कौलांना बरेच आयुष्य असायचं़ पावसाने कितीही ‘ओतणे’ चालू ठेवले तरी त्यातून एक थेंब पडत त नसे़ झडीच्या दिवसांत मात्र कवेलू ओलेगच्च व्हायचे़ मग त्यातून पाणी थेंबथेंब ठिबकायचे़ गावातील गरीबगुद्या माणसाचं घर हे निसर्गाची देणगीच असायची़ पºहाट्या, तुराट्या, बाभळीच्या नाहीतर कडुलिंबाच्या डिया हे सर्व फुकटातच मिळायचं़ फक्त हातात मेहनत हवी़
गावातली घर चंद्रमौळी असतात़ मागे पुढे अंगण़ अंगणात एका कोपºयात वृंदावऩ त्यात तुळशी माय़ कधी कधी भगवान शंकराची पिंड, शंखही विराजमान असतो़ शक्य असल्यास त्याच ठिकाणी विहीरही असते़ मागील बाजूस हीच स्थिती़ सकाळी पूजा करताना तुळशीला पाणी वाहतात, अगरबत्ती लावतात, तर सायंकाळी तिच्यापुढे दिवा लावतात़ अनेक घरातील आजीआजोबा यापैकी कुणी एक सायंकाळी नातवांसोबत शुभंकरोती म्हणतात़ यावेळी ते आपल्या पिढीतील संस्काराचा ठेवा त्यांच्या हवाली करीत असतात़
सधन कास्तकारांची घरे बैठी, मातीच्या भिंतीची, धाब्याची असत़ काहींची सिमेंटचीही असे़ त्यावर बंगलोरी कवेलू वा लोखंडी टिनाची पत्रे वापरण्यात येई़ सिमेंटच्या टिना महाग असल्याने त्यांचा वापर होत नसे़ प्रशस्त जागा, बैठकीची खोली वेगळी, स्वतंत्र स्वयंपाकघर, झोपण्याच्या खोल्या वेगळ्या,सामानसुमानाच्या अलग तर शेतमाल ठेवण्यासाठी वेगवेगळ्या खोल्या असत़ गरीब किंवा शेतमजुरांची घरे ‘कुडा’ची असत़ पुढची ‘सपरी’ आणि मागे स्वयंपाकघर अशी रचना असे़ पºहाटी, तुरट्यांंना ‘डियां’च्या मदतीने एका खोल पट्टीत रोवून त्यांना ‘कांबटी’ने घट्ट बांधण्यात येई़ त्यानंतर पांढºया मातीचे लिंपण देण्यात येत़ अशारितीने तो कुड तयार होत असे़ वरील बाजूला जुने-नवे बांबू टाकून त्यावर तुराट्या आच्छादण्यात येई़ मग त्यावर कवेलू ‘शाकारली’ जात़ गावातली काही व्यक्ती अशी कौलं शाकाराण्यात वस्ताद असतात़ एकेका दिवशी ते चार-पाच घरे हातावेगळी करतात़ रोहिणीच्या सरी पडल्या की त्यांचे भाव वधरतात़ आमच्या गावातील नामदेव तेली, तुक्या वाघ, विठ्या, पुरुषा ही मंडळी कौलाचं घर शाकारण्यात तरबेज होती़ गावातील पूर्ण घरांचा जणू ठेका त्यांच्याचकडे असायचा़ इकडे शेतीची कामे आणि घर शाकारण्याची वेळ एकाच वेळी येई़
त्यापूर्वी उन्हाळाभर आमच्या गावातील देवा कुंभार कौलांचा कारखाना होता़ बेंबळा नदीच्या काठावर तो आपल्या बायको-लेकरांसह कौल तयार करण्याच्या कामात गुंतून घेई़ गाळाची माती शोधणे,तिला बारीक करणे, गाळणे, भिजवणे, त्यानंतर तिला पायाने तुडविणे अशी कामे करावी लागत़ मग कुठे ती तयार होई़ त्याचे ते काम बघण्यासाठी आम्ही दोस्तमंडळी बेंबळेच्या काठावर जात असू़ भरदुपारी जेवण झाल्यानंतर डोक्यावर एखादा जुना शेला बांधून घरातील मोठ्यांचा डोळा चुकवून आम्ही तिकडे धूम ठोकायचो़ मग दिवेलागण होईपर्यंत तिकडेच राहायचो़
उन्हाळाभर मेहनतीने कवेलू तयार केल्यानंतर गावकरी देवाचा माल तर घेऊन जात; पण बरेच जण त्याचे पैसे उधार ठेवी़ यातील काही नगदी पैसे देत़ काही आपले काम संपले की त्या कुंभाराचे तोंड पाहणे टाळत असे़ ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ असा त्यांचा धर्म असे़ मग दुसºया वर्षी मात्र देवा त्यांना आपल्या दारातही उभा करीत नसे़ संपूर्ण गावकरी याच कौलांनी आपली घरे शाकारून घेत़ देवाच्या कौलांना बरेच आयुष्य असायचं़ पावसाने कितीही ‘ओतणे’ चालू ठेवले तरी त्यातून एक थेंब पडत नसे़ झडीच्या दिवसांत मात्र कवेलू ओलेगच्च व्हायचे़ मग त्यातून पाणी थेंबथेंब ठिबकायचे़ गावातील गरीबगुद्या माणसाचं घर हे निसर्गाची देणगीच असायची़ पºहाट्या, तुराट्या, बाभळीच्या नाहीतर कडुलिंबाच्या डिया हे सर्व फुकटातच मिळायचं़ फक्त मेहनतीची गरज असायची़
दिवस बदलले़ गावकºयांनी आता कौलांना बाजूला सारलं़ आणि मंगलोरी किंवा बंगलोरी कौलांना वर चढवलं़ कुंभाराच्या कौलांना भाव मिळेनासा झाला़ इतर बलुत्यांसारखा तोही आपल्या कारागिरीला मुकला़
© संजय मुंदलकर
No comments:
Post a Comment