४० वर्षांपूर्वीचे ५२ जण आणि अमेरिकेची धग
४० वर्षांपूर्वीचे ५२ जण आणि अमेरिकेची धग
अमेरिकेने ३ जानेवारी २०२० रोजी इराकमधील बगदाद विमानतळ परिसरात हवाई हल्ला करून इराणच्या कुड्स फौजांचे प्रमुख जनरल कासिम सुलेमानी यांना ठार मारले. यानंतर इराणने आपल्या सर्वाेच्च शक्तिशाली अधिकाºयाच्या मृत्यूचा बदला घेण्याची घोषणा केली होती. तसेच, दुसºयाच दिवशी म्हणजे शनिवारी अन्य देशातील दूतावासावर हल्ला करण्यात आला. यानंतर दोन्ही देशात तणावाची स्थिती निर्माण झाल्याने यूनो, नाटोसह जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आदी देशांच्या प्रमुखांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे तसेच परस्परांसह संपूर्ण जगाची सुरक्षितता कायम राखण्याचे आवाहन केले. कारण त्यांच्यातील तणावामुळे जगभरातील इंधन पुरवठा मागणीवर, शेअर्सबाजारावर मोठा विपरित परिणाम होण्याचे चिन्हे होती. तसेच, ते घडून सुद्धा आलेत. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाची स्थिती आता एक दोन दिवसांत निर्माण झाली नसून त्यासाठी आपल्याला सुमारे ४० वर्षे मागे जावे लागते़. सन १९७९ मध्ये इराणी क्रांती सुरू झाली. यावेळी सुलतान रजा शाह पहलवी यांची सत्तापलट होण्याची चिन्हे दिसत होती.
वास्तविक १९५३ मध्ये अमेरिकेच्याच मदतीने शाहने इराणची सत्ता मिळवली होती आणि आपल्या देशात अमेरिकन संस्कृती वाढीस पोषक वातावरण उपलब्ध करून दिले; परंतु त्याचवेळी सामान्य लोकांवर अनेक प्रकारचे अत्याचार केले. अशा परिस्थितीत देशातील धार्मिक नेत्यांनी शाहंच्या विरोधात आवाज उठवणे सुरू केले. याच वर्षात इराणचे स्वरुप पूर्णत: बदलले. शाह यांनी आॅक्टोबर १९७९ मध्ये अमेरिकेत आश्रय घेतला आणि नोव्हेंबर १९७९ मध्ये इराणवर इस्लामिक रिपब्लिक कायदा लागू करण्यात आला. धर्मगुरू अयातुल्ला रुहोलिय्याह खोमेनी यांच्या मदतीला अनेक धार्मिक संस्था धावून आल्या. तसेच, अनेक कट्टरपंथी विद्यार्थी संघटना स्थापना झाल्या. याच काळात इराणमध्ये शाह यांच्या माध्यमातून अमेरिकाविरोधात द्वेष निर्माण होऊ लागला. आणि अशातच ४ नोव्हेंबर १९७९ रोजी इराणची राजधानी तेहरानमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला झाला. यात ६३ जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच, आणखी तीन लोकांचे अपहरण केले. अशा एकूण ६६ लोकांना कैदेत टाकण्यात आले. काही दिवसांनंतर यापैकी १४ जणांची सुटका करण्यात आली़. मात्र, उर्वरित ५२ जणांना तेहरानच्या अमेरिकन दूतावासात ४४४ दिवस ओलीस राहावे लागले. (व्हिएन्ना कराराविरुद्ध कारवाई असे वर्णन करीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लष्कराच्या ‘आॅपरेशन ईगल क्लॉ’ द्वारे आपल्या नागरिकांची सुटका करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यात यश आले नाही. या कारवाईत १ इराणी नागरिकासह ८ अमेरिकन सैनिक मारल्या गेले.) यानंतर २० जानेवारी १९८१ रोजी त्यांना मुक्त करण्यात आले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर यांनी या घटनेला ब्लॅकमेल आणि दहशतवादाची घटना संबोधले होते. अमेरिकेसाठी ही घटना इतकी भयंकर आणि तितकीच अपमानास्पद होती की जिमी कार्टर यांना आपले पद गमावावे लागले. यावेळी इराणमधील सुलतान शाह यांच्यावर अमेरिकेत कर्करोगावर उपचार सुरू होते आणि इराणी क्रांतीच्या बंडखोरांना त्यांचे परत येणे आवश्यक वाटू लागले. कारण आपल्या गुप्तचर पोलिसांच्या मदतीने इराणी लोकांवर अनेक गुन्हे केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. इराणची मागणी अमेरिकेने फेटाळून लावली आणि शाह यांच्या अमेरिकेतील वास्तव्यामुळे बंडखोरांच्या संतापात आणखी भर पडत गेली. यानंतर अमेरिकेशी संबंध असलेल्या इराणमधील अनेक नागरिकांवर बंदी घालण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या अमेरिकन नागरिकांपैकी कुणालाही ठार मारले नसले तरी त्यांना फारशी चांगली वागणूक देण्यात आली नाही. परिणाम असा झाला की अमेरिका आणि इराणमधील संबंध बिघडू लागले. त्यावेळी इराणी बंडखोरांमुळे अमेरिकेत सत्ता बदल झाला़. कारण जिमी कार्टर दुसºयांदा अध्यक्ष होऊ शकले नाहीत़.अमेरिकेला जगातील सर्वात कमकुवत देश असल्याचे सिद्ध करणारे बंडखोर वरचढ ठरत अमेरिकन नागरिकांना बंदी बनवण्यात यशस्वी ठरले. त्यावेळी मुत्सद्दी धोरणाअभावी काहीही होऊ शकले नाही़. म्हणूनच अमेरिका अद्यापही आपल्या ४० वर्षापूर्वीच्या प्रतिस्पर्ध्याचा सूड घेण्याच्या प्रयत्नात आहे, ही बाबही तितकीच अधोरेखित होत असल्याचे दिसून येते. अगदी नव्या वर्षातील ३ तारखेला (३ जानेवारी २०२०) अमेरिकेने इराकमध्ये धडक कारवाई केली, त्यामागे दोन्ही देशांतील चार दशकांपूर्वीचा संघर्ष कारणीभूत असल्याचे म्हणता येईल. त्यामुळेच आता या तणावामुळे पश्चिम आशियातील स्थिती तणावाची बनली आहे.
