भारताने आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत प्रत्येक क्षेत्रात अगणित कामगिरी केली आहे. समाजजीवन असो वा अर्थव्यवस्था, शिक्षण असो वा आरोग्य, पृथ्वी, जल असो वा आकाश असो, संरक्षण क्षेत्र असो, सर्वत्र भारताचा तिरंगा फडकवला गेला आहे.
देशाच्या विकासाच्या प्रवासात काही गोष्टी मैलाचे दगड ठरल्या आहेत, कृषी क्षेत्रापासून, आण्विक आणि अवकाश तंत्रज्ञानापर्यंत, सामान्य माणसाला उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवांपासून, जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांपर्यंत, वैद्यकीय शास्त्रापासून आयुर्वेदापर्यंत आणि उपचाराच्या विविध पद्धती, जैवतंत्रज्ञानापासून, जगात सक्षम आयटीपर्यंत. पॉवरहाऊस म्हणून, जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम तयार करण्यासाठी जगातील सर्वात वेगाने वाढणाºया प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याने, भारताने मोठा बदल पाहिला आहे. आपली लोकशाही राज्यघटनेवर आधारित आहे़ याच कारणामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण जागतिक स्तरावर नावलौकिक निर्माण केला आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या पुनर्विकासात एकापाठोपाठ एक अनेक पंचवार्षिक योजना आल्या आणि या योजनांनी महत्त्वाचा पाया म्हणून काम केले आहे. आजपर्यंत देशात जितक्या वेळा लोकसभा निवडणूक झाल्या, तितक्या वेळा देशातील लोकशाहीही मजबूत झाली आहे आणि विविध आव्हानांना तोंड द्यायलाही ती शिकली आहे.
हरितक्रांतीमुळे देशातील तृणधान्यांच्या उत्पादनात (विशेषत: गहू आणि धानाच्या उत्पादनात) अभूतपूर्व वाढ झाली. आज भारताकडे धान्याचा अतिरिक्त साठा आहे, जो स्वत:च्या गरजा पूर्ण करतो तसेच मित्र आणि गरजू देशांना मदत करतो. अंतराळ क्षेत्रात भारताच्या प्रवेशामागे डॉ. विक्रम साराभाई यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञाची ऊर्जा आणि क्षमता होती. इस्रोच्या स्थापनेचा उद्देश अंतराळ विकासाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास तसेच अवकाश विज्ञान आणि ग्रह संशोधनातील संशोधन तसेच राष्ट्राच्या विकासासाठी होता. भारत आता चंद्र आणि मंगळ मोहिमांवर लक्ष केंद्रित करत आहे. याशिवाय दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात भारताला जमिनीपासून आकाशापर्यंत नेणारा हा जगातील सर्वात मोठा दुग्धविकास कार्यक्रम होता.
भारताने १८ मे १९७४ रोजी पोखरण येथे पहिली अणुचाचणी करून आपल्या क्षमतेची ओळख जगाला करून दिली होती. २४ वर्षांनंतर ११ आणि १३ मे १९९८ रोजी एकामागून एक अशा पाच अणुचाचण्या घेतल्या. भारत आजच्या घडीला प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण झाला आहे़ अन्नधान्य उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, आरोग्य, संरक्षण, दळणवळण, अंतराळ संशोधन यासारख्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळविले.
मागील ७५ वर्षांत अनेक राजकीय पक्षांची सरकारे आली; परंतु विकासाचा, संपन्नतेचा प्रवाह अखंड राहिला़ जगातील सर्वांत मोठी लोकसंख्या आणि सर्वांत मोठी लोकशाही प्रणालीचा मान भारताला मिळाला आहे आणि तो मान फक्त आणि फक्त भारतच सांभाळू शकतो.
दोन वर्षांअगोदर कोरोना महामारीच्या काळात भारताने अमेरिकासह लहान मोठ्या देशांना औषधींचा पुरवठा केला़ तर, नंतरच्या काळात युद्धस्तरावर कोरोना प्रतिबंधक लसींचे संशोधन आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करून संपूर्ण देशाचे लसीकरण करवून आणले़ ही जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम होती़ त्याचवेळी भारताने आपली गरज भागवून अन्य देशांना ही लस उपलब्ध करून दिली़ शिवाय ‘प्रथम शेजारी’ ही संवेदनात्मक भूमिकाही मोठ्या बंधुच्या रूपात पार पाडली. भारताच्या आजपर्यंत प्रत्येक सकारात्मक भूमिकांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे कौतुक झाले आहे, हेही लहान थोर भारतीयाच्या अंगावर मूठभर मांस चढण्यासारखे आहे, असे आम्ही मानतो.
संजय मुंदलकर
सर्वाधिकार सुरक्षित
No comments:
Post a Comment