माणसाच्या आधी निसर्ग अस्तित्वात आला. पाने, फुले, हवा, पाणी, पशु-पक्षी अशा सर्व गोष्टी निसर्गानेच बहाल केल्या. माणूस स्वार्थी झाला आणि त्याच्या कार्यकक्षेत नको तिकी ढवळाढवळ करायला सुरुवात केली. त्यामुळे जंगल, जमीन, पाणी, हवा अशा सर्व घटकांचे नुकसान केले. पाणी हे सर्वात मोठे उदाहरण सांगता येईल. त्यामुळे जलप्रदूषण ही आज मानवाच्या अस्तित्वाची मोठी समस्या बनवली आहे.
संपूर्ण जगात काही आजार, रस्ते अपघात यांमध्ये मृत्युमुखी पडणाºया लोकांपेक्षा अधिक मृत्यू हे प्रदूषित पाण्यामुळे होत असल्याचे संशोधक वारंवार सांगत असतात. संपूर्ण जगभरात कोट्यवधी लोक आजही दूषित पाणी पितात. पाण्यात अनेक प्रकारची खनिजे, वायू मिसळलेले असतात. पाण्यात हे सर्व पदार्थ अतिप्रमाणात एकत्र मिसळले गेल्यानो ते प्रदूषित होते आणि मानवच काय वन्यजीव-प्राण्यांच्याही आरोग्यास हानिकारक बनले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातही मोठ्या लोकसंख्येला स्वच्छ पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. विशेष म्हणजे ही आकडेवारी शहरी लोकांची आहे. गावखेड्यातील लोकसंख्येच्या बाबतीत सांगायचे तर खेड्यांमध्ये आजही दूषित पाणी पित असल्याचे वारंवार दिसून येते. परिणामी ग्रामीण क्षेत्रात पाण्यामुळे होणारे आजारांचे प्रमाणही अधिक आहे.
संयुक्त राष्ट्रानुसार, आशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका या देशांमध्ये प्रत्येक वर्षी ३५ लाख लोकांचा मृत्यू पाण्यामुळे होणाºया विविध आजारांमुळे होतो. प्रदूषित किंवा घाण पाणी प्यायल्याने प्रत्येक वर्षी जगात ८ लाख ४२ हजार लोकांचा मृत्यू होतो.लोकांना स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहांच्या योग्य पातळीवरील सुविधा उपलब्ध करून दिल्यास संपूर्ण जगात पाण्यामुळे होणाºया आजारांच्या उपचारांवर देशांचा होणारा खर्च नऊ टक्क्यांनी कमी करता येऊ शकतो. भारताशिवाय असे ३२ देश आहेत, जिथे पाण्यामुळे होणाºया आजारांची संख्या अधिक आहे. या सर्व देशांमध्ये स्वच्छतेच्या सोयी आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिल्यास आजार आणि त्यासंबंधी गोष्टींवर होणारा खर्च कमी होईल, असेही युनोने म्हटले आहे.
प्रदूषित पाणी हे मानवासाठी विषासारखेच आहे. जगभरात मोठ्या प्रमाणातील आजारांसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रदूषित पाणी हेच कारण आहे. प्रदूषित पाण्यात अनेक रोगकारक जीवाणू, विषाणू असल्याने या पाण्यामुळे रोगांचा फैलाव होतो. अशा पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याने मणक्याचे हाडही वाकडे होण्याचा धोका असतो, असे तज्ज्ञ सांगतात.
मानवाच्या हाती विज्ञानाचे कोलीत लागले आणि विविध रसायनांचा शोध लावण्यात आला. पिकांवर रसायनिक द्रव्ये फवारण्यात येऊ लागली. पिकांच्या वाढीसाठी जमिनीत रासायनिक खते जवळजवळ पेरण्यात आली़ अतिरेक वाढल्याने ती नापिक बनली़ तर, तिच्यातील अर्क पाण्यात उतरला़ प्रवाहित होऊन नाले-ओढे प्रदूषित झाले आणि पुढे नद्या. त्यातील पाणी घरोघरी पोहोचले.
शहरातील घरांघरातील सांडपाणी जाणीवपूर्वक लहान मोठ्या नद्यांत सोडण्यात आले़ रासायनिकसारख्या तत्सम हजारो कारखान्यांतील दूषित घटके नद्यांत सोडण्यात आली़ त्यामुळे प्रत्येकाच्या घरात दूषित पाणी आपोआप पोहोचले.
जगातील कोणताही देश असो वा कोणत्याही देशातील एखादे शहर असो, ही समस्या मानवानेच तयार केली आहे़ पृथ्वीवरील पाण्याचा प्रत्येक स्रोत दूषित करण्यात आला आहे़ ही बाब नाकारता येणार नाही़ निसर्गाने प्रदान केलेल्या खळखळत्या नद्यांना अवरुद्ध करून त्यांच्या विदू्रपीकरणाचा मोठा खेळ अख्ख्या मानवजातीने खेळला़ आता निसर्ग त्याला आपल्या बोटावर नाचवत आहे.
No comments:
Post a Comment