महादेवनं शेवटचा विळा पाजवला आणि काणसेनं त्याला धार लावली़ विळे मोजून एका सुतळीनं बांधून ठेवले़ रामराव धनगरानं पाच विळे बनवायला दिले होते़ निंदाई सुरू झालेली़ महादेवला पाच नव्या कोºया विळ्यांची ‘आॅर्डर’ मिळाली़ एकाच वेळी मोठी रक्कम हातात येणार होती़ मग त्यानं भट्टीतले कोळसे बाहेर ओढून विझविले़ हातोडा, छन्नी, काणस, घण, डहान, लहान ऐरण, सांडशी असे अवजारे जागच्या जागी ठेवले़ दुकानाची झाडलोट केली़ कवाडीजवळ उभं राहून बाहेर नजर टाकली़ गाव सामसुम होते़ बसस्टँडवर काहीजण नजरेत आले़ एकटे दुकटे पानठेल्याशी उभे होते़ काही म्हाताºयाकोताºयांच्या बीडी-तंबाखूच्या संगतीत गप्पा सुरू होत्या़
एवढ्यात बाभुळगांवकडून एसटी बस गच्चकन येऊन थांबली़ गाडीत गर्दी नव्हती़ तुकाराम बारश्याचा मन्या, रामराव वठ्ठ्याचा दिन्या अन् शेजारच्या गावातली दोन-चार लोक उतरले होते. कंडक्टरनं घंटी मारली अन् एसटी पुन्हा नेरकडं निघाली.
इकडं नांदीजवळ महादेवनं हातपाय धुतले़ सपरीतल्या विटांवरून उडी मारत तो आतल्या खोलीत आला़ सपरीतल्या मातीचे पोपडे निघाले होते़ अजूनी ती कोरडी झाली नव्हती़ दुपारचा बरोबर एक वाजला होता़ त्यानं ग्लास आणि गडवा भरून घेतला़ दवडीतली दीड भाकर ताटात मोडून घेतली़ वाटीत भाजीच्या गंजातून फोडणीचं वरण घेतलं़ बरणीतलं रायतं घेवून जेवण उरकवलं़ शेल्याला हात पुसत तो घराबाहेर आला़ भरदुपारी अंगणात अंधार पडल्याचं दिसलं तसं त्याचं ध्यान वर गेलं़ थोड्यावेळापूर्वी चकाचक असलल्या आकाशात एकदम ढगांची रेटारेटी सुरू होती़ त्याच्या छातीत धस्स झालं़
‘ अरे देवा! आता हा चांगलास्स रिचवते़ पुन्ना सपरीत गाटा व्हईऩ देवबी म्हायी मोठी परीक्षाचं घेवून राह्यला माही अन् हा आबाबी कुठी गेला कोन जाणे ?’ असं स्वत:शीच बोलत तो तुºहाट्या-पºहाट्याच्या ढिगाकडे गेला़
‘दोन दिस चांगली उघाड पड्ली़ सपरीबी सोेकली व्हती़ आज पानी रिचवला तं कायी खरं नायी़’ असं पुटपुटत त्यानं हातातल्या विळ्यानं पºहाट्या उकरल्या़
इतक्यात थंड वारा सुरू झाला़ दोन-चार थेंबही पडू लागले़ महादेवनं पºहाट्याचा कवटा दुकानातल्या भात्याजवळ आणून ठेवला़ आता हवेचा वेगही वाढला़ धावत जात तुराट्याचा दुसरा कवटा पहिल्याच्या बाजूला ठेवला़थेंब वाढत गेले़ हलकासा पाऊसही सुरू झाला़ अंगणातल्या कवाडीजवळ येत त्यानं आबाला हाक दिली़‘‘आबा, ओ आबा़’’ तेवढ्यात तुकाराम कुंभाराचा सुध्या येताना दिसला़ महादेवनं मग त्यालाच विचारलं,‘‘अरे सुध्या, म्हां आबा दिसला का ईस्टँडवर?’’
‘‘नायी गा काका़’’
‘‘़़़अन् तुया डवºयाले काय झालं?’’
