो.

सहज फिरावयास गेलेले आजोबाचे शवच घरी आणावे लागते.


आपल्या बाळाला शाळेत पोहोचवून परतणारी कुण्या 

आईचा अपघात झाल्याची बातमी ऐकावयास मिळते.


का होतंय असं? 

कशात रममाण आहोत आपण, की रस्त्यांवर वेगात असलेला ‘यम’बनलोय!

एक हसतं खेळतं कुटुंब कुणाच्या बेजबाबदारीमुळे क्षणात उद्ध्वस्त होतं.


प्रत्येकानं वाहतूक नियम पाळावा...



संजय इस्तारी मुंदलकर

Saturday, 1 February 2025

NOOTANS SNAP_SANJAY MUNDALKAR विकास आणि प्रगती त्याच ठिकाणी दिसून येते, जिथे संकेतांचे पालन केले जाते़

 



दोन  कट्टर शत्रूंच्या युद्धात कुण्या सैनिकाने हाती पांढरे निशाण घेवून 
शरणागती स्वीकारल्यास त्याला अभय देण्यात येतं. अर्थात त्याला केवळ बंदी बनवण्यात येतं़
त्याचे प्राण सुरक्षित ठेवण्यात येते, हा एक संकेत असतो आणि जगभरातील
युद्धभूमीत तो पाळण्यात येतो.

संकेत, नियम, अट या बाबी जगाच्या पाठीवर अनन्य साधारण महत्त्व प्राप्त केलेल्या आहेत. त्यांच्या संकल्पना वा पाळण्याच्या धारणा वेगवेगळ्या असल्या तरी मतितार्थ शिस्त हाच असतो.

व्यवहार असो, प्रशासन असो वा कुण्या देशाचा कारभार असो, संकेत वा नियम पाळावेच लागतात.

विकास आणि प्रगती त्याच ठिकाणी दिसून येते, जिथे संकेतांचे पालन केले जाते़

आपल्या देशात वाहतूक नियमांचे संकेत न पाळल्याने होणारी जीवितहानी कधीही भरून
न निघणारी आहे़ शासकीय स्तरवरही ते मान्य झाले आहे़

छायाचित्र पहा़ हा टँकर एका रसायनाने भरून आहे.
नादुरुस्त असल्याने ते वाहन रस्त्यातच धोकादायक स्थितीत उभे ठेवण्यात आले आहे.

कारण संबंधित चालकाने अन्य वाहनांना देण्यात अपेक्षित असलेला इशारा दिलेला नाही.
अर्थात संकेत पाळलेले नाही.

अर्थात काही नुकसान झाल्यास ते भरून निघणार नाही.

संजय इस्तारी मुंदलकर

Sunday, 25 August 2024

प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीचे सोशल, एज्युकेशनल, एम्लॉयमेंटल आॅडिट व्हावे

शासन-प्रशासनाकडून प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीचे सोशल, एज्युकेशनल, एम्लॉयमेंटल  (एसईए) आॅडिट ही सध्याच्या आणि भविष्यातील मोठी गरज ठरणार आहे़ कारण भारतातील मोठे मनुष्यबळ  या विद्यार्थ्यांत आहेत, हे कदापिही  विसरता कामा नये.




बालवाडी, अंगणवाडी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, यानंतर कनिष्ठ महाविद्यालय, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण, उच्च शिक्षण, उच्च तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय  शिक्षण, व्यवस्थापन शिक्षण असे विविध टप्प्पे आहेत़ म्हणूनच मोठा आवाका असलेल्या या क्षेत्रात गैरव्यवहार, भ्रष्टाचार, बोगस  संस्था, बोगस  पदव्या, कर्मचाºयांची फसवणूक, वेतनाबाबत पिळवणूक अशी गुरफटलेली समीकरणे दिसून येतात. आपल्या देशात सरकारकडून संरक्षण क्षेत्रानंतर शिक्षण क्षेत्रासाठी  सर्वाधिक तरतूद करण्यात येते आणि त्यावर खर्चही मोठ्या प्रमाणात करण्यात येतो़  भारतीय शिक्षणात अनेक टप्पे आहे़  त्यावर कितपत अंमलबजावणी करण्यात येते, हा भाग वेगळा़ 


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बोगस शाळांचा मुद्दा गाजत होता. त्यामुळेच  प्ले स्कूल, प्री प्रायमरी, केजी, नर्सरी शाळा याबाबत शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहर, गावागावांत तयार करण्यात आलेल्या प्ले स्कूल, प्री प्रायमरी, केजी, नर्सरी शाळा  (या सर्व आपल्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत.) यांच्यावर  पुढील  काळात शिक्षण विभागाचे नियंत्रण  राहणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अशा शाळा सुरू करताना शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक असेल. या संदर्भात शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, इतकेच पालक, शिक्षक आणि विद्यार्थी आणि समाजालाही मोठी आणि क्रांतिकारक अशी जबाबदार पार पाडावी लागणार आहे.


शाळा असो महाविद्यालये वा उच्च शिक्षण देणाºया संस्था, यावर आतापर्यंत शिक्षण विभागाचे  कोणतेही  नियंत्रण  नसल्याने  मनमर्जी कारभार पाहायला सर्वांनी अनुभवला. शिक्षणाच्या नावाखाली अवाजवी फी ची मागणी, मनमानी पद्धतीने शाळांचे संचालन या सर्व बाबींवर प्रशासनाचे नियंत्रण नव्हते, असे म्हणणे धाडसाचे धरणार नाही. अशातच आता शिक्षण विभागाने अंगणवाड्या  प्राथमिक  शाळांना  जोडण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. याशिवाय प्ले ग्रुप, नर्सरी, बालवर्ग, केजी आदी वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानी घेणे अनिवार्य केले आहे. मुलांना वयानुसार, मानसिक विकासानुसार शिक्षण देणे बंधनकारक असल्याचा  निर्णय  नवीन  शैक्षणिक धोरणानुसार घेण्यात आला आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे मूल्यमापन  होणार असल्याची माहिती आहे. 

मागील १५ ते २० वर्षांच्या कालावधीत खासगी पद्धतीने नर्सरी, केजी अशा वर्गांच्या  शाळा चालवण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले आहेत. तर, अंगणवाड्या असताना देखील आपल्या मुलांना नर्सरी, केजीसह इतर वर्गात पाठवण्याची मानसिक पालकांमध्ये दिसून आली़ याच बाबीचा गैरफायदा घेत अनेक संस्थाचालकांकडून वाजवी शुल्क घेणे, मनमानी पद्धतीने शाळा चालवणे असे प्रकार प्रकार समोर येत होते. त्याच्या घरी रंगीत टीव्ही, दुचाकी  वा  कार म्हणून आपल्याही  घरी हवे, त्याचा मुलगा/ मुलगी  सायन्सला  म्हणून मुलगा/ मुलीने सायन्स अभ्यासक्रम घ्यावा, असा अट्टहास (की वेडेपणा) करणाºया पालकाने आपल्या पायावर अनेक दगड पाडून घेतले. यात समाजातील किती पालकाचे नुकसान झाले, त्याची गिनती नाही़ शासनाने वा प्रशासनानेही कधी त्याचा आढावा घेतला नाही. परिणामी ‘बेरोजगारी’ निर्माण करणाºया शिक्षणसंस्था  निर्माण  झाल्या़ 


एखाद्या  शाळेचा  वा महाविद्यालयातील  विद्यार्थी वा विद्यार्थिनी  पुढील आयुष्यात  काय करतो, तो कुठे आहे, त्याचे समाजात अस्तित्व आहे की नाही, याबाबत  कोणत्याही  शिक्षण  संस्थेने  हिशोब  ठेवला नाही. किती विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेली, ही नोंद  समाजाकडेही नाही. त्यामुळे आता बालकाने शाळेच्या आवारात पाय ठेवताच अर्थात विद्यार्थी म्हणून नोंदणी होताच, त्याला  एक ‘युनिव्हर्सल स्टुडंट कोड’ (यूएससी)  मिळावा़ हा  क्रमांक  त्याला शिक्षण सुरू असताना आणि नंतरच्या आयुष्यातही कायम अस्तित्वात असेल़ 

