Wednesday, 15 February 2023

वाचनाचे महत्त्व नाकारणार तरी कसे?

 दोन  शब्दांने  काय  आणि  किती  खोल  किमया करून परिणाम साधला, हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अभ्यासातून आपण वारंवार अनुभवत आहोत. अक्षराने किमया साधली म्हणूनच जग आजची घडी पाहत आहे़ आणि म्हणूनही लिखाण आणि वाचनाची प्रवृत्ती  प्रत्येकाच्या अंगी असावीच. ती असली म्हणजे वाचकाच्या ज्ञानात आणि प्रगल्भतेत वाढ होते. वाचनामुळे लेखनाची सवय व कल्पनाशक्तीला देखील वाव मिळत असतो. वाचनामुळे रसिकता, सृजनशीलता वाढीस लागते. दुसºयाच्या भावनांविषयी आदर निर्माण होतो. यासारखे अनेक सकारात्मक बदल वाचनामुळे जीवनात होत असतात. 

आज मनुष्याजवळ असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी ताकत आहे़ आणि ती प्रत्येक शब्दांतून  पुढे  आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने ह्यज्ञानासक्तह्ण व्हावे, ती सक्ती मानू नये. या ज्ञानाच्या  सहाय्याने  माणूस प्रगल्भ आणि  समृद्ध तर होतोच आणि त्याचा प्रभावही त्याच्या सर्वांग कार्यशैलीवर पडत असतो. यामुळेच ह्यवाचाल तर वाचालह्ण ही म्हण आजच्या  पिढीला खूप  समर्पक आहे, याची जाणीव होते. 


नव्याने  येणाºया प्रत्येक पिढीत काही  ना काही प्रगती ही होत असते. आजची पिढी इंटरनेट, टी.व्ही., कॉम्प्युटर, स्मार्ट फोन, लॅपटॉप अशा तांत्रिक आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकल्याने वाचनापासून दूर गेली आहे. निवांतपणा मिळाला तरी सुद्धा मोबाईल, कॉम्प्युटर, टॅब, टी.व्ही. अशा मनोरंजनाच्या ह्यतांत्रिक साहित्याह्णत डोके घालून बसलेली पिढी आपण बघत असतो. याच पार्श्वभूमीचा सखोल विचार करून आणि  विविध गॅजेट्सच्या मागे धावणाºया  तरुण पिढीने  किमान  दिवसातील एक तास तरी वाचनासाठी देणे गरजेचे आहे. कारण कोणतेही वाचन हे मनावर कायम ठसत असते. त्याचा खोल प्रभाव रुतत जात असतो.


वाचनात आंबट कढी असे दोन शब्द आल्यास आपल्या मेंदूवर आंबट ही चव कायमची कोरली जाते आणि त्याचवेळी जीभ सुद्धा वळवळते़ असे का होते, याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. हा अनुभव आपण प्रत्येक आठवड्यात घेत असेल तर वाचनात तर कित्येक रंग आणि चविष्ट बाबी ओतप्रोत असतात, मग आपण या नैसर्गिक आस्वादापासून दूर का? वाचन मनाला सुसंस्कृतपणा,विचारप्रगल्भता आणि संशोधनवृत्ती  बहाल करते़  आणि  या वृत्तीतूनच साखळी तयार होत जाते, निरंतर विकासाची! मानवाने लिखाण, वाचनाची किमया साधली़़़सांधली सुद्धा; परंतु  तिचा प्रवाह सुद्धा खंडित केला, हे ही दुर्दैव स्वीकारावे लागते आणि तेही या आधुनिक युगात. दुसरे असे की आपण दिव्यांगांना जर डोळस करून वाचनाची दिव्यदृष्टी देत असेल, तर हा प्रवाह संपवण्याचा अधिकार आपणास कसा? 


महासत्ता होण्याच्या मार्गावर असणाºया देशाची  खरी शक्ती  ही देशातील तरुणाई असेल, असे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम  यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून सांगितले आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव  आदींमुळेच डॉ. कलाम यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. डॉ. कलाम यांचे  लेखन आजही आपणास स्फूर्ती व प्रेरणा देणारे आहे. डॉ. कलाम यांनी युवापिढीप्रति दाखविलेल्या विश्वासाला प्रत्यक्षात आणण्यासाठी व प्रगतीशील आणि सुसंस्कृत, सकारात्मक विचारांची पिढी घडविण्यासाठी वाचनाचे  महत्त्व नाकारणार तरी कसे? कुणालाही अवांतर वाचनासाठी वेळ मिळत नाही, अशी सबब पुढे येता कामा नये. वाचन हे व्हावेच़ मग ते वृत्तपत्र, असो जुने-नवे पुस्तक असो. पुढील काळ संस्कारांचा हवा असेल, तर चांगलेच वाचनच नव्हे तर चांगले लिखाण सुद्धा अभिप्रेत आहे. जर कुणी वाचनासाठी सक्ती करत असेल तर, ती स्वीकारणेही तितकीच मोठी जबाबदारी पार पाडण्यासारखे आहे, असे वाटते.

संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित)

No comments:

Post a Comment