Saturday, 1 July 2023

पुष्पा, आय हेट टीअर्स ...

 आपल्या चतुरस्त्र अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या अंत:करणावर अधिराज्य गाजवणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आगामी १८ जुलैला स्मृतिदिन. राजेश खन्ना यांच्या निधनानंतर ७० च्या दशकातील एक सदाबहार  युग संपुष्टात आले. राजेश खन्ना यांनी १९६९ ते १९७२ या काळात लागोपाठ एकापेक्षा एक १५ सुपरहिट चित्रपट दिले, ही कामगिरी मोठी मानली जाते.



राजेश खन्ना यांनी चेतन आनंद यांच्या ‘आखरी खत’ चित्रपटापासून (१९६५)  अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. आनंद, आराधना, आन मिलो सजना, मर्यादा, दो रास्ते,अंदाज, बावर्ची, मेरे जीवन साथी, कटी पतंग, हम दोनो,अवतार, अमर प्रेम यासारखे अनेक हिट चित्रपट दिले. दो दिलों के खेल मे हा प्रदर्शित झालेला चित्रपट अखेरचा (२०१०) ठरला. तब्बल १०१ चित्रपटांमध्ये त्यांनी सोलो हिरो म्हणून काम केले, हा एक विक्रम मानला जातो. 

संगीतातून रोमान्स

राजेश खन्ना यांच्या यशामागे संगीतकार आर. डी. बर्मन आणि गायक किशोर कुमार यांचे मोलाचे योगदान आहे. किशोर कुमार यांनी अनेक चित्रपटांमधून राजेश यांना स्वर दिला.आर. डी. बर्मन यांनी संगीत दिले. मेरे सपनों की राणी कब आएगी तू म्हणत शर्मिला टागोर यांच्या रेल्वेमागे चारचाकीने पाठलाग करणारा, जिंदगी कैसी हे पहेली...कभी ये हसाए कभी ये रूलाये, असे म्हणत आयुष्याची गणिते मांडणारा तर कधी एक अजनबी हसीना से यू मुलाकात हो गई, असे म्हणत तिच्या सौंदर्याचे गुणगाण करणारा, गुनगुना रहे है भंवरे खिल रहे है...म्हणत प्रेमाचे गीत गाणारा तर कधी ये जो मोहब्बत है, म्हणत नशेत बुडून आता प्रेम कधीच करणार नाही म्हणणाºया रोमँटिक राजेश खन्नांची आठवणीतील गाणी अनेकांच्या तोंडावर रूळलेली दिसतात. 

काका... कसे

आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान राजेश यांनी त्यांना काका नाव कसे मिळाले, याविषयी सांगितले होते. काका या शब्दाचा पंजाबी भाषेतील अर्थ  लहान गोंडस मुलगा असा होतो. मी जेव्हा हिंदी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले. त्यावेळी तरुण होतो. त्यामुळे सर्वजण काका म्हणू लागले. अनेकवेळा पंजाबीमध्ये ‘काके’ अशीही हाक मारण्यात येते. मलाही तशीच हाक मारली जायची. हळूहळू ‘काका’ हेच नाव पुढे लोकप्रिय झाले. 


हृषिकेश मुखर्जी यांची निर्मिती असलेला आनंद १९७१ मध्ये पडद्यावर आला होता.  राजेश  खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणले. गाण्यांसोबत संवादही लोकप्रिय ठरले. राजेश खन्ना  यांचा रेकॉर्ड केलेला आवाज टेपच्या माध्यमातून ऐकवला जातो-‘बाबू मोशाय...जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में है जहाँपनाह...जिसे  ना आप बदल सकते है ना मै.....हम सब तो रंगमंच की कठपुतलिया है, जिसकी डोर उपरवाले की उंगलीयों मे बंधी है...कौन, कब, कैसे उठेगा कोई नही जानता’ राजेश खन्ना  यांचे असे संवाद अमर बनले. 


१४  फिल्मफेअर नामांकन

राजेश खन्ना यांना  आनंद, बावर्ची, नमक हराम,अमृत या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. दादासाहेब फाळके पुरस्कार, आयफा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, अप्सरा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी  गौरवण्यात आले. 


सुपरहिट गाणी

#  मेरे सपनों की राणी कब आएगी तू 

#   जिंदगी कैसी है पहेली

#  एक अजनबी हसिना से 

#  गुनगुना रहे है भंवरे खिल रहे है गली गली

#  ये जो मोहब्बत है

#  हजार राहें मुड के देखी

#  जय जय शिवशंकर

#  जिंदगी प्यार का गीत है

#  ससुरा तिरथ, तिरथ साला साल ी है

#  कभी दोसती ने मारा

#  यू ही तुम मुझसे बात करती हो

#  नदीया  से दरिया

#  इतना तो याद है मुझे

#  ये जो चिलमन है

# नाच मेरी बुलबुल

#  जिंदगी के सफर में

#  ये लाल रंग मुझे 

#  जा ना याद आ मुझे 



No comments:

Post a Comment