वैयक्तिक आकडेवारीसह कौटुंबिक  माहितीचा त्यात समावेश असेल. परिणामी जात प्रमाणपत्र,  अधिवास, राष्ट्रीयत्व अशा प्रमाणांची गरजच पडणार नाही़ वडिलांच्या अधिकृत माहितीवरून ही माहिती आपोआप ‘यूएससी’मध्ये नोंदविता येणार आहे़  काही  ठराविक वर्षांनंतर काही माहितीत बदल करता येणे शक्य आह़े  (जसे, छायाचित्र, विवाहित आदी)  संबंधित विद्यार्थ्यासमोर याद्वारे कुठलीही अडचण  उभी राहणार नाही़ कोणता विद्यार्थी वा विद्यार्थिनी शाळाबाह्य  झालेली आहे, त्याला रोजगार मिळालेला आहे वा नाही, ही बाब तत्काळ  समजून येईल.



विद्यार्थी जीवनात हुशार असलेली  मुले प्रवाहाबाहेर गेल्याचे आणि त्याचवेळी  वशिला किंवा पैशांच्या जोरावर अभ्यासातील कच्ची मुले  त्यांच्या किती तरी पुढे गेल्याचे याच समाजाने अनुभवली आहे, अनुभवत आहेत. आता  प्रत्येक  डोक्याची आकडेवारी  ठेवावी  लागणार आहे, तेव्हाच खर्च केलेला पैसा  सशक्त मनुष्यबळाच्या स्वरूपात वसूल  होईल.




शासन-प्रशासनाकडून प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीचे सोशल, एज्युकेशनल, एम्लॉयमेंटल  (एसईए) आॅडिट ही सध्याच्या आणि भविष्यातील मोठी गरज ठरणार आहे़ कारण भारतातील मोठे मनुष्यबळ  या विद्यार्थ्यांत आहेत, हे कदापिही  विसरता कामा नये.


सर्वाधिकार

संजय इस्तारी मुंदलकर


( सर्व छायाचित्रे : Google Courtesy)

 

Monday, 19 August 2024

सदा न् कदा वाचावेसे वाटणारे ‘जोक्स’

जोक्स अर्थात चुटकुले. 

धीर गंभीर वातावरणात ओठांवर हसू आणणारे शब्द ...

काही प्रसंगातून आपोआप विनोद आपल्यापर्यंत पोहोचत असतो. 

खालील जोक्समधून त्याचा नक्कीच आनंद घेता येईल.




सध्या काहीच काम धंदा नाही आहे, म्हणून सर्व मित्रांच्या लग्नाच्या आणि त्यांच्या वाढदिवसाच्या तारखा लिहून घेत होतो...

मी पहिल्या मित्राला कॉल केला आणि विचारलं, तुझ्या  लग्नाचा वाढदिवस कधी असतो रे ?

त्यावर तो बोलला, एकच मिनिट थांब हं...भांडीच घासतोय, तांब्यावर बघून सांगतो.


***


2.

नामदेव : अगं कुठं आहेस?

राधा : कुठं  म्हणजे...तुमच्या हृदयात.

नामदेव :किती वेळा सांगितलं तुला़  गर्दीच्या ठिकाणी 

जाऊ नकोस म्हणून...


***

3.

आज  तुझी दाढी मी करणार, असं ती म्हणाली... 

मग काय बंट्याला ते फार रोमँटिक वाटलं.

.

वस्तरा गळ्यावर असताना तिनं विचारलं...

.

...ही अभिलाषा कोण रे?


***

4.

पप्पी : काय हो... इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलतायं...

व्यंकी :  बहिणीशी...

पप्पी : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं...?

व्यंकी : अग माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय... 

                                                                                                             

 ***


5.

मनिलाल : जल्दी से एक गिलास ज्यूस दो, लड़ाई होने वाली है.

ज्यूस पीने के बाद...

मनिलाल : एक गिलास और ज्यूस दो, लड़ाई होने वाली है.

ज्यूसवाला :  लड़ाई कब होगी?

मनिलाल :  जब तुम पैसे मांगोगे


***

6.

पत्नी : सुनते हो, मेरी बेटी को परीक्षा में पूरे 99 नंबर मिले है

पती : .. और बाकी का एक नंबर कहाँ है?

