कथेवरून उंची गाठलेला ‘शराबी’
अनेकदा चित्रपटात दारू पिणाºयाचे दृश्य असतात़ काहीजण दारूड्याच्या भूमिकेतही असतात; परंतु तो कथेचा भाग असतो़ मुख्य कथानकापासून (screen play) तो बराच लांब असतो़ काहीवेळा उपकथानक म्हणूनही तसे काही दृश्य चित्रित केले जातात. चित्रपटाच्या एकूण यशात त्याचे स्थान दुय्यमच ठेवले जाते; पण अख्खा चित्रपट दारूड्याच्या भूमिकेवर आधारित असेल तर....? असा चित्रपट बॉक्स आॅफिसवर (box office) गटांगळ्या खाल्ल्याशिवाय राहणार नाही. प्रकाश मेहरा दिग्दर्शित शराबी चित्रपटाने मात्र मोठे यश मिळवले़ अगदी साध्या सोप्या कथेच्या सक्षम कथानकावर शराबी हिट ठरला.
भारतीय चित्रपटक्षेत्रातील महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट चित्रपट ‘शराबी’ला मागील वर्षात तब्बल ३५ वर्षे पूर्ण झालेत. अमिताभ यांच्यासह जयाप्रदा, प्राण, दीपक पाराशर, ओम प्रकाश, सत्येन कपूर आदींची भूमिका असलेला हा चित्रपट १८ मे १९८४ रोजी पडद्यावर आला आणि हिट ठरला.(hit on screen)
अगदी साध्या कथेवरून उंचीचा कळस गाठलेला चित्रपट म्हणजे ‘शराबी’ होय असे म्हणता येईल. मुलाच्या दारू पिण्यावरून पित्याशी होत असलेले वाद, गैरसमज असे या चित्रपटात दिसून येते. अन्य चित्रपटासारखे याठिकाणी बाप हा दारूडा नाही, तर मुलगा दारूच्या आहारी गेला आहे. त्यावरून बाप (प्राण) आणि मुलगा (अमिताभ) यांच्या वादाला सुंदर चित्रीत करण्यात आले आहे. सोबत आहे जयाप्रदासोबतचा प्रेमालाप तसेच मर्मभेदक संवाद आणि गाणी.
दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी कथेला दारूड्याचा चित्रपट असे काही होऊ दिले नाही, हेच त्यांचे मोठे यश आहे. या चित्रपटाचा बिग-बी यांच्या कारकिदीर्तील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये समावेश होतो.‘शराबी’ एक किस्सा सांगण्यात येतो की शूटिंगदरम्यान अमिताभ यांच्या हाताला अपघात झाला आणि त्यांना पूर्ण शूटिंग करताना त्यांना हात खिशात ठेवून काम करावे लागले. शराबी पाहताना ही बाब स्पष्ट जाणवते. अमिताभ आपला डाव खिशात ठेवून असल्याचे दिसून येते. ती घटना अशी की दिवाळीच्या सणादरम्यान ‘शराबी’चे शूटिंग अर्थात छायाचित्रण सुरू होते. एक जळता फटाका अमिताभ यांच्या हातावर पडला आणि त्यामुळे हात भाजला. चित्रीकरणाच्या तारखा ठरल्यामुळे शूटिंग रद्द करणे शक्य नव्हते. म्हणून उशीर न लावता काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जळालेल्या हातासोबतच शूटिंग पूर्ण केली. बिग-बी यांना चित्रपटात आपला डावा हात खिशात ठेवावा लागला; पण त्याकाळी लोकांमध्ये ही फॅशन झाली होती. याशिवाय ‘इनक्लाब’ मध्येही त्यांना आपला डावा हात खिशात ठेवावा लागला होता. याबाबत अमिताभ सांगतात, की त्यावेळी हातावरील घाव भरलेले नव्हते. त्यामुळे हा डावा हात खिशात ठेवावा लागत होता. अनेकांना ती फॅशन असल्याचा समज झाला होता. विशेष म्हणजे लोकांनी तिचे अनुकरणही केले होते.
