‘‘या सगळ्या बाबींसाठी मानवी संवेदना असावी लागते. दुसºयांच्या मनाचा तळ गाठण्याची सवय असावी लागते़ इथं तर आपण स्वार्थ नावाच्या कोषातच बंदिस्त आहोत. कुठून कळणार दुसºयांचं शल्य...? कारण ते टोच्चकं...बोच्चकं?
|
निर्भयनं मोबाईलवर कॉल रिंग केली़ दोन्ही वेळा पूर्ण रिंग वाजली़ समोरून प्रतिसाद नाही. तशी त्याची घालमेल वाढली़ कारण तब्बल चार दिवस नित्यासोबत बोलणं झालं नव्हतं. होय... त्याच्यासाठी ते तीन दिवस सुद्धा ‘तब्बल’च होते.
काही मिनिटांत नित्याचाच कॉल आला.
‘‘सॉरी, वेळ लागला. व्हॅन आली होती.’’
‘‘ व्हॅन...कसली व्हॅन. काय झालं?’’
‘‘क्क ...काही नाही...’’ नित्या बोलली खरी़ तिची छाती सुद्धा धपापली.
‘‘सर्व ठीक ना...?’’
‘‘हो ... हो...तुम्ही कसे आहात?’’
त्या अगोदरच निर्भयचं वाक्य कानावर पडलं.
‘‘स्साला, हा समाजच षंढ झालाय. कुणाला कशाचं सोयरसुतकच नाही.’’
‘‘काय झालं. एवढा त्रागा का करून घेतायं?’’
‘‘अगं, तो पाठक उद्योग समूहवाला आपली चूक मानण्यास तयारच नाही. करून सवरून हरामखोर नामानिराळे. गेंड्यांची कातडी आहे लेकांची.’’
‘‘आपल्या कारखान्यात एका कामगाराला कामावर असतानाच अपघात होतो आणि त्याचा मालक काहीतरी बनावट कारणं शोधून वस्तुस्थितीपासून पळ काढतो, हे लक्षण कशाचं?...म्हणजे या गरिबांच्या रक्ताची किंमत नाहीच; पण मी त्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही.’’
‘‘ती श्रीमंत माणसं आहेत. त्यांच्या पैशांपुढं आपण तग धरणं शक्य नाही... आणि सरकारी अधिकारी चौकशी करताहेतच.’’ नित्या त्याला समजवण्याचा प्रयत्न करीत होती.
‘‘त्यांच्यावरही माझा तीळमात्र विश्वास नाही...अजिबात नाही. हा माझा अनुभव आहे. पाठक त्यांनाही विकत घेण्याची शक्यता आहे. माझ्या हातात लेखणी आहे. माझ्या वृत्तपत्रांतून नागडं करेन साºयांना.’’
‘‘ उगीच त्रास करून घेवू नका. ठीक होईल सगळं. मी थोडं बाहेर जातेयं. उद्या वैशूकडं वाढदिवसाला जायचं आहे.’’
| file photo |
झालं, हे काही शब्द निर्भयच्या मनातील संतापाला हवा देणारे ठरले. वास्तविक तो राग नित्याविषयी नव्हताच! मात्र, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ‘हाच’ हक्काचा माणूस, असा तिच्याबद्दल त्याचा गोड समज ... आणि तो त्याच्या व्यावहारिकदृष्ट्या योग्य होता.
‘‘हो... हो, जा! तुला वाढदिवस, बारसे, लग्न, पार्टी, मुंज, तेरवी, पाळणा या कामांतून वेळ मिळाला, की ये!... जा... जा... तू. आणि मुख्य म्हणजे तुला तरी का कळाव्यात गरिबांच्या भावना?’’ निर्भय अतिशय चिडून म्हणाला.
यावर ती शांतच राहिली. कारण त्याच्या अशाप्रकारच्या हल्ल्याला ती तोंड देऊच शकत नव्हती.
‘‘या सगळ्या बाबींसाठी मानवी संवेदना असावी लागते. दुसºयांच्या मनाचा तळ गाठण्याची सवय असावी लागते़ इथं तर आपण स्वार्थ नावाच्या कोषातच बंदिस्त आहोत. कुठून कळणार दुसºयांचं शल्य...? कारण ते टोच्चकं...बोच्चकं? मी कुठलं चांगलं काम करावं, अशी तुझी इच्छा नाहीच. भविष्यातही तुच माझे पाय ओढणार आहेस की काय. साºया जगावर मी प्रेम करतोय... पण माझं कोण...कोण माझं? चित्तरकथा केलीयं माझ्या प्रेमाची अन् आयुष्याचीही! ’’
‘‘सॉरी’’
‘‘मी तुला अगोदरच सांगितलं होतं. ध्येयवाद हा माझा आत्मा आहे. तरीही केवळ सिद्धांतावर तग धरणारा नव्हेच. हा ध्यासअध्याय कधीही न संपणारा आहे. अन्याय दिसला की माझे बाहू स्फुरण पावतात. मी कुण्याही श्रीमंताच्या विरोधी वा दारिद्र्यात खतपत पडलेल्या माणसाला डोक्यावर घेणारा नसून त्यांच्या अंतरातील भग्न विचारांना लाथ मारणारा आहे. या समाजातील लोकांसारखा ‘षंढ’ मानसिकतेचा मी नाही. ही माणसे (?) पैसेवाली असली तरी त्यांच्या धमक्यांना भीक घालणारा नव्हे आणि मरणालाही घाबरत नाही! ’’
‘‘...हो, पण मला काही गोष्टींचा विचार करावा लागतो...ऐका माझं. निर्भय, मी ... मी विवाहिता आहे...’’
‘‘क्काय ...’’
निर्भय इतकंच बोलू शकला...
लेखक : संजय मुंदलकर
कथा : नवंतिका
जिथं प्रेम हाच देव्हारा ...
ही कथा सलग नाही
छायाचित्र प्रतिकात्मक
[ all rights reserved]
No comments:
Post a Comment