‘जोखड’ उतरविले; अ•यासाच्या ‘ऊर्मी’ चे काय?
केंद्र सरकारने बालकांना १ एप्रिल २०१० पासून प्राथमिक शिक्षण हा मूल•ाूत अधिकार प्रदान केल्याने अनुत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्षांत प्रवेश देण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र राज्य सरकारने ११ मे २०१० रोजी जारी केले़ राज्यातील मराठी, इंग्रजी आदी माध्यमांच्या शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी अशा सर्व शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याचे आदेश राज्य सरकारने याच दिवशी लागू केले़ हा आदेश राज्यातील प्रत्येक शाळेला राज्यातील प्रत्येक शाळेला लागू असून त्याला कोणतीही शाळा अपवाद असणार नाही़
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाबाबतच्या अधिनियमातील कलम १६ मधील तरतुदीनुसार, शाळेत प्रवेश दिलेल्या कोणत्याही बालकास मागे ठेवता येणार नाही किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकता येणार नाही़ तसेच, कलम ३० नुसार, कोणत्याही बालकास प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार नाही़ राज्य सरकारने राज्य•ारातील कोट्यवधी बालकांच्या मानेवरील परीक्षेचे ‘जोखड’ उतरवत संबंधित इयत्तांच्या परीक्षाच रद्द केल्या खºया; परंतु त्यांच्यातील अ•यासूवृत्तीचे काय? सध्याच्या स्पर्धेच्या युगात या विद्यार्थ्यांच्या अंग•ाूत ‘ऊर्मी’ चे काय? इयत्ता नववीतील परीक्षेचे काय? असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत़ याबाबत सरकारकडे निश्चितच उत्तरे नाहीत़ इयत्ता नववीपासून पुन्हा परीक्षा सुरू़ पुढील वर्ष दहावीचे़ या वर्गालाही शिक्षणवि•ाागाने काही सवलती दिल्या आहेत; परंतु या सर्व प्रकारात विद्यार्थ्याना अ•यासापासून दूर ठेवण्यात कुठला डाव असावा? एकीकडे शासन विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक आयुष्य जगण्याचा सल्ला देते, तर दुसरीकडे त्यांच्यातून ‘आत्मा’च काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे़
राज्य सरकारने १ एप्रिल २०१० पासून प्रत्येक बालकासाठी सक्तीचे शिक्षण लागू केले़ दरम्यान, इयत्ता आठवीपर्यंत कुठल्याही परीक्षेवर ‘बंदी’ असल्याने तो साहजिकच ‘टेंशन फ्री’ झाला़ सलग आठ वर्षे परीक्षाच नसल्याने पुस्तके निश्चितच अडगळीत जात नसली तरी विद्यार्थ्याच्या दृष्टीने त्या पुस्तकाचे महत्त्व कमी झाले, हे नाकारता येणार नाही़ चालू शैक्षणिक वर्ष इयत्ता पहिलीसाठी जमेत धरल्यास पुढील आठ वर्षे म्हणजे २०१८-१९ पर्यंत परीक्षा नाही़ त्यानंतर एकदम तो विद्यार्थी २०१९-२० मध्ये इयत्ता नववीत जाणाऱ
दरम्यानच्या काळात विद्यार्थ्याची मुख्यत: अ•यास, लेखन सरावाची सवय दूर झाल्याने तो संबंधित वर्गातील परीक्षा कसा ‘फेस’ करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ शिक्षण कायद्यात नववी आणि पुढील परीक्षांबाबत कुठलेही ‘पत्ते’ खुले न केल्याने शिक्षकांत गोंधळ निर्माण झाला आहे़ सध्या तरी विद्यार्थी या सर्व बाबींपासून अन•िाज्ञ आहेत, तर बºयाच पालकांना या सर्व प्रकाराचा योग्यप्रकारे उलगडा झालेला नाही़ जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर वर्ष•ारातील कामाचे नियोजन करण्यात येत असे़ त्यात परीक्षा हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असायचा़ वर्ष•ार राबविल्या जाणाºया कार्यक्रमांत परीक्षा हे ‘लक्ष्य’ असायचे आणि ते साध्य करण्यासाठी बहुधा सारा सरंजाम सादर व्हायचा़ शाळा सुरू झाल्यानंतर जूनच्या शेवटी वा जुलैच्या पहिल्या आठवड्यात उजळणी चाचणी होत़ त्याचे निकालपत्र सादर करेस्तोवर लगेच आॅगस्ट महिन्यात पहिली घटक चाचणी नियोजित असे़