पत्नी : वो आपका बेटा लाया है



संजय इस्तारी मुंदलकर

‘ सर्व कळतं रे, पण ते करता येत नाही़ ... ’

धूम्रपान केल्यामुळे मानसिक तणाव दूर होतो, असा गैरसमज  ‘कुट कुट के  ’ भरला  आहे.  वस्तुस्थिती  याउलट असते.  कारण  मृत्यूच्या  दिशेने टाकलेली  त्यांची पावले संथ गतीने आपला मार्ग  कापत  असते. तंबाखू जाळून निघालेल्या धुरामध्ये निकोटीन टार, कार्बन मोनोआॅक्साईड असे घातक घटक  माणसाच्या   मन  आणि   शरीरावर  दुष्परिणाम करत असतात. दुसरीकडे जे लोक धूम्रपान करत नाहीत, त्यांच्यामध्ये उत्साह  अधिक  असतो. 




अनेकदा अन्य कुणासोबत  संवाद  साधताना  ‘सर्व  कळतं रे, पण ते करता (वळत) येत नाही़़़’ अ सा शब्द प्रयोग होतो़ अर्थात मला सर्व समजते़ मात्र, त्या बाबींची अंमलबजावणी करता येत नाही, असा अर्थ अभिप्रेत असतो.समाजातील व्यसनाबाबतही असंच काही म्हणता य ेईल़ सुटता सुटता नाही,  ते  व्यसन, असंच काहीसं म्हणता येईल़ 


आपली  प्रकृती निरोगी राहिली तर मन:स्थितीही चांगली राहते. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपोआप येते. अनेक वाईट व्यसने  आणि  सवयीमुळे व्यक्तीला  मानाचे स्थान मिळत नाही. धूम्रपान हे सुद्धा एक घातक व्यसन. त्याचा दुष्परिणाम शरीरच काय मनावर होत असतो. परिणामी जीवनात आपण मागे राहतो. म्हणूनच मनाचा निर्धार करून  व्यसनांपासून दूर राहायला हवे़ सरकार सुद्धा वेगवेगळ्या पातळ्यावर  व्यसनाबाबत इशारा देत असते; परंतु कळते पण वळत नाही, अशी स्थिती सर्वत्र दिसून येते.


धूम्रपानाबद्दल बोलायचे झाल्यास यामुळे हृदयरोगाची लागण होते आणि कॉलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब हे सुद्धा मानगुटीवर बसते.  एका सर्वेक्षणातील निष्कर्ष असे सांगतो, की धूम्रपान करणाºया व्यक्तिंपैकी ४० टक्केलोक आपल्या वयाची ६० वर्षे गाठता-गाठताच मृत्यूलाही भेट देतात. वैज्ञानिक अभ्यासात धूम्रपानामुळे शरीरावर अनेक घातक परिणाम झाल्याचे सिद्ध झाले आहे. मुख्य म्हणजे हे घातक परिणाम धूम्रपान करणाºया व्यक्तींच्या शरीरावर होतातच,शिवाय त्यांच्या जवळपास राहणाºया लोकांनाही परिणाम भोगावे लागतात.


अन्य  एका माहितीनुसार, आपल्या देशात ६५ टक्के पुरुष आणि ३३ टक्के महिला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून धूम्रपान करतात. यात विडी, सिगारेट, चिलीम आदींचा समावेश असू शकतो. व्यसनी लोक बहाणेबाज असतात. धूम्रपान केल्याने आपल्याला काहीच होत नाही, असे ही मंडळी ठासून सांगतात आणि  या  लोकांमध्ये धूम्रपान केल्यामुळे मानसिक तणाव दूर होतो, असा गैरसमज  ‘कुट कुट के  ’ भरला  आहे.  वस्तुस्थिती  याउलट असते.  कारण  मृत्यूच्या  दिशेने टाकलेली  त्यांची पावले संथ गतीने आपला मार्ग  कापत  असते. तंबाखू जाळून निघालेल्या धुरामध्ये निकोटीन टार, कार्बन मोनोआॅक्साईड असे घातक घटक  माणसाच्या   मन  आणि   शरीरावर  दुष्परिणाम करत असतात. दुसरीकडे जे लोक धूम्रपान करत नाहीत, त्यांच्यामध्ये उत्साह  अधिक  असतो. 