युद्धास हवा देणारे काही घटक
मागील वर्षीच्या सप्टेंबरपासून आॅस्ट्रेलियातील जंगलात आग लागली असून यात ५० कोटींपेक्षा अधिक प्राण्यांचा, पक्ष्यांचा जळून मृत्यू झाला आहे़ ही आग अचानक लागलेली नव्हती़ कुणीतरी लावलेली वा नैसर्गिकरित्या ती लागल्याने कुरपत कुरपत तिने अवाढव्य रुप धारण केले, असे म्हणता येईल. त्याच धर्तीवर अमेरिकाचा संताप हा एका दिवसाचा वा वर्षाचा नाही, तर त्यामागे तब्बल ४० वर्षांची धग असल्याचे सांगण्यात येते. याला एक प्रकारचा बदला वा सूडही म्हणता येईल.झैनाबचा इशाराइराणमध्ये इंधन दराविरोधात झालेल्या मोठ्या आंदोलनात ३०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्यावरून सरकारवर आरोप प्रत्यारोप झालेत़ आता मात्र देशातील सर्व राजकीय पक्षांचे नेते सुलेमानी यांच्या ७ डिसेंबर २०२० रोजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते. त्यांची मुलगी झैनाब हिने जमावासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी तिने थेट अमेरिकेवर हल्ला करण्याचा इशारा दिला. पश्चिम आशियात तैनात अमेरिकी सैनिकांच्या कुटुंबियांनी आता त्यांच्या मुलांच्या मृत्यूची वाट पाहत दिवस घालवावेत, असे तिने म्हटले आहे. याचाच अर्थ पुढील काळात इराक वा शेजारच्या देशात असलेल्या अमेरिकन सैन्यांसह दूतावासांवर हल्ला होण्याचे संकेत आहेत.
इराकही झुकला...इराकी संसदेने अमेरिकेचा निषेध करत सध्या इराकमध्ये असलेल्या अमेरिकेच्या सुमारे पाच हजार सैनिकांना माघारी पाठवण्याचा ठराव पारित केला आहे. इराकमधील सरकार इराणच्या बाजूने झुकले असून इराकने आपल्या सैनिकांना माघारी पाठवल्यास इराकवरही निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. मागील दोन चार दिवसांतील भराभर घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इराण अणुबॉम्ब निर्मितीच्या निर्णयाकडे जाऊ शकतो. शिवाय इराकमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांना परत आणण्यात इराणकडून मदत करू शकतो,असेही बोलले जात आहे. त्यामुळे पश्चिम आशियात अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी वर्तवली आहे.
मॉब नेव्हर क्वॉईट...
असे म्हटल्या जाते की ‘मॉब नेव्हर क्वॉईट’(अर्थात कोणताही जमाव हा शांत नसतो वा तो शांत राहण्याचा हेतूने गोळा झालेला नसतो.) हीच बाब सोमवारी दिसून आली. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झालेले सुलेमानी यांच्यासह इतरांचे मृतदेह रविवारी इराकमधून प्रथम इराणच्या अहवाज शहरात आणि सोमवारी तेहरानमध्ये आणण्यात आले. सुलेमानी यांना अंतिम निरोप देण्यापूर्वी मुख्य रस्त्यावर हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. यात महिलांची संख्या प्रचंड होती. काळ्या कपड्यातील मोठ्या जमावातून अमेरिकाविरोधात घोषणा देण्यात येत होत्या. म्हणजेच इराणमधील लोकांमध्ये संतप्त भावना दिसून येते, असे म्हणता येईल़ त्यांच्या मनातील हा उद्रेक कोणत्या रुपात बाहेर येईल, याबाबत येणारा काळच उत्तर देईल.© संजय इस्तारी मुंदलकर
No comments:
Post a Comment