Thursday, 9 November 2023

दिवाळी गोधन ...

आपल्या देशातील बहुतांश राज्यात पाच दिवसांची दिवाळी साजरी होतो. हा मोठा सण. शहरी भागात या सणाचे पूर्णपणे राजकारण आणि व्यावसायिकरण झाले असले तरी ग्रामीण भागात परंपरा, वारसा जपण्यात येतो.


दिवाळी उत्सव हा मुळातच कृषी, आरोग्य, आनंद यावर त्रिसूत्रीवर आधारित आहे. भारत कृषिप्रधान देश. औद्योगिकरणाला अधिक भाव असला तरी त्याचे मूळ शेतातील पिकेच आहे़ ते नाही तर काहीच नाही.
साधारणत: नवरात्र दसरा सणापासून सोयाबीन, मूग, ज्वारी वा हायब्रिडचा हंगाम सुरू होता़े याच कालावधीत शेतात पºहाटीची बोंडे फुटतात म्हणजे त्यातून कापूस बाहेर पडतो. पहिल्या कापसाचा वेचा हा ‘सीतादेई’ वा ‘सीतादेवी’ या पुजेने सुरू होतो.

दिवाळी सण कालावधीत हिवाळा सुरू होतो़ त्यामुळे आरोग्य अन्य ऋतुंच्या तुलनेत अधिक सुधारते़




घरात पिके येतात़ त्यामुळे घरोघरी आनंदाचे वातावरण असतेग़ाठीला पैकापाणी असतो. याचवेळी यात्रा वगैरे सुरू होतात. भाऊबिजेने त्यात आणखी भर पडते़ माहेरवासीण भावाकडे जाते वा तो येतो. नातेवाईकांची घरोघरी गर्दी़़़ पिकांची चर्चा ़़़ संस्कारांची देवाण घेवाण़़़विचारांची आदान प्रदान एका पिढीकडून नव्या पिढीकडे हस्तांतरित होत असते़ एकादवेळी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो़ आणि दिवाळीनंतर बार उडवूया असे निश्चित होते. एका नव्या पिढीचे बिज रोवल्या जाते, ते असे !
मात्र, यात शेतकºयांच्या जिवाभावाला विसरता येत नाही़ ती म्हणजे पाळीव जनावरे, गाय, बैल, बकरी, कुत्री, मांजरे, कोंबडे ही सर्व पाया-पायांशी वावरणारी सगेसोयरे. दिवाळीसणात गाय शेळी यांची विशेषत्वाने पुजा करण्यात येते़ गावाच्या सीमेपर्यंत नेऊन त्यांची पुजा अर्चा होते.


वसुबारसपासून म्हणजे पहिल्या दिवसांपासून शेणाचे ‘गोधन’ टाकण्यात येते़ हा शेणाचा एक मोठा गोळा असतो. त्याभोवती रांगोळी, पुजा केली जाते. रात्री त्यावर दिवनालीचा दिवा लावण्यात येतो.


दिवाळीसणात निसर्गाने शेतपिके, घराच्या कोठ्यातील जनावरे, मानवी नाते यांच्यात गुंफण घातली ती अशी ...

***

No comments:

Post a Comment