तज्ज्ञ म्हणतात की, तंबाखूतील निकोटीन नावाच्या रसायनामुळे माणूस धूम्रपानाच्या आहारी जातो. त्याचे त्याला व्यसन जडते. मेंदूची कार्यक्षमता कमी होत जाते. विशेषत: पौगंडावस्थेतील आणि तरुण मुलांना  व्यसन लागले तर ते सुटणे अवघड असते. ज्या कुटुंबातील आईवडील सिगारेट ओढतात, त्यांची मुलेही लहान वयातच व्यसनी होतात. 


धूम्रपानामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची पुरेपुर शक्यता वाढत असते. तंबाखूतील निकोटीन  रक्तात चटकन मिसळून जाते. त्यामुळे  त्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. धूम्रपानामुळे  हृदयाचे स्पंदन अधिक वेगात होऊन जिवाला धोका निर्माण होतो. सिगारेट वा बिडीचे झुरके अर्थात कश मारण्यासाठी केवळ त्यातील तंबाखूच जळत नाही, तर तो झुरके घेणारा  स्वत:सह इतरांचे मन तीव्र गतीने जाळत असतो. यात त्याचे कुटुंब आणि समाजाचाही समावेश होत जातो.


सर्व वाईट गोष्टींना  जसा अंत  असतो, तसाच त्याचा त्याग करून नवी दिशा मिळवता येते. येथेही धूम्रपानावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे़ मात्र, त्यासाठी  दृढ निश्चय आवश्यक आहे. ‘वाटेल  ते  होवो, मी धूम्रपान करणार नाही’, असा मनाशी घट्ट निश्चय करणे आणि त्याचे पालन करणे नितांत गरजेचे आहे.  भक्कम मनोबलाच्या जोरावरच आपण कणखर निर्धार करून धूम्रपानास दूर करू शकतो. व्यसनी माणूस हा मानसिक दृष्टीने अस्थिर आणि अस्वस्थ असतो. तोंडातून येणाºया धुराच्या दुर्गंधीमुळे  तो  समोरील व्यक्तीवर  प्रभाव टाकू शकत नाही.  असा  माणूस  योग्य  निर्णय सुद्धा  घेऊ  शकत नाही. योग्य निर्णयासाठी मन:स्थिती शांत, स्थिर असणे, आवश्यक असते. मात्र, त्याचा अभाव असतो.  आणि हातातून वेळ  गेली  तेव्हा  राख ही केवळ ‘अ‍ॅश ट्रे’ वरच  बंदिस्त नसते, तर ती समाजात सर्वत्र पसरलेली असते.


संजय इस्तारी मुंदलकर

Sunday, 18 August 2024

वाहने, प्रदूषण, जीवितहानी आणि अक्षम्य बेजबाबदारी

 भारतच काय, जगात सर्वच ठिकाणी सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर वाढण्याची गरज आहे. इंधनाचे दर वाढण्याचे मुख्य कारण त्याच्या वाढत्या मागणीत आहे. इंधनाचे दर वाढले म्हणून सर्वजण ओरड करीत असले तरी स्वतंत्र वाहनाचा वापर कुणीही टाळत नाही. 



file photo

प्रत्येकाला स्वत:ची चारचाकी असण्याचे स्वप्न दाखवणाºया  वाहन निर्मित ी कंपन्या  आणि  त्यांना यात मदत करणाºया अर्थात पैसा पुरविणाºया आर्थिक ( वित्तीय) संस्था यामुळे  सर्वांची मनोवृत्ती सुरुवातीला दुचाकी आणि नंतर चारचाकी वाहनाकडे सातत्याने झुकत चालली आहे.


आणि मग अपघात आणि प्रदूषणासारख्या समस्यांतून जीवन-मरणाचा  न संपणारा संघर्ष सुरू होतो.  देशात प्रदूषणाने होणारे मृत्यू आणि अपघातात होणारे मृत्यू, यामुळे ही वाहन समस्या किती गंभीर आहे हे आपणास लक्षात येईल. वाहन बाळगण्यात महाराष्ट्र देशात प्रथमस्थानी असल्याची माहिती असून, त्याखालोखाल तामिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात अशी क्रमवारी  दिसून येते. कुणी किती वाहन बाळगावेत, याबाबत कोणतेही कायदे  नसल्याने हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे दुर्लभ आहे. मात्र, वाहननिर्मिती, प्रदूषण आणि होणारी जीवितहानी या मुद्यावर अक्षम्य  अशी बेजबाबदारी दिसून येते.



वाढत्या  शहरीकरणातून देशभरातील वाहनाची संख्या वाढत आहे़ आणि त्यामुळे रस्ते अपघात आणि प्रदूषण अशा दोन प्रमुख समस्या वाढत्या वाढत्या वाढत आहेत़ वायू प्रदूषणाने जगातील विविध देशात दरवर्षी लाखो मृत्यू होतात आणि यात भारताचाही समावेश आहे.



आज सर्वंच ठिकाणी नवनवीन समस्या समोर येत आहेत आणि या समस्यांचे मूळ   शहरीकरणात दिसून येते. लोकसंख्या वाढली, शहरे फुगली, वाहने वाढली आणि जीव हातातून जाण्याइतपत रस्ते अपघात आणि प्रदूषणही वाढले. यात मानवी स्वभाव देखील कारणीभूत आहे. कारण भारतीय नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मनातून स्वीकारली  नाही वा शासन प्रशासनाने तशी वेळ  आपल्या लोकांवर आणली, असे म्हणता येईल. 




सर्वसामान्यांच्याही  घरी तीन ते चार वाहने आहेत आणि त्यातूनच शहरांमधून वाहनांची कोंडी होते. वाहतूक कोंडीचा ताण वाढल्याने शहरी भागामध्ये ताणतणाव यात वाढ झाली आहे. वाहनातील वायू प्रदूषणातून होणाºया मृत्यूमध्ये जगातील मृत्यूंमध्ये भारत सर्वांत वरच्या स्थानी असल्याचे सांगण्यात येते. चारचाकी वाहनामंधून कार्बनचे उत्सर्जन होते. याचा लहान बालकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. त्यांना लहानपणीच श्वसनाच्या विकारांना समोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे श्वास घेण्यास ज्यांना त्रास होतो . 



वाहतूक कोंडीने अनेक समस्या निर्माण झाल्या. ज्यात सर्वांत मोठी समस्या ही प्रदूषणाची आहे. वाहनातून बाहेर पडणाºया विषारी वायुंमुळे होणारे वायू प्रदूषण आणि वाहनांचे आवाज आणि हॉर्न यामुळे ध्वनीप्रदूषण असे दुहेरी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. याच्या मानवी आरोग्यावर होणाºया विपरित परिणामातून मृत्यूंचे प्रमाण वाढताना दिसत आहे.



वाहन प्रदूषणामुळे फुप्फ्ुसाचे गंभीर आजार जडणे, श्वसनाचे आजार आणि तणावाखाली राहिल्याने ‘स्ट्रोक’ ने मृत्यू होणे ही याची प्रमुख कारणे असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. प्रदूषणाने होणाºया मृत्यूसोबतच आणखी एक मोठी समस्या जगाच्या पातळीवर वाढली ती म्हणजे या वाढत्या कार्बन उत्सर्जनाने पृथ्वीचे तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. यातून ऋतुचक्र बदल झाल्याचे दिसत आहे. 



पावसाचे व्यस्त होत जाणारे प्रमाण आणि त्यातून कुठे महापूर तर कुठे दुष्काळ अशी स्थिती निर्माण होत आहे. याच्याच परिणाम म्हणजे अंटार्टिक आणि आर्क्टिक खंडातील हिमखंड वितळण्याचा वेग वाढला त्यामुळे समुद्रांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. याचेही गंभीर परिणाम पुढील काळात होणार आहेत.  देशाची राजधानी दिल्लीत ल वायू प्रदूषणामुळे सम-विषम क्रमांकाच्या वाहनांना रस्त्यावर प्रवेश असावा असा अनोखा प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला होता, तो कितपत यशस्वी झाला, ते त्या  दिल्लीतील राजकारणी जाणो. प्रदूषणाची ही समस्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस गंभीरच होत आहे हे वास्तव आहे. 



