सध्या पर्यावरणाचा नको तितका तोल ढासळला आहे. अर्थात हे सर्व नैसर्गिक असले तरी त्याला कारणीभूत आपण सर्व मानवजातच आहो. पृथ्वी नष्ट होण्याचा मार्गावर असताना तरी ही बाब आपण नाकारण्याचे धाडस करू शकणार नाही. ओला-कोरडा दुष्काळ (यात सर्व आले-पूर, महापूर, जीवघेणे तापमान आदी) हा प्रकार कुणी आणला, निसर्गाने तर नक्कीच नाही! ही कुºहाड आपण आपल्या पायावर मारून घेतली. जंगले तोडली, शेतजमिनी संपवल्या, नद्यांच्या प्रवाहात अतिक्रमण केले. रसायनाला अति महत्त्व दिले. जमिनी नापिक करून सोडल्या. पारंपरिकतेला तुच्छ लेखत सेंद्रिय खताला नामशेष केले. पावसाचे पाणी मुरायला जागा ठेवली नाही. या सर्वांचा परिणाम काय तो, आपण आपल्या अस्तित्वावर उठलो.
आता नवीन संकट उभे ठाकले आहे़ आणि ते म्हणजे प्लास्टिक. पूर्वी आपल्या दैनंदिन कामात प्लास्टिकचा फारच कमी होत होता. साधारणत: कागदपत्रं ठेवणे, कपडे ठेवण्यासाठी उपयोग होत असे. मात्र, काही वीसेक वर्षांपासून या प्लास्टिक कॅ रीबॅगचा इतका वापर वाढला की तो मानवी वा जनावरांच्या जीवावर उठला आहे. प्लास्टिकाा पिशव्यांची उपलब्धता वाढली आणि हा एक सोपा पर्याय आहे, हे दिसून आल्यानंतर त्याच्या वापरापेक्षाही गैरवापरच अधिक वाढला, हे लक्षात येण्यास फार वेळ लागला. तोपर्यंत पाणी नाकातोंडात जावून गुदमरायला लागले होते.
प्लास्टिकच्या अतिवापरापेक्षा गैरवापरामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होत आहे. आज कॅ रीबॅगचा वापर ही गरज वा सोय कमी आणि स्टाईल अधिक बनली आहे. साध्या औषधाच्या गोळ्या घेतल्या तरीसुद्धा लोक दुकानदाराकडे कॅ रीबॅग मागतात आणि ती दिली नाही, तर जोरजोरात भांडतात देखील. शेवटी दुकानदारही ग्राहक टिकवायचे असते म्हणून त्यांची मागणी पूर्ण करतात. बरेचदा कॅ रीबॅग इतक्या पातळ असतात की, घरी जाईपर्यंत त्या फाटतात आणि दुसºया दिवशी त्या कचºयासोबत उकिरड्यावर जातात. याचा दुष्परिणाम किती मोठ्या प्रमाणात होतो याचा विचार ना दुकानदार करतात, ना तुम्ही आम्ही. सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे कचºयामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती प्लास्टिकच्या पिशव्यांचीच.
समुद्रात तर भरतीच्या वेळी कितीतरी टन कचरा किनाºयावर फेकला जातो. त्यात प्लास्टिक सर्वांधिक असते. मुंबईत ही बाब अनेकदा अनुभवास आली आहे. समुद्रकिनारी गावांमध्ये, शहरांमध्ये समुद्राच्या पाण्याचा तळ प्लास्टिकने झाकलेला आहे, इतका प्लास्टिकचा वापर वाढलेला आहे. ही एका भीषण धोक्याला जन्म घालणारी गोष्ट आहे. याचा जीवसृष्टीवर-जलसृष्टीवर अतिशय प्रतिकूल परिणाम होतो.
समुद्राच्या, नद्यांमध्ये राहणारे जलचर पाण्यात टाकलेले प्लास्टिक खाऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे मृत प्राणी कापल्यानंतर त्यांच्या पोटात प्लास्टिक आढळल्याचे दिसून आले आहे. आपल्याकडे नदीत किंवा समुद्रात निर्माल्य टाकताना तेही प्लास्टिक पिशवीसह टाकले जाते. घरातील कचराही प्लास्टिक पिशवीमध्ये बांधून कचराकुंडीत टाकला जातो. हा कचरा जी जनावरे खातात, त्यांच्या पोटात प्लास्टिक जाते. मोकाट फिरणाºया गायी किंवा म्हशींच्या पोटातून तीस-चाळीस किलो प्लास्टिकचे कागद काढण्यात आले आहेत.
पूर्वी प्लास्टिकच्या पिशव्यांचा पर्याय नव्हता, त्यावेळी कापडी पिशव्या वापरल्या जात होत्याच ना? मग आता का होत नाही? याचे मुख्य कारण म्हणजे आज मोठमोठ्या मॉलमध्ये जाऊन खरेदी करून प्लास्टिकच्या पिशव्यांमधून सामान आणणे हे मोठेपणाचे लक्षण वा फॅ शन मानली जात आहे. अशावेळी मॉल्सवाल्यांनी वा दुकानदारांनी कापडी पिशव्यांचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. या कापडी पिशव्यांवर त्यांना त्यांची जाहिरातही करता येते.
प्लास्टिक पिशव्यांना कापडी पिशव्यांचा वापर करणे हाच पर्याय आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे हा एक पर्यावरणपूरक आणि कालसुसंगत विचार आहे. पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा विचार करून राज्याच्या पर्यावरण विभागाने प्लास्टिकवर बंदी आणली आहे, त्याला सर्वांनी पाठिंबा देणे, सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण मानवी रक्तात प्लास्टिकचा अंश मिळाल्याचे वृत्त वाचण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment