‘कोरोनामृत्यू’ पासून सुटकेचा आटापीटा करत दुर्दैवाने मृत्यू आल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारालाही नाकारणारी माणसे याच मातीत जन्मली आहेत. रुग्णांवर उपचार करणाºया कर्मचाºयांच्या कामात मुद्दाम अडथळे आणली जात आहेत, हे वास्तव समाजाला पचवावे लागेल. काळानुसार कोरोना संकटाचा विसरही पडेल; परंतु आपल्या माणसांनी शरीरावर केलेल्या जखमांचा, अपमानास्पद वागणुकीला, मनाला दिलेल्या वेदनांचा विसर होणे कठीण असेल़
सार्वजनिक जीवनात प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांना मारहाण, जिवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून घडत आले आहेत. क्वचित मारहाणही केली जाते. डॉक्टरांवरील हल्ले हा खरं तर जुना विषय. मात्र, यासंबंधी कडक असे कायदे निर्माण न झाल्याने आरोपीला शिक्षा होत नसल्याचे दिसून येते. यातून पुन्हा नवीन घटना घडली जाते. सध्या जगाचे अस्तित्व संपवू पाहणाºया कोरोनाच्या गंभीर संकटातही हे प्रकार थांबलेले नाहीत. सफाई कामगार, पोलिस, डॉक्टर्स, पारिचारिका यांच्यासह अन्य शासकीय कर्मचारी आपले प्राण धोक्यात घालून कर्तव्य पार पाडत आहेत. ही सर्व मंडळी घरादाराचा त्याग करून कोरोनाबाधितांवर उपचार करत आहेत, त्यांच्या आयुष्यासाठी २४ तास कर्तव्य बजावत आहेत, कुणी एखादी महिला पोलिस आपल्या बाळापासून दूर राहून किंवा त्याला सोबत घेऊनही कर्तव्य पार पाडत असल्याचे प्रसारमाध्यमातून वाचावयास मिळत आहे़ अनेक पोलिस कर्मचारी, डॉक्टर्स वा पारिचारिका आपल्या कुटुंबातील सदस्याला संसर्ग होऊ नये यासाठी त्यांच्यापासून अलग राहत आहे़ असे असूनही या सर्वांवर जिवेघेणे हल्ले, मारहाण होत आहे, त्यांना अपमानित करण्यात येत आहे. विशेष संपूर्ण देशभरात अशा घटना घडत आहेत. यातील बहुतांश घटना लॉकडाऊनच्या दुसºया टप्प्यात एप्रिल महिन्यात घडलेल्या आहेत.
ही घटना १७ एप्रिल २०२० रोजीची आहे. झारखंडमधील रांची येथील कोकर सँम्फोर्ड रुग्णालयातील किडनी ट्रांसप्लांट सर्जन डॉ. गीता आपल्या रुग्णालयात कारमधून जात असताना दोन तरुणांनी त्यांची कार अडवली़ यावेळी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. धक्कादायक म्हणजे त्यांच्या कारवर थुंकण्यात आले.
् उत्तर प्रदेशातील मुरादाबादेत १४ एप्रिल रोजी घडलेली ही घटना अतिशय संतापजनक आहे. याठिकाणी कोरोना विषाणूच्या संसर्गाने एकाचा मृत्यू झाला. यानंतर डॉक्टर्स आणि आरोग्य विभागाचे एक पथक मृतकाच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरन्टाईन करण्यासाठी गेले असता काही लोकांनी त्यांच्यासह पोलिस अधिकारी तसेच अन्य कर्मचाºयांवर दगडफेक केली.रुग्णवाहिका आणि अन्य शासकीय वाहनांची तोडफोड केली. यावेळी एकूण पाचजण गंभीर जखमी झाले.
् उत्तर प्रदेशातील मुरादाबादेत १४ एप्रिल रोजी घडलेली ही घटना अतिशय संतापजनक आहे. याठिकाणी कोरोना विषाणूच्या संसर्गाने एकाचा मृत्यू झाला. यानंतर डॉक्टर्स आणि आरोग्य विभागाचे एक पथक मृतकाच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरन्टाईन करण्यासाठी गेले असता काही लोकांनी त्यांच्यासह पोलिस अधिकारी तसेच अन्य कर्मचाºयांवर दगडफेक केली.रुग्णवाहिका आणि अन्य शासकीय वाहनांची तोडफोड केली. यावेळी एकूण पाचजण गंभीर जखमी झाले.
बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील अकौनी नावाच्या गावात दिल्ली शहरातून एकजण आल्याची सूचना मिळाल्याने डॉक्टरांचे एक पथक गावात पोहोचले़ मात्र, गावकºयांनी त्यांच्यावरच हल्ला चढवला. यावेळी डॉक्टर, वाहनचालक आणि अन्य एक कर्मचारी असे जखमी झाले. गावातील लोकांनी वाहनांचीही तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस अधिकारी आणि उपविभागीय महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचले. गावकºयांनी या सर्वांवर दगडफेक केली. यापूर्वी बिहारमधील मधुबनी, भागलपूर, कटिहारसह राज्यातील अनेक भागात डॉक्टर्स तसेच पोलिसांवर हल्ल्याचा घटना घडल्या आहेत.