संजय इस्तारी मुंदलकर

Saturday, 30 March 2024

विठ्ठलाची गाणी, काय काय ऐकावी ...

 



पंढरीचे विठ्ठल हे केवळ महाराष्ट्राचेच आराध्य  दैवत नव्हे, अख्ख्या देशात त्याची भक्त पसरलेली आहेत़ दररोज ही भाविक मंडळी आपल्या देवाच्या चरणी लीन होत असतात, आपली दुखणी, गाºहाणी मांडत असतात़


कधी मनोमन तर कधी अबोलपणे आपली सुख-दु:ख मांडत असतात़ काहीजण आपली आर्तता बोलून दाखवतात़ कारण तोच तारणारा अशी अमिट श्रद्धा ठायी ठायी भरलेली असते़ हा विश्वासत प्रत्येक भक्ताला वारंवार पंढरीचा मार्ग दाखवित असतो़


विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते,भक्तीगीते,चित्रपटगीते आणि नाट्यगीते लिहिली आहेत.राम मराठे,भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, प्रकाश घांग्रेकर,  मन्ना डे, लता मंगेशकर, वसंत आजगावकर, सुधीर फडके,वसंतराव देशपांडे, अनुराधा पौडवाल, विठ्ठल शिंदे,रामदास कामत यासारख्या गायकांनी ती गायली आहे.


अगा वैकुंठीचा राया (नाटक: संत कान्होपात्रा),अणुरेणुया थोकडा (कवी : संत तुकाराम, संगीत: राम फाटक),अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग (संगीत:राम फाटक),अवघा रंग एक झाला,अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर (कवी: अशोकजी परांजपे,नाटक: गोरा कुंभार),आधी रचली पंढरी (कवी :संत नामदेव),आता कोठे धावे मन (संगीत:राम फाटक),आनंदाचे डोही आनंद तरंग,आरंभी वंदीन अयोध्येचा राजा,आली कुठूनशी कानी, टाळ मृदुंगाची धून, नाद विठ्ठल विठ्ठल (कवी:सोपानदेव चौधरी) आदी भजनातील, गीतांतून, अभंगातून प्रत्येक भक्त आपली आर्तता विठ्ठला समोर मांडत असतो़ 


 इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची (कवी: ग. दि. माडगूळकर,संगीत: पु.ल. देशपांडे, चित्रपट: गुळाचा गणपती, राग-भीमपलास),एकतारी संगे एकरूप झाला,कानडा हो विठ्ठ्लू करनाटकू तेणे मज लावियला वेधू,कानडा राजा पंढरिचा, वेदांनाही नाही कळला अंतपार याचा (चित्रपट:झाला महार पंढरीनाथ),काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग (संगीत:राम फाटक), कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर (नाटक: गोरा कुंभार), खेळ  मांडियेला  वाळवंटी  ठायी,चंद्रभागेच्या तीरी, उभा मंंिदरी (कवी: दत्ता पाटील), चल गं सखे चल गं सखे पंढरिला,चला पंढरीसी जाऊ,जन वजन झाले आम्हा,पाऊले चालती पंढरीची वाट (कवी:दत्ता पाटील, संगीत:मधुकर पाठक) ही विठ्ठलगाणी सर्वार्थाने परिपूर्ण आहेत़ म्हणून तर कुणी एक भक्त एकटाच हरिदर्शना निघत नाही, तर तो आपला सखा-सखी,गोतावळा सोबत नेतो़ 


परंपरा-वारसा

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकत...कानडा हो विठ्ठलू करनाटकू (कवी:संत ज्ञानेश्वर, गायिका :आशा भोसले, संगीत: हृदयनाथ मंगेशकर),पांडुरंग त्राता पांडुरंग दाता,पावलों पंढरी वैकुंठभुवन, फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार (कवी: ग. दि. माडगूळकर, चित्रपट: प्रपंच), बोलावा  विठ्ठल पहावा विठ्ठल,सुंदर  ते ध्यान उभे विटेवरी, ज्ञानियांचा राजा (संगीत - राम फाटक)आदी विठ्ठल गाण्यांनी भक्त न्हाऊन निघत आहेत. 




संजय इस्तारी मुंदलकर

(सर्व हक्क सुरक्षित)