मला की कुणाला?
हा ऋतुगंध खुणावतो मला की कुणाला़
हा ऋतुगंध वेडावतो मला की कुणाला़
मोरपंखी आयुष्य माझे
थुईथुई करती तुषार संगती
सानुले गवतपान डोलते
झुलते खट्याळ वाºयावरी
हा ऋतुगंध हसतो मला की कुणाला?
लाजरे अन् बुजरे फुलपाखरू
एकांती मग्न फुलांसवे
मीही फुलले रोमांचले
मीही बहरले कुणा संगती
हा ऋतुगंध हसतो मला की कुणाला?
संजय इस्तारी मुंदलकर
[ SAANJANTANOO]
No comments:
Post a Comment