‘गाव करी ते राव न करी’, असं म्हणतात़ कारण गावातलं खेटरही गावकºयांच्या मर्जीबिगर बाहेर जात नाही़ गावात एकोपा असतो़ एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची भावना असते़ दुसºयाची दु:ख वाटून घेण्यासाठी रात्री जागण्यात येतात़ मरणधरण, लग्न अशाप्रसंगी वाट्टेल ती मदत करण्याची तयारी असते़ गावाच्या एका टोकावरून आलेली हाक कानात साठवून घेत हातातली कामं सोडून मदतीला क्षणात हजर होण्याची ताकद केवळ गावकºयांतच असते़ आपला-परका, कपट, द्वेष, स्वार्थ, गर्व,अभिमान हा भेद तिथं नसतोच; पण सावधान गाव आता बदलतो आहे़
गावाच्या चारित्र्याला ‘डाग’ लावला तो राजकारणाने! फार पूर्वी गाव हे स्वयंशासित, स्वयंसंचालित अशी संस्था होती़ गाव मस्त होतं़ स्वविकास साधत होतं़ बाह्यहस्तक्षेप तिथं होत नव्हता़ गावकरीही ते सहन करीत नव्हते़ मात्र, जिल्हा पातळीवरील राजकारणाने बोट लावलं़ हे राजकारण गावात घुसलं़ राजकीय पक्षानेही आपापल्या चुली मांडल्या़ गावात ही तशी नवीच समस्या होती़ सुरुवातीला कुणीही शेकलं नाही़ मात्र,
त्यांनी चार बूक शिकलेल्यांना हातीशी धरले़ त्यानंतर गट पडले़ तट पडले़ बाहेरच्या ‘पांढºया बगळ्यां’ची संख्या वाढली़ गावातलं खाद्य त्यांना आवडतं गेलं़ तेही त्यांच्या पचनी पडलं़ इथं प्रदूषण नव्हतं़ त्यामुळं आरोग्याला चांगलंच मानवलं़
गावाचा सरपंच बिनविरोध निवडून येण्याचं तंत्र गेलं़ निवडणूक रंगू लागली़ बाहेरच्या राजकारण्यांनी गावात दारू आणली, मटका आणला, जुगारही आणला़ पार्ट्याही आणल्या़ ग्रामपंचायत निवडणुकीत पैश्यांनी जोर केला़ दारूच्या शिश्या, लुगडं,धोतरं हातोहात घरांघरात पोहोचतं झालं़ अशिक्षितांना आपल्या बाजूनं वळवलं़ मतांचं महत्त्व त्यांना कळू दिलं नाही़ ते त्यापासून अलगच राहावे,यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले़
निवडणुकीत बाहेरच्यांच्या गटाचा विजय झाला़ तो कसा हे सर्वांनाच ठाऊक होतं़ करणार काय?बुडाशीच कोलीत लावून घेतलं़ ते केव्हाही पेट घेणार हे त्यांना उमगून आलं़ झालं गावातली मन नासली़ शंकेखोर वातावरण तयार झालं़ जो-तो इतरांकडे संशयीवृत्तीने पाहू लागला़ बाहेरच्यांना मात्र हक्काचं घरच मिळालं़ राज्याच्या खुर्चीत बसण्यासाठी गावाचा चांगलाच उपयोग होणार होता़
पंचायत समिती़, जिल्हा परिषद आणि विधानसभा, लोकसभेतील खुर्चीसाठी त्यांनी सरपंचाला हाताशी धरलं़ काही वर्षांपासून सरपंचपद हे गावकºयांच्या भल्याशी झटत होतं़ आता मात्र स्वत:च घर कसं भरेलं,याचं चिंतन होताना दिसत आहे़ गावातल्या नाल्याचं, कोंडवाड्याचं, पाण्याच्या टाकीचं बांधकाम करताना त्यातील सीमेंट, रेती, विटा या सरपंचाच्या घशात ओतण्यात येत आहे़ जमाखर्च अगदी बरोबर दाखविण्यात येतो़ यात ग्रामसेवकही आपले हात ओले करून घेत आहे़ भरीसभर हा सरपंच जिल्ह्याच्या राजकारण्यांच्या दावणीला बांधला गेला आहे़ मुंबई, दिल्लीच्या वाºया करतो आहे़ कधीकाळी गावाच्या विकासासाठी समोरचे ताट बाजूला सारून धावून जाणारा हा पुढारी आता दुसºयाचा घास पाहून लाळ घोळतो आहे़
आता ‘ते’ दलालही बनले
जिल्ह्याच्या राजकारणात भाव न मिळालेल्यांनी नवा फंडा तयार केला़ गावातील शेतजमिनी विकत घेण्यास सुरुवात केली़ बसमार्गावरील शेतीवर त्यांचा चांगलाच डोळा होता़ महत्त्वाच्या मार्गावरील गावात त्यांनी हातपाय पसरविणे सुरू केले़ गावातील काही ऐतखाऊ आणि आळशी शेतकºयांनी त्यांच्या इच्छेला खतपाणी दिले़ आता गावात नवीनच वर्ग जन्माला आला़ स्वत:ला ते आता ‘लँड डेव्हलपर’ किंवा ‘बिल्डर’ असे उपनाव देत गेले़ मात्र, ते ‘भू माफिया’ ठरले़ काळ्या आईचा बाजार मांडणारे दलाल ठरले़ गरीब शेतकºयांच्या शेतजमिनी घेण्यासाठी त्यांनी खास माणसे तयार केली़ पिकाचे उत्पादन कसे कमी होते, ती परवडत का नाही,याबाबत ते पुराव्यानिशी ‘मार्गदर्शन’करू लागले़ ही कामे त्यांनी गावातील माणसांवरच सोपविली़ पैश्यांची चटक लावून देण्यात ते तरबेज होते़ वेळप्रसंगी धमकाविण्याचेही प्रकार घडले़ एखाद्याने जमीन देण्यास नकार दिल्यास त्याच्या शेजारची मिळवू लागले़ त्यामुळे पहिला त्रस्त होत आपली शेतजमीन संबंधितांना विकू लागला़ गावातील जमिनी ताब्यात घेण्याचा जणू चंगच त्यांनी बांधला आहे़ तालुकापातळीवरील गावात त्यांना सिमेंटची जंगले उभी करायची आहे़ शहरातील गुन्हेगारी गावातही पोसायची आहे़ जिवापाड जपलेली जमीन हडपण्यात येत आहे़ ही कीड आता गावोगावी लागली असून त्यापासून वेळीच सावध होणे गरजचे आहे़
© संजय इस्तारी मुंदलकर
No comments:
Post a Comment