३५ हजार फुट उंचीवर कल्पना
अमिताभ यांनी एका आठवणीत सांगितले होते, शराबीची कल्पना १९८३ मध्ये सूचली होती. त्यासाठी त्यांचा पहिलाच जागतिक दौरा सुरू होता. त्यावेळी बिग-बी आणि त्यांच्या टीमने अमेरिका, इंग्लंडमधील १० शहरांत कार्यक्रम सादर केले होते. न्यू यॉर्कहून त्रिनिदाद, टोबागो प्रवासादरम्यान प्रकाश मेहरा यांनी वडील-मुलगा यांच्या नात्यावर चित्रपटाची कल्पना त्यांच्यासमोर ठेवली, ज्यामध्ये मुलगा एका मद्यपीच्या भूमिकेत असेल. बिग बी म्हणाले की, अटलांटिक महासागरावर हवेत सुमारे ३५ हजार फुटांच्या उंचीवर कल्पना सूचली होती.संवाद लहान ठेवण्याचा सल्ला
आपल्या वैयक्तिक आयुष्यात दारूला कधीच हात न लावणारे अमिताभ यांना चित्रपटात एका दारू पिणाºया मुलाचा ‘परफेक्ट’ असा अभिनय करायचा होता. त्यामुळे त्यांनी प्रकाश मेहरा यांना संवाद लहान लिहिण्याचा सल्ला दिला. कारण नशेत डायलॉग बोलण्यास वेळ लागतो. बिग बी नुसार, पहिल्या दिवशीच्या शूटनंतर मी सर्व गोष्टींचे निरीक्षण करून प्रकाशजींना सांगितले की, चित्रपटात मला जास्त वेळ नशेत राहायचे आहे आणि डायलॉग लांब असतील तर बोलायला वेळ लागेल. कदाचित चित्रपट पाच तासांचाही होईल. त्यानंतर काही सीन लहान करण्यात आले. असे सांगण्यात येते की काहीजण बारमध्ये अमिताभ यांचे घड्याळ, सोन्याची साखळीची चोरी करतात, ते दृश्य खुद्द बिग बी यांनी कोरियोग्राफ केले होते.
गाणीही लोकप्रिय (best songs)
‘शराबी’च्या यशात जितका वाटा कथा, पटकथा, संवादा आदींचा होता, तितकाच वाटा गाण्यांचाही होता. संगीतकार बप्पी लाहिरी यांनी सर्व गीतांचा उत्कृष्ट बाज चढवलेला. दे दे प्यार दे..., जहाँ मिल जाए चार यार..., इंतेहा हो गयी..., मुझे नौलखा मंगा दे...असो
की, मंझिले अपनी जगह , या सर्वांना बप्पीदांनी न्याय दिला. अंजान आणि दिग्दर्शक प्रकाश मेहरांनीही लिहिलेली ही सर्व गाणी हिट ठरली. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील ही गाणी आजही सर्वांना ऐकावीशी वाटते. प्राण यांच्याशी कौटुंबिक वाद असो, ओम प्रकाश यांच्यासोबत मन मोकळे करणारे क्षण असो वा पे्रयसी जयप्रदासोबत प्रीतीचा प्रसंग असो अमिताभ यांनी सकस अभिनय केल्याचे दिसून येते. शराबीतील ‘मुछें हो तो नत्थुलाल जैसी, वरना ना हो, हा संवाद खूप लोकप्रिय झाला होता.
की, मंझिले अपनी जगह , या सर्वांना बप्पीदांनी न्याय दिला. अंजान आणि दिग्दर्शक प्रकाश मेहरांनीही लिहिलेली ही सर्व गाणी हिट ठरली. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील ही गाणी आजही सर्वांना ऐकावीशी वाटते. प्राण यांच्याशी कौटुंबिक वाद असो, ओम प्रकाश यांच्यासोबत मन मोकळे करणारे क्षण असो वा पे्रयसी जयप्रदासोबत प्रीतीचा प्रसंग असो अमिताभ यांनी सकस अभिनय केल्याचे दिसून येते. शराबीतील ‘मुछें हो तो नत्थुलाल जैसी, वरना ना हो, हा संवाद खूप लोकप्रिय झाला होता.
© संजय इस्तारी मुंदलकर
No comments:
Post a Comment