‘‘अगा, दांडी तुटली़ म्हटलं रामकिस्ना मामाकडं नेतो लौकऱ’’
‘‘बरं बरं जा लौकऱ अभाय तं चांगलस्स भरून आलं़’’
त्यानं पºहाट्याचे चार कवटे दुकान आणि गायीच्या कोठ्यात आणून ठेवले़ कारण की पावसाचा काही भरवसा नव्हता़ कधी, कसा आणि किती दिवस रिचवण काही सांगता येत नव्हतं़ तेवढ्यात महादेवचा बाप आबा काठी टेकवत टेकवत आला़
‘‘कुठी गेला होतास्स गां?’’ महादेवनं शेल्यानं डोक्यावरचे केस पुसत विचारलं़
‘‘अरे थ्या सखाराम शिप्याच्या घरून मेनकापड आनला़ सपरीवर हातरून देवू, थोडकश्यानं तरी पानी थांबलं़’’ दुकानातल्या बाजीवर बूड टेकवत आबा उत्तरला़
‘‘हो, पन तेवढ्यानं भागनार नायी़ पान्याच्या माºयानं पानी गयनचं़ मातर अवंदाचं वर्स निभवास्स लागऩ नशिबानं हे दिस दाखोले तं भोगालेस्स पाह्यजे़’’
पावसाचे थेंब कमी झाले तसा महादेव म्हणाला, ‘‘मी गायीसाठी दोन-चार पेंड्या चारा घिवून येतो़ पानी आलंस्स तं जरा ध्यान ठिवजो़ दुपारच्या सुट्टीत पोट्टेबी येईन जेवाले़ पाह्यजो त्यायच्याकडं, जेवतानी नुसते भांडते लेकाचे़’’
मग आपल्या हातचा विळा घेवून महादेव रस्त्याला लागला़ घराजवळ खारीतल्या पायवाटेने तो पांदणीत आला़ वावरावावरात निंदणी, डवरणीचं काम सुरू होतं़ पºहाटी वितभर वाढलेली तर तुरीच्या झाडांनीही उभारी धरली होती़ नजर पोहोचेपर्यंतचा सगळा शिवार हिरवागार दिसत होता़ मजुरांचे हात जोरात चालत होते़ बायकांचा कोलाहल कानावर आदळत होता़ दुसरीकडे डोक्यावरील आभाळात ढगांची गर्दी होती़ महादेवनं पावलांचा वेग वाढवला़ गवताच्या दोन-चार पेंड्या घेवून घर गाठणं गरजेचं होतं़ मात्र, सध्या तरी देवाचा पाऊस त्याच्या आयुष्यावर उठला होता, निदान त्याला तसा भास झाला होता़ आणि त्याचं कारणही तसंच होतं़़़
़़़महादेवच्या पोटी तीन पोरं होती़ मोठा विशाल, मधला प्रशांत त्यानंतर संदीप़ बायको पार्वती आणि बाप आबा असा त्याचा परिवार होता़ तो आपल्या आईवडलांना एकुलताच होता़ लाडाचा असल्याने मायबापानं कुठंही पाठवलं नाही़ केवळ गावातल्याच शाळेत तो शिकला़ मात्र, त्याच्या मनात शिक्षणाचं आकर्षण होतं़ आपण शिकलो तर नाही़, मुलांना तरी आपण खूप शिकवू, असा त्याने निर्धार केला होता़ आणि तो तडीसही नेला़ विशाल अकोल्यातून आपल्या परिवारासाठी आनंदाची बातमी घेवून आला़ त्याला बी. एड.साठी प्रवेश मिळणार होता; पण डोनेशनची गोष्ट ऐकून महादेवचा हिरमोड झाला़ मात्र, दुसºयाच क्षणी तो मनातून ताठ उभा राहिला़ कुठल्याही परिस्थितीत पोरांसाठी पैसे उभे करण्याचा निश्चय केला.
‘‘ह्ये सरकार गरिबाच्या लेकराले शिकूस्स देत न्हायी़ शिरीमंताकून घ्या म्हनावं लागनं तितके पैसे़ गरिबाच्या घरात तरी उजेड पडू द्याचा का न्हायी़’’ आबानं नातवाची तगमग ऐकून म्हटलं़
‘‘तसं नाही आबा़ सरकार नाही,संस्थावाले इतके पैसे घेते़’’ विशाल म्हणाला़
‘‘अरे पन, सरकारनं कायी कराले पाह्यजे का न्हायी?’’ आबाला विशालचं मत पटलेलं नव्हतं़
तेव्हा विशाल काहीशा नाराजीनेच महादेवला म्हणाला,‘‘बाबा, राहू द्या़ पुढल्या वर्षी कुठंतरी अॅडमिशन मिळेलच़तेव्हा पाहू...’’
तसा महादेव लागलीच म्हणाला,‘‘नायी पोरा़ म्होरल्या वर्सी नाही़ यंदाच!आतातोवरक तू एकेक सालं जपलं़ हे साल वाया जावू नोको देवू़ मी कायीतरी येवस्था करतो़ तू कायजी करू नोको़ कवा पाह्यजे थे सांग म्हंजीन मी कामाले लागतो़ फकस्त इतकं ध्यानात ठेव का तुया मांग दोघं भाऊ हायीती़ ’’
‘‘अजून पंधरा दिवस वेळ आहे़’’
‘‘बस्स तं मंग़ उद्यापासून काम सुरू़’’
‘‘़़़पण बाबा, रक्कम मोठी आहेक़ुठून जमवणार हे सर्व?’’
‘‘पोरा, रक्ताचे नसले तरी जीवाले जीव देणारे काका, मामा हायीत तुये़ लावतील हातभार थोडा थोडा़ कमी पडले तं लोखंड टाकू ईकूऩ तू त्याची चिंता नोको करू़ मी पाह्यतो काय कराचं तं़’’ महादेव विश्वासानं म्हणाला़
विशाल अभ्यासात हुशार होता़ त्याला शिक्षक व्हायचं होतं़ म्हणून त्यानं बी. एड़ साठी अर्ज टाकला़ मोठा मास्तर झाला तर लहान पोरंही मार्गी लागतील, असा महादेवचा होरा होता़ घरी तर शेतीवाडी नव्हती़ खातकाम करून तो आपल्या परिवाराच्या चार घास कमावण्याइतकी कमाई करत होता़ पार्वती शेतमजूरी करून संसाराला हातभार लावायची़ घरात शिल्लक असा पैसा नव्हताच़ तरीही महादेवनं हिंमत हारली नाही़ छातीला माती लावत पोराला कोणत्याही परिस्थितीत मास्तर बनवायचाच, असा चंग बांधला होता़ मात्र, त्यासाठी पन्नास हजाराची सोय करावी लागणार होती़ नशीब म्हणून थोडी फार सवलत मिळाली होती़ संबंधित संस्थेला दिवाळीपर्यंत एकूण रक्कम देणे गरजेचे होते़
त्या रात्री जेवणखाणं झाल्यानंतर महादेवनं पार्वतीला सांगितलं,‘‘अवं, मी काय म्हनतो़ सकायी ईशालले पातूरच्या बाईकडं पाठोलं तं...’’
त्यावर पार्वती काही बोलली नाही. तेव्हा महादेवनंच आपलं बोलण रेटलं,‘‘तिचीबी शेतवाडी हाये़ निंदण,डवरणं सुरू हाये़ तरीबी जवायानं थोडा जोर लावला तं काम व्हईऩ’’
‘‘अवं पर बाईलेबी कसं म्हनावं़ ज्याच्या त्याच्या घरी निंदाई, डवºयाचं काम हाये़ मातर बाईवर ईस्वास हाये़ तुमची दूरची चुलत बईन असली म्हून काय झालं, तिनं आपल्याले टायमाटायमाले मदत केलीस्स हाये़’’ पार्वती म्हणाली़
‘‘़़़मले वाट्टे बाई पाचक हजार तं देईनस्स़’’ महादेवनं आपला विश्वास बोलून दाखविला़
‘‘अवं तं बाकीच्या पैशांचं काय?’’
‘‘व्हयं, त्याचाच ईचार हाये आता़’’
‘‘मोरगांवचा सुदाम भाऊ, दिसपूरचा नामा तात्या अन् कारंज्याचा देवराव हेस्स लोक कायी तरी देईऩ बाकी, गावातल्या आण्याजी अन् तुक्या दादाकडंबी सबद टाकून पाहू... ’’
‘‘़़़तरीबी कमी पडले तं?’’
‘‘अवं लोखंड हाये़ गाय हाये़ बोद्या हाये़ अशावक्ती मानसापरीस जनावरंच कामी येत्यात़ ईकून टाकू लेकाले़ तरीबी नायी जमलं तं सपरीवरच्या टिना ईकू़पर ईशाल मास्तर झालास्स पाह्यजे़’’
‘‘अवं पर पावसायाचे दिस हाये़ टिना ईकल्या तं तिथं टाकणार काय? मेनकापड टिकत नायी़’’
‘‘अवो, तट्टे टाकू तुराट्याचे़ दोन घरी हायीत़ अनखी दोनक दुसºया कोनाले मांगू़’’ महादेवचा बेत तयार होता़
‘‘़़़पर सपरीवर तट्टे टाकले तरी थेबी गयनारचं का नायी़ नुसता गाटा व्हईऩ’’
‘‘मेनकापड हाथरू़़क़ायी नायी व्हतं़़़झोप आता़’’
महादेवनं आपल्याबरोबर पार्वतीलाही निश्चिंत केलं़ त्याच्या प्लॅननुसार हाती पैसे पडत गेले़ गावातल्याच सदाशिव पाठरेला एक गाय आणि बोद्या नावाचा गोºहा विकला़ तरीही अर्धी रक्कम जुळत नव्हती, तेव्हा त्यानं चांगले जाडेभरडे सहा टिन गावातल्या दौलत पटवाºयाला विकले़ भर पावसाळ्यात आपल्या पोराच्या शिक्षणासाठी डोक्यावरचं छप्पर विकणारा महादेव एक अवलियाच होता़ पार्वतीच्या डोळ्यांतून मात्र आसवाची रांग लागली़ लहान पोरांना काही कळत नव्हतं़ आपला मोठा भाऊ मास्तर होतोय, एवढंच त्यांच्या ध्यानी येत होतं़ त्याच दिवशी महादेवंन सपरीवर तुराट्याचे पाच तट्टे चढविले़ आणि वरच्या वर वरच्या देवाला हात जोडत म्हणाला,‘‘देवा,आता म्हायी लाज तुया हातात हाये़ एवढं मी पोरासाठी करतो़ त्याले लौकर मास्तर बनवं अन् माह्या घरावर पुन्ना असेच टिनं बसू दे़’’
दहा-बारा दिवस कसे निघून गेले, महादेवच्या ध्यानातही आलं नाही़ दुसºया दिवशी त्यानं विशालच्या हाती पंचवीस हजार ठेवले़ आणि म्हणाला,‘‘पोरा, मीनं पैसे कसे जमवले, हे तूबी पाह्यलंस्स़ बस्स! तेवढं ध्यानात ठेव़ आमी पान्यातबी दिवस काढू़ तू आपल्याकडं लक्ष दे़ कायी कायजी करू नोको़ बाकीच्या पैशाची दिवायीतवरक येवस्था व्हईनस्स़ लौकर मास्तर होवून आपल्या भावालेबी पुढं ने़’’ बोलता बोलता त्याला हुंदका आला. पार्वतीनं त्याला ओवाळलं. विशाल आपल्या मायबापाच्या आणि आजोबाच्या पायी पडून अकोल्यात गेला़
एकदा आबाला मोठ्या नातवानं विचारलं,‘‘ का गा आबा, झड लागली तं कसं व्हईन?’’ तेव्हा आबा त्याच्या केसावर हात फिरवत म्हणाला, ‘‘अरे कायी नायी व्हतं़ दसºयात आपण नव्या टिना ईकत आणू़ जा खेय आता़’’ आपल्या नातवाची समजूत घालताना आबाला किती कठीण गेलं, हे त्याचं त्यालाच माहित! मनोमन त्यानं देवाला हात जोडले़‘देवा! माह्या महादेवले संभायून घे़’
लेखक : संजय मुंदलकर
कथा : महादेव म्हणाला, आता म्हायी लाज तुया हातात...(भाग १)
उर्वरित भाग लवकरच
छायाचित्र प्रतिकात्मक
No comments:
Post a Comment