या काळात माणुसकी इतकी पायदळी तुडवली, मानवी संवेदना इतक्या बोथट झाल्या की मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यावरही अडथळा आणण्यात येत आहे. हरयाणातील अंबाला येथील चांदपुरा येथील एका निश्चित केलेल्या ठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी करत असताना घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली. तसेच, पोलिस आणि डॉक्टरांच्या पथकावर हल्ला चढवला. अन्य वाहनासह रुग्णवाहिकेचीही तोडफोड केली. एका शवाला त्याचा अखेरचा अधिकार देण्यासही मानवी जीवाने सपशेल नकार दिला़ यापेक्षा दुर्र्दैवी उदाहरण कोणते?
अशा घटनांचे चक्र सुरूच आहे. आज ११ मे दिवसही अपवाद नाही़ महाराष्ट्रातील चाळीसगांव येथेही काही कर्मचाºयांवर हल्ला केल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर ग्रामीण जिल्ह्यातील रसूलाबाद भागात तुलसीनगर कंजड डेरा येथे लोकांना एकत्र जमा न होण्यास मनाई केल्याने महिलांसह काही लोकांनी पोलिसांच्या एका पथकावर जिवघेणा चढवला. महिलांकडून दगडफेकही केली गेली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ सोडले आणि त्यामुळेच त्यांचे प्राण बचावले. तरीही या हल्ल्यात तीन अधिकाºयांसह दोन महिला आणि दोन पुरुष पोलिस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी सहा महिला आरोपींसह अन्य १३ हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
चेन्नईमध्ये कोरोनामुळे एका डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीलाही लोकांनी विरोध केल्याचा प्रकार घडला. यावेळी रुग्णवाहिकेवर दगडफेक केली होती. अशीच एक घटना आंध्र प्रदेशातही घडली. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर लोकांनी त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध केला होता, आंदोलनही केले होते. कोरोनाबाधितांवर उपचार करणाºया डॉक्टर्स, पारिचारिकांना भाड्याच्या घरात राहण्यास मनाई केल्याचेही प्रकार देशभरात घडल्याचे दिसून आले. दोन आठवड्यांपूर्वी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये विनोबानगर परिसरात सर्वेक्षण करावयास गेलेल्या एका वैद्यकीय पथकावर (मेडिकल टीम) काहींनी दगडफेक केली. तसेच, त्यांचे मोबाईलही तोडले.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत हल्लेखोराने पोलिसांवर कोयत्याने हल्ला चढवला़ मागील महिन्यात पंजाब राज्यात काही गुंडांनी एका पोलिस अधिकाºयावर वार करून एक हात तोडला होता. यात अत्यंत धक्कादायक आणि संतापाची बाब म्हणजे राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदींचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. अशीच एक घटना महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात २८ एप्रिलला घडली आहे. लॉकडाऊन आणि कलम १४४ लागू असणे, महामारी कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना आपला दारूचा धंदा बिनबोभाट सुरू राहावा यासाठी एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकाने नगरपालिका मुख्याधिकाºयांच्या कक्षात जाऊन मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर संबंधित नगरसेवक गावातून पळून गेला़ मात्र, फरार असलेल्या त्या नेत्याच्या मुसक्या तर आवळल्याच, शिवाय त्याचे बियर बार दुकानही कायमचे बंद करून टाकले. कायदेशीररित्या त्याचा परवाना रद्द करण्यात आला़ कारण घंटागाडीतून दारूची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आले होते. आता इस्लामपूर पोलिसांनी १० मे च्या पहाटे केलेल्या अटकेच्या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील राजकारण्यांच्या छातीत धडकी भरली, हे निश्चित!
सरकारकडून गंभीर दखल
दरम्यान, देशात वैद्यकीय कर्मचाºयांवर होणाºया हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षेसाठी अध्यादेश काढला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या घटनांतील हल्लेखोरांना कमीत कमी तीन महिने ते सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच, ५० हजारांपासून पाच लाखांपर्यंत दंडात्मक कारवाईही होऊ शकते. विशेष म्हणजे हल्लेखोरांविरोधातील दाखल झालेला गुन्हा दखलपात्र,अजामीनपात्र असेल. संपूर्ण घटनेची चौकशी ३० दिवसांत पूर्ण केली जाईल आणि एका वर्षांत दोषींना शिक्षा ठोठावली जाईल.© संजय इस्तारी मुंदलकर
No comments:
Post a Comment