खरेतर तोवर पाठ्यपुस्तकांची पुरती ओळख झालेली नसायची़ सुट्या संपून मुले जेमतेम शाळेच्या वातावरणाशी समरस व्हायला लागली की परीक्षेचा बागुलबोवा त्यांच्यासमोर हजर होत़ सप्टेंबरमध्ये दुसरी घटक चाचणी़ आक्टोबर-नोव्हेंबरचे काही दिवस दिवाळीच्या सुट्यांत गेले की लगेच डिसेंबर महिन्यात तिसरी चाचणी़ जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिन आणि स्नेहसंमेलनाचा उत्साह ओसंडून वाहत़ विद्यार्थी थोडे अ•यासाचे ओझे उतरविण्याच्या मन:स्थितीत असतानाच फेब्रुवारी सुरू आणि चौथी घटक चाचणी हजर असे़ मार्च महिन्यात वार्षिक परीक्षा समोर असल्याने तिची तयारी सुरू होत असे़ अशाप्रकारे वर्ष•ार परीक्षेचा कार्यक्रम वर्ष•ार सुरू राहत़ विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, पाठांतर आदींच्या माध्यमातून परीक्षेतील ‘लक्ष्या’ पर्यंत पोहोचता येत असे़
मागील अनेक वर्षांपासून ही पद्धती विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडलेली होती़ परीक्षेचे ‘धनुष्य’ पेलूनच यश मिळविण्यात ते तरबेज असत़ शिक्षकांचीही परीक्षेपूर्वी अ•यासक्रम पूर्ण करण्याची कसरत चालायची़ अ•यास, सराव, चाचणी, परीक्षा आदी प्रकारांचा तणाव विद्यार्थ्यांच्या मनावर राहत असे़ उपरोक्त सर्व बाबी जमेस धरल्या तरी वर्ष•ार विद्यार्थी आणि शिक्षक आपल्या कामात व्यस्त राहत असे़ यात काळानुसार बदल होत गेला़ शिक्षणात आधुनिकपणा आला़ सोबत स्पर्धाही आल्या़ मात्र, मूल्यमापनपद्धतीत योग्य बदल न झाल्यामुळे विद्यार्थी मागे पडला़ समाजात जीवघेण्या स्पर्धा सुरू झाल्याने पहिला बळी ठरला तो पालकवर्ग आणि दुसरा विद्यार्थी़
शाळेतील अ•यास वा शिक्षकाऐवजी विद्यार्थ्याच्या मनावर आघात केला तो पालकवर्गाने़ त्यांना पालकांच्या टक्केवारीच्या दबाबाने घाबरविले़ विशेषत: दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आपला पाल्य कमी पडू नये, यासाठी वाट्टेल ते करण्यास पालक तयार झाले़ त्यातून एक वेगळाच मतप्रवाह तयार झाला़ तो सर्व समाजात पसरल्या गेला़ साहजिकच त्याचे वाईट परिणाम दिसून आले़ विद्यार्थी आत्महत्यासारखी •ाीषण समस्या त्यातून जन्मास आली़ त्याचे लोण तळागाळात पसरले़ प्राथमिक शिक्षणपद्धतीमधील दोष न सुधारता त्याला पर्याय तयार करण्यात आले़ सामाजिक उद्दीष्ट हे व्यापारीकरणात कधी बदलले, याबाबीचा कुणी विचारही केला नाही़ दुसरीकडे इंग्रजी शाळांचे पेव फुटले़ सरकार, प्रशासनात व्यापारी शिरल्याने त्याला आणखी प्रोत्साहन मिळाले़ सामान्य विद्यार्थी मात्र या स्पर्धेत टिकला नाही़ प्राथमिक शिक्षणपद्धतीबाबत ओरड सुरू झाली तेव्हा विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील ओझे कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्यातून २०१० चा नि:शुल्क आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा जन्मला़