Wednesday, 15 February 2023

मानवाने आपल्यातील जनावर बाहेर काढलाच ...

 

मानवाने आपला मूळ स्वभाव सोडला नाही. तो आधुनिक झाला असला, कितीही तंत्रज्ञानाच्या बाता मारत असला, तरी यासाठी तो कधीचाच जनावर होऊन निसर्गाच्या विरोधात गेला आहे. आणि मग त्याच्या करणीमुळे पूर, महापूर, चक्रीवादळे, भूकंप, ओला आणि कोरडा  दुष्काळ असे अस्तित्वहीन करणारे संकटे कोसळत आहेत. 


मानव उत्क्रांतीतून निर्माण झाल्याचे सांगण्यात  येते़ तो  माकडापासून बनला, असेही ऐकत आलो आहोत़ अर्थातच आपली उत्पत्ती ही प्राणी वा जनावरापासून झाली. आताच्या युगात ही उत्पत्ती मानवात रुपांतरित झाली असली तरी  मानवाने आपला मूळ स्वभाव सोडला नाही. तो आधुनिक झाला असला, कितीही तंत्रज्ञानाच्या बाता मारत असला, तरी यासाठी तो कधीचाच जनावर होऊन निसर्गाच्या विरोधात गेला आहे. आणि मग त्याच्या करणीमुळे पूर, महापूर, चक्रीवादळे, भूकंप, ओला आणि कोरडा  दुष्काळ असे अस्तित्वहीन करणारे संकटे कोसळत आहेत. अगदी त्याने स्वत:ला जिवंत ठेवणारा हवेतील आॅक्सिजन सुद्धा नासवून ठेवला. तहान भागविणारे पाणी सुद्धा दूषित केले. मागील  ६ फेब्रुवारी  रोजी तुर्की आणि सीरिया या दोन देशांमध्ये आलेला भूकंप तेच सांगतोय. 

भूकंपामुळे हजारो घरे आणि इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. पहाटेच्या सुमारास झोपेत असलेल्या लोकांना पापणी सुद्धा उचलता आली नाही. कित्येक बाळांचा आपल्या मातेच्या छातीशी कवटाळलेल्या अवस्थेत मृत्यू झाला. काय जाण होती त्यांना आणि कुणी जाणले होते, असा क्षण भोगावा लागेल? तब्बल ८५ हजार मृत्यू या  ढिगाºयाखाली  झाल्याचा  दावा  करण्यात  येतो.

मानवाने पर्यावरणाविरोधात जाऊन निसर्गावर वर्चस्व गाजवल्याने होणारे नुकसान डोळ्यांनी दिसत असतानाही त्यापासून कोणताही धडा घेतला नाही, हे ही मोठे आश्चर्य ! त्याच तोडीचे आश्चर्य  तुर्कीमध्ये बचाव कार्यादरम्यान घडताना अनुभवास येत आहे.  शेकडो टन वजनाच्या ढिगाºयाखालून लोक सुखरूप  बचावल्याच्या  अनेक घटना समोर येत आहेत. तुकीर्तील हाताय येथे दोन महिन्यांच्या बाळाला कित्येक किलो वजनाच्या ढिगाºयातून एक...दोन...पाच किंवा दहा नव्हे तर चक्क १२८ तासांनंतर सुखरुप बाहेर काढले. मृत्यूवर  मात केलेल्या या चिमुकल्यासाठी सुरक्षा जवानांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. त्याला वाचवल्याचा आनंद मदत आणि बचाव पथकाच्या चेहºयावर संपूर्ण जगाने अनुभवला.

सुदैवाने भूकंपातून अनेक जण बचावले आहेत. आता मात्र त्यांच्यासमोर अन्न आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. तितक्याच प्रमाणात वैद्यकीय समस्या सुद्धा उभ्या  राहिल्या आहेत. शिवाय अनेकांना मानसिक धक्का बसल्याचे आढळून आले आहे.

          बांधकामांकडे दुर्लक्ष ... 

या भूकंपात तब्बल ९०  हजार इमारतींचे नुकसान  झाल्याचे समोर आले आहे. तुर्कीमध्ये ७.८  इतक्या रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे १०० फूट खोल आणि ६५० फूट रुंद अशी विशाल दरी निर्माण झाली. आता सरकारच्या एका विभागाकडून कोसळलेल्या इमारतींच्या बांधकामांची चौकशी करण्यात येत आह.े १० राज्यामधील ६० पेक्षा ठेकेदारांना इमारतींची निकृष्ट उभारणी केल्याच्या आरोपात अटक केली. यावरूनच दोषी कोण, हे दिसून येते. तुर्कीमध्ये १९९७ मध्ये भूकंपविरोधी इमारत बांधकामाद्वारे (डक्टाईल काँक्रिट) इमारती  उभारण्याचा  कायदा पारित केला होता. यासाठी लवचिक साहित्यांचा वापर केल्यास भूकंपाचे धक्के सहन करता येणे शक्य असते; परंतु त्याकडे  दुर्लक्ष  करत या देशात १० टक्के इमारती नियमांनुसार उभारण्यात आल्याचे उघड झाले आहे. ही बाब समोर येताच पोलिसांनी अनेक बांधकाम व्यावसायिकांना अटकेचे समन्स पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते.

सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे मानवाने आपल्यातील जनावर बाहेर काढलाच़ तो आपल्याच माणसांविरोधात, निसर्गाविरोधात कृत्ये करत असून, ती सर्व मानवाच्या जिवावर उठली आहेत, हे नाकारणार कुठंवर? 

***

No comments:

Post a Comment