Sunday, 1 March 2020

जयश्री गडकरांचं अप्रतिम सौंदर्य, अद्वितीय अभिनय


अप्रतिम सौंदर्य, अद्वितीय अभिनयाने रसिकांच्या मनावर पाच दशके अधिराज्य गाजवणाºया अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४२ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सदाशिवगड येथे सामान्य कोकणी कुटुंबात जयश्री गडकर यांचा जन्म झाला होता. मूळच्या मीना, नंतर जया, जयश्री या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्या पाच वर्षांच्या असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईला आल्यामुळे त्यांचे पुढचे शिक्षण मुंबईला झाले. कॉलेज शिक्षण मात्र झाले नाही. नृत्य-गायनाची आवड असल्यामुळे कलाक्षेत्राकडे त्यांचा विशेष ओढा होता. लहान असताना चोरून चित्रपट पाहिल्याच्या आठवणी जयश्री गडकर यांनी त्यांच्या ‘अशी मी जयश्री’ या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. बालपणीच त्यांचे नृत्याचे शिक्षण सुरू झाले. त्या गोपीकृष्णांकडून कथ्थक शिकल्या. पुढे  त्यांनी  गायनाचेही धडे घेतले.
१९५५ साली व्ही. शांताराम यांच्या झिनक झनक पायल बाजे’ मधील एका गाण्यात कोरसमध्ये नृत्य करणाºया तरुणींपैकी जयश्री गडकर एक होत्या. त्यावेळी त्यांचे वय होते केवळ  १३ वर्षे. १९५६ साली ‘दिसत तसं नसतं’ मध्ये अभिनेते  राजा गोसावी  यांच्यासोबत जयश्री यांनी काम केले होते. या चित्रपटातील एका गाण्यात त्यांनी नृत्य केले होते.
याच काळात रशियाचे नेते क्रुश्चेव भारत भेटीवर आले असताना पुण्यात एका कार्यक्रमात त्यांच्या स्वागतासाठी जयश्री गडकर यांनी ‘घनश्याम सुंदरा...’ आणि ‘लटपट लटपट तुझं चालणं...’  गाण्यांवर नृत्य सादर केले.  छायाचित्रकार राम देवताळे यांनी जयश्री गडकर यांची छायाचित्रे काढून त्यांच्या स्टुडिओमध्ये लावली. ही छायाचित्रे दिनकर पाटील यांच्या बघण्यात आली. त्यामुळे ‘दिसतं तसं नसतं’ मध्ये जयश्री गडकर यांना नृत्याची संधी मिळाली होती. दरम्यान, राजा परांजपे यांनी जयश्री गडकर यांना पाहिले आणि ‘गाठ पडली ठका ठका’मध्ये नायिकेची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहले नाही. सूर्यकांत हे नायक होते. पुढे ही जोडी सांगत्ये ऐका, लग्नाला जातो मी, पंचारती, मल्हारी मार्तंड, लाखात अशी देखणी, साधी माणसं, सून लाडकी  या   घराची आदी चित्रपटांतून एकत्र झळकली. या जोडीला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली होती.
सूर्यकांत यांच्याशिवाय अभिनेते राजा गोसावी यांच्यासोबतही जयश्री यांची आॅन स्क्रीन जोडी जमली होती. राजा गोसावींसोबत तब्बल नऊ चित्रपटांत जयश्री यांनी काम केले होते. ‘सांगत्ये ऐका’मधील ‘बुगडी माझी सांडली गं...’ ही लावणी अतिशय गाजली होती. तसेच, ‘साधी माणसं’ मधील ‘ऐरणीच्या देवा तुला ठिगणी ठिणगी वाहून दे...’ ही गाणीही अतिशय लोकप्रिय ठरली. मराठी चित्रपटांत सोज्वळ आणि तमाशाप्रधान भूमिका साकारून त्यांनी अष्टपैलू अभिनयाचे दर्शन घडवले होते.

लग्नानंतरही अभिनय...
१९७५ साली बाळ धुरी यांच्यासोबत जयश्री विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतरसुद्धा त्यांनी अभिनय सुरू ठेवला. बाळ धुरी यांच्यासोबतही त्यांनी काही चित्रपटांत भूमिका केल्या. अशी असावी सासू, हे दान कुंकवाचे, मुंबई ते मॉर्शिअसमध्ये ही जोडी एकत्र झळकली. ‘ससुराल’,‘लव कुश’, ‘डिटेक्टिव’, ‘संपूर्ण महाभारत’,‘जियो तो ऐसे जियो’ हिंदी चित्रपटांतूनही जयश्री यांनी भूमिका साकारल्या. केवळ मराठी, हिंदीतच नव्हे तर गुजराती, तामिळ, भोजपुरी आणि पंजाबी चित्रपटांतही काम केले.
 साधी माणसं, पाटलाची सून, थांब लक्ष्मी कुंकू  लावतेसाठी सलग तीन वर्षे राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जयश्री यांना मिळाला. जयश्री गडकर यांनी दग्दर्शन क्षेत्रातसुद्धा यशस्वी वावर केला.‘अशी असावी सासू’ हा चित्रपट त्यांनी  दिग्दर्शित केला होता. ‘अशी मी जयश्री’ हे जयश्री गडकर यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. मराठमोळ्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकू न घेणाºया जयश्री गडकर  यांची  आत्मकथा वसंत भालेकर यांनी  शब्दांकित केली आहे. आपल्या अप्रतिम अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया जयश्री गडकर  यांनी २९ आॅगस्ट २००८ रोजी जगाचा निरोप घेतला. हृदयविकारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

कैकयीऐवजी कौशल्या ...
भारतीय पहिली महामालिका ‘रामायण’मध्ये जयश्रींना  कै कयी बनायचे होते. तसे त्यांनी रामानंद सागर यांच्याकडे बोलून दाखवले. त्यावर ‘ही भूमिका  तुला दिली तर लोक मला शिव्या देतील, असे रामानंद यांनी जयश्रींना उत्तर दिले होते. कौशल्याच्या भूमिकेसाठी सुरुवातीपासूनच तुझंच नाव आम्ही ठरवलं होतं आणि  ही भूमिका तूच करावी, असे रामानंद सागर यांनी जयश्रींना म्हटले. विशेष असे की ‘रामायण’मध्ये दशरथ बनले होते त्यांचे पती बाळ धुरी.


© संजय इस्तारी मुंदलकर
   

Saturday, 29 February 2020

तेलाचं बोटं...

 लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. केवळ  ११ जुलैला लोकसंख्यावर चिंता आणि चिंतन करून चालणार नाही.  लोकसंख्यामुळे निर्माण झालेल्या समस्या पदोपदी आणि क्षणोक्षणी प्रत्येकाला भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे दररोज त्याविषयी विचारमंथन, जनजागृतीपेक्षा प्रत्यक्ष कृतीची  गरज निर्माण झाली आहे.


प्रसंग १ : लहानपणी आई केसाला फक्त तेलाचं बोट लाव, असं सांगायची. आम्हाला मात्र मोठ्या अनिच्छेनं केलेल्या आंघोळीनंतर केसांना चिप...चिप करायची सवय होती. त्यामुळं हा प्रकार आईच्या लक्षात आला की, कधी कधी तिच्या हातचा धपाटा बसायचाच बसायचा! मात्र, आई फक्त तेलाचं बोटच लाव, असं का म्हणते, हे काही अजूनही समजलंं नाही.
प्रसंग २ : एकदा आई जेवताना म्हणाली होती, की भाजी ‘लव लव’ खा. असं ती अनेकदा म्हणायची. यातून हा जेवायचा, तो जेवायचायं, असं  तिला सूचवायचं असे. ‘लव लव’ खा, या वाक्याचा अर्थ तिला भाजीला भाकर ही ‘लावून लावून’ खा अर्थात भाजी थोडी खा. जेवणारी मंडळी बाकी आहे, असं काहीसं सांगण्याचा तिचा हेतू असायचा; पण आईच्या बोलण्यातून येणाºया तेवढ्या दोन-चार वाक्याचा अर्थ समजायला आम्हाला अर्ध आयुष्य लागलं.
प्रसंग ३ : तिदस्ताच्या दिवाळीपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये पेट्रोलचे भाव शंभरीच्या आसपास पोहोचले होते. तो ८२ रुपयांवर अनेकदा टांगता राहिला़ आज काल ८० रुपयांच्या आसपास झुलता असतो. सांगायचे हे की पेट्रोल महाग झाले तरी दुचाकी वा तत्सम वाहने वापरणाºयांची संख्या कमी झालेली नाही़़़होणारही नाही. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने महागाईची झळ नको तितकी सोसावी लागत असली तरी भारतवासी ज्याप्रमाणे नेटपँक कितीही महाग झाला तरी मोबाईलचा वापर करणे सोडणार नाही, त्याचप्रमाणे वाहन विकत घेणे आणि त्याला रस्त्यावर दौडवणे (चालवणे) सोडणार नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. अर्थातच आजच्या अर्थपूर्ण आर्थिक घडीला मागणी तसा पुरवठा होण्याची स्थिती नाहीच मुळी...कारण लोकसंख्या...





सांगायचं असे की १९ व्या आणि २० व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मोठ्या बदलामुळे अर्थात विविध संशोधनामुळे जगाचा जन्मदर  वाढला. यात मनुष्याचे आयुर्मान वाढले असले तरी तीव्र गतीच्या लोकसंख्यावाढीमुळे अन्नधान्य, निवारा, बेकारी, गरिबी, गुन्हेगारी यासारख्या अनेक समस्या आ वासून उभ्या राहिल्या. विकासाच्या प्रत्येक टप्प्यात  प्रगती साधली असली तरी आता कोणत्याही क्षेत्रातील विकासाला ही अवाढव्य  लोकसंख्या मुख्य अडथळा ठरला आहे, याकडे दुर्लक्ष करता येत नाही.ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासन आणि प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असले तरी आपली, समाजाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

जगाची ऐशोआरामाची वृत्ती वाढली. दुचाकी, चारचाकी वाहनांची गरज सरली; पण शौक निर्माण झाला. कुठलीही गरज नसताना महागडे मोबाईल हाती आले. सर्व आयुष्य आँनलाईन झाले. कुणालाही वेळ राहिला नाही़ संवाद संपला. सुख-दु:खाची विचारणा संपली़ महिला, बालकांवरील अत्याचार वाढले आणि अधोगती सुरू झाली.
जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी जागतिक लोकसंख्यादिन साजरा करण्यात येतो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. केवळ  ११ जुलैला लोकसंख्यावर चिंता आणि चिंतन करून चालणार नाही.  लोकसंख्यामुळे निर्माण झालेल्या समस्या पदोपदी आणि क्षणोक्षणी प्रत्येकाला भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे दररोज त्याविषयी विचारमंथन, जनजागृतीपेक्षा प्रत्यक्ष कृतीची  गरज निर्माण झाली आहे.

श्वास तुटत चालला 

लोकसंख्यावाढीने  केवळ खाण्यापिण्याच्याच समस्या निर्माण झाल्या नाहीत, तर जमिनीतील पाणी संपतेय, प्रदूषण इतके वाढले की हवेतील प्राणवायू संपतोय, दुष्काळ पडतोय, महापूर येतोय, सूर्याचं  तापमान  वाढतेय, हे सर्व एका दिवशी झालेले नाही, तर मागील अनेक वर्षापासून तीळतीळ  सुरू  आहे आणि त्यातूनच मानवाचा श्वास तुटत चालला आहे.  परिणामी मोठ्या समस्या निर्माण झाल्याने विकासकामे जागच्या जागी थांबली. लोकांना मूलभूत सुविधाही मिळेनाशा झाल्या.  मुलगाच हवा म्हणून तीन-चार अपत्यांना जन्म  दिला जातो. अशिक्षित असो शिक्षित लोकसंख्यावाढीच्या परिणामाची चिंता कुणातही दिसून येत नाही. यावाढीमुळेच  समाजात विसंगत आर्थिक स्थिती  निर्माण झाली. आजच्या घडीला एकीकडे एका घरात सरासरी चार-चार दुचाकी गाड्या आणि एक चारचाकी वाहन, प्रशस्त  महागडे घर आणि आधुनिक सुविधा दिसून येत आहे, तर दुसरीकडे बेरोजगारी, गरिबी, एक वेळच्या भुकेसाठीही अन्न मिळत नाही, भीक मागण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे, हे विरोधी  चित्र अनुभवास येते. ही स्थिती बदलण्यासाठी  लोकसंख्या  नियंत्रणाचा  उपाय होता़ मात्र, ती वेळही  कधीचीच निसटून गेली आहे. आता ओढूनताणून केलेल्या  उपायांचा परिणाम तत्काळ  दिसून  येणार नाही. त्यासाठी पुढील १०० वर्षे वाट पाहावी  लागेल, असे तज्ज्ञ सांगतात़ ते सर्व पाहायला आम्ही असू की नाही, शंका आहे. तितकीच शंका या जगाच्या अस्तित्वाबाबतची आहे.         
                                               
© संजय इस्तारी मुंदलकर                                                                    

Tuesday, 18 February 2020

बेटी बचाओ, राजनिती पढाओ  

यंदाच्या १७ व्या लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्टÑात शिवसेना-भाजपने घवघवीत यश मिळवले.  यात भाजपचे  २४, शिवसेनेचे १८, राष्टÑवादीचे  चार, तर काँग्रेस आणि एमआयएमचा  प्रत्येकी एक खासदार  निवडून आला आहे. यापैकी आठ महिला खासदार संसदेत महाराष्टÑ राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यात भाजपकडून सर्वांधिक पाच, शिवसेना, राकाँ, अपक्ष  यांचे प्रत्येकी एकेक मिळून एकूण आठ महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यातील ४८ मतदारसंघातून                        एकू ण ८६७ उमेदवारांपैकी ८० महिला उमेदवारांना विविध पक्षांनी निवडणूक  रिंगणात उतरवले. यापैकी आठ महिलांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे निवडून आलेल्या महिला खासदार राजकीय कुटुंबातीलच आहेत. यात मुलगी, सून, अशी नाते जपणाºया आहेत. सुप्रिया सुळे राष्टÑवादी काँग्रेसकडून बारामती मतदारसंघातून निवडून आल्या.  भावना गवळी (शिवसेना-यवतमाळ-वाशिम), नवनीत राणा (अपक्ष-अमरावती), प्रीतम मुंडे (भाजपा-बीड), रक्षा खडसे (भाजप-रावेर), हीना गावीत (भाजप-नंदुरबार), पूनम महाजन (भाजप-उत्तर मध्य मुंबई), भारती पवार (भाजप-दिंडोरी) या सर्व लोकसभेसाठी मतदारांनी आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे.
बारामती मतदारसंघातून राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवार  सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांच्यावर मात केली.  सुळे यांनी आपल्या विजयाची हँट्ट्रिक केली आहे. कारण त्या  तिसºयांदा संसदेवर निवडून गेल्या आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला. मागील  निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचेच शिवाजीराव मोघेंचा पराभव केला होता.
रावेर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार व  माजी  महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांनी काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना पराभूत केले. हा त्यांचा दुसरा विजय आहे. मागील निवडणुकीत त्या सर्वात तरुण खासदार ठरल्या होत्या.(यंदा मात्र त्यांचा हा मान अन्य ओडिशातील महिला उमेदवाराकडे गेला आहे.) २०१४ लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्टÑवादीचे मनीष जैन यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव केला होता.
बीड मतदारसंघात डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी राष्टÑवादी काँग्रेस उमेदवार बजरंग सोनावणे यांचा पराभव केला. २०१४ साली बीडमधून गोपीनाथ मुंडे यांनी सुरेश धस यांना पराभूत केले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची कन्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आणि  त्या विजयी ठरल्या. आता पुन्हा एकदा संसदेत महाराष्टÑाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमधील भाजप उमेदवार डॉ. हीना विजयकुमार गावीत यांनी काँग्रेस उमेदवार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्यावर मात केली. यंदा त्यांची दुसरी टर्म आहे. २०१४ च्या निवडणुकीत हीना गावीत यांनी माजी खासदार माणिकराव गावीत यांचा पराभव केला होता. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा मतांनी पराभव केला. मागील निवडणुकीतही पूनम -प्रिया असाच सामना रंगला होता.
अमरावतीत अपक्ष उमेदवार नवनीत रवी राणा यां                                                     नी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ  यांचा पराभव केला. मागील निवडणुकीत आनंदराव आडसूळ यांनी राष्टÑवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांना  पराभूत केले होते. पराभवाची परतफे ड करीत नवनीत लोकसभेवर निवडून आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी राकाँ उमेदवार धनराज महाले यांचा पराभव केला.
देशपातळीवर पाहिले तर १७  व्या लोकसभा निवडणुकीतील ५४२ वजयी उमेदवारांत महिला सदस्यांची संख्या केवळ ७८ इतकी आहे. विशेष म्हणजे महिला खासदारांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या असून त्यांची टक्केवारी ही १७ इतकी आहे. यापूर्वी महिला सदस्यांची सर्वाधिक संख्या ही नवव्या लोकसभेत २८ इतकी होती. राष्टÑीय निवडणूक आयोगाद्वारा लोकसभेच्या  ५४२ जागांबाबत केलेल्या निकालानुसार, यंदा निवडून आलेल्या सर्वाधिक ४० महिला उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर  निवडून आल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडून  संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाच उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून विजय मिळाला आहे.याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष  राहुल  गांधी यांचा पराभव करत  विजय मिळवला  आहे. मनेका गांधी सुल्तानपूर आणि अपना दलच्या उमेदवार अनुप्रिया पटेल  यांनी मिर्झापूर येथून निवडणूक जिकंली आहे. भाजप उमेदवार हेमा मालिनी मथुरा , प्रज्ञा ठाकूर भोपाळ, मीनाक्षी लेखी  नवी दिली, किरण खेर चंडीगड आणि रिता बहुगुणा जोशी यांनी अलाहाबाद  येथून विजय मिळवला.
पश्चिम बंगालमधील आसनसोल येथून  तृणमूल काँग्रेस उमेदवार मुनमुन सेन, सलचर येथील सुष्मिता देव, सुपोल येथून रंजीत रंजन कन्नोज येथून समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव, रामपूर येथून भाजप उमेदवार जयाप्रदा यांचा मात्र पराभव झाला.
यात उल्लेखनीय असे की यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभरातून एकूण ८ हजार ४९ उमेदवार मैदान  उतरले होते. आणि यापैकी केवळ ७२४ महिला उमेदवार होत्या, जे प्रमाण कमीच आहे. काँगे्रसने सर्वाधिक ५४  आणि भाजपने ५३ महिला उमेदवारांना निवडणूक मैदानात उतरवले होते. अन्य राष्टÑीय पक्षात बसपाने २४, तृणमूल कांग्रेसने २३, माकपाने १०, भाकपाने चार आणि राष्टÑवादी काँग्रेस पार्टीने  एक महिला उमेदवाराला तिकीट दिली.अपक्ष महिला उमेदवारांचा संख्या २२२  इतकी होती, तर चार ट्रान्सजेंडर उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली.

राजकीय पक्ष अपयशी

यंदा राज्यातील राजकारणाला दोनदा उभारी मिळाली. मे महिन्यात लोकसभा तर आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. यंदा या निवडणुकीतून तरुणवर्गाला संधी मिळाली आणि ते निवडूनही आले. महिला उमेदवांराबद्दल बोलायचे झाल्यास यंदा विविध राजकीय पक्षांनी एकूण २३५ महिलांना आमदारकीची उमेदवारी दिली. एकूण ३,२३७ उमेदवारांपैकी हे प्रमाण ७.२५ टक्के आहे. यापैकी २४ महिला (८.३३ टक्के)उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीत जिंकल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण वाढले आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत २० महिलांना यश मिळाले होते़़ तसेच, टक्केवारी ७़३ इतकी होती.
याशिवाय २५ अपक्ष उमेदवारांनी आपले नशिब अजमावून पाहिले़ हीच संख्या मागील निवडणुकीत ३३ इतकी होती़ विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांनीही आपल्या पक्षासोबत बंडखोरी केल्याचे दिसून आले. प्रणिती शिंदे काँग्रेस(सोलापूर), यामिनी जाधव शिवसेना (भायकुळा), सुमन आबा पाटील राष्ट्रवादी (तासगांव), मंदा म्हात्रे भाजप, (बेलापूर), माधुरी मिसाळ भाजप (पर्वती पुणे), मुक्ता  टिळक भाजप (पुणे), मंजुळा  गावित काँंग्रेस (साक्री), भारती लावेकर भाजप(वर्साेवा), सीमा हिरे भाजप(नाशिक), विद्या ठाकूर भाजप (गोरेगांव), देवयानी फरांदे भाजप (नाशिक), मोनिका राजळे भाजप (शेवगांव), लता सोनवणे शिवसेना(चोपडा जळगांव), वर्षा गायकवाड काँग्रेस (धारावी मुंबई), नमिता मुंदडा भाजप (केज   बीड), अदिती तटकरे राष्ट्रवादी(श्रीवर्धन), श्वेता महाले भाजप (चिखली बुलडाणा), यशोमती ठाकूर काँग्रेस (तिवसा), प्रतिभा धानोरकर काँगे्रस (वरोरा), मेघना बोर्डीकर भाजप(जिंतूर), गीता जैन काँग्रेस(मीरा भायंदर), सरोज अहिरे राष्ट्रवादी(देवळाली नाशिक), सुलभा खोडके काँग्रेस (अमरावती), मनीषा चौधरी भाजप (दहिसर)आदींचा समावेश आहे.

नातेसंबंधांना प्राधान्य

भारतीय लोकसंख्याच्या तुलनेचा विचार केला असता राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना महिलांचा विचारच केला  नाही, जी  काही  उमेदवारी दिली आहे, ती केवळ नाईलाजास्तव दिल्याचे दिसून येते. कारण तेच ते चेहरे पुढे आणले आहे. यात नातेसंबंधांना प्राधान्य दिले आहे. यावरून  नवीन, सक्षम उमेदवारांचा शोध घेण्यात राजकीय पक्ष अपयशी ठरले  असे म्हणता येईल. राष्ट्रीयच काय पण प्रादेशिक पक्षानेही आपल्या किती जागा निवडून येवू शकतात, याचाच विचार केल्याचे दिसून येते.
एकीकडे महिला सक्षमीकरणाचा घोशा लावायचा आणि दुसरीकडे प्रत्यक्ष वेळ आल्यास त्यांच्याकडे दुर्लक्षित करायचे, हा प्रकार अनेक वर्षांपासून सदोदित चालू आहे. भारतीय लोकसंख्या ही आता तरुणांची आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात आता शिक्षित, दूरदृष्टीच्या तरुणांचा भरणा अधिक असावा, असे सूचवावे वाटते.
भारतीय राजकारणाने आता भारतीय महिलांना अन्य क्षेत्रासोबतच  राजकीय क्षेत्र  पूर्णपणे उघडे करून द्यावे. महिलांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष यासारख्या पदांचा हव्यास धरावा. दिवंगत इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी लोकसभा अध्यक्ष  सुमित्रा महाजन, देशाच्या दुसºया संरक्षण मंत्री तसेच विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी हेच दाखवून दिले आहे. मात्र, त्यासाठी महिलांना प्रत्यक्ष निवडणुकीपासून दूर ठेवता कामा नये.

© संजय इस्तारी मुंदलकर            

Tuesday, 4 February 2020

माझं हास्य कुणाच्याही दु:खाचं कारण ठरू नये


चार्ली चॅपलिनच्या अभिनयाने खळाळून हसला नाही, असा व्यक्ती जगात क्वचितच आढळेल. चार्ली चॅपलिनबद्दल बोलताना  कोणाच्याही डोक्यात एक विनोदी पात्र उभे राहते; पण अनेकांना हसवणाºया या  चेहºयामागचे दु:ख कोणाला फारसे माहित नसेल.  चार्ली चॅपलिन एकदा म्हणाले होते की, माझं दु:ख एखाद्याच्या हसण्याचं कारण असू शकतं; पण माझं  हास्य कुणाच्याही दु:खाचं कारण ठरू नये. त्यांच्याबाबत काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.
चार्ली यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी लंडनमध्ये झाला होता. त्यांचे पूूर्ण नाव चार्ल स्पेन्सर चॅपलिन असे होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची होती. पोट भरण्यासाठी त्यांना वयाच्या  नवव्या  वर्षीच  नोकरी करावी लागली. बालपणीच त्यांचे आईवडील अलग झाले. यानंतर त्यांच्या आईची मानसिक स्थिती बिघडली. परिणामी वयाच्या १३ वर्षी चार्ली यांचे शिक्षणही सुटले.
चार्ली यांनी लहान वयातच नाटक आणि विनोदी कलाकार म्हणून काम करण्यास  सुरुवात केली होती. अवघ्या १९ व्या  वर्षी एका अमेरिकन कंपनीने त्यांच्याशी  करार  केला  आणि ते अमेरिकेला रवाना झाले. चार्ली चॅपलिन यांनी अभिनयाची सुरुवात अमेरिकेत केली. १९३० त्या सुमारास त्यांना आठवड्याला १५० डॉलर्स मिळत होते. यावर्षी त्यांनी तब्बल १३ चित्रपट निर्मात्यांशी करार केला होता. १९१८ सालापर्यंत ते जगातील लोकप्रिय चेहरा बनले होते.
१९१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मेकिंग अ लिव्हिंग’ हा मूकपट त्यांचा पहिला चित्रपट होता. १९२१ मध्ये आलेली ‘द किड’ ही त्यांची पहिली फीचर फिल्म ठरली.  चार्ली यांनी  अ वूमन आॅफ पॅरिस, द गोल्ड रश, द सर्कस, सिटी लाईट्स, मॉर्डन टाईम्स यासारख्या प्रसिद्ध आणि यशस्वी  चित्रपटांमध्ये काम केले. हे चित्रपट आजही पसंत केले जातात. चार्ली  यांनी आपल्या आयुष्यात दोन महायुद्ध पाहिली. ज्यावेळी  जग  युद्धाची झळ सोसत होत, त्यावेळी चार्ली लोकांना हसवत होते.

आयुष्यही वादात

खासगी आयुष्यासोबतच चार्ली  यांचे व्यावसायिक आयुष्यही चर्चेत आणि वादग्रस्त होते.  १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या  ‘द ग्रेट डिक्टेटर’ चित्रपटाने फारच वाद झाला होता. यात  चार्ली  यांनी जर्मनीचा चॅन्सलर हुकुमशाह अ‍ॅडॉल्फ हिटलरची व्यक्तिरेखा साकारली होती. यानंतर अमेरिकेत त्यांच्यावर कम्युनिस्ट असल्याचा आरोपही झाला. इतकेच नाही तर एफबीआयकडून त्यांची चौकशीही झाली. यानंतर चार्ली यांनी अमेरिकेला कायमचा रामराम केला आणि स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाले.
चार्ली चॅपलिन यांनी त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात फारच उलथापालथ पाहिली. त्यांनी एकूण चार लग्न केली होती.  या लग्नातून त्यांना ११ अपत्ये झाली. त्यांनी पहिले लग्न १९१८ मध्ये मिल्ड्रेड हॅरिससोबत केले; पण हे लग्न दोन वर्षेच टिकले. यानंतर त्यांनी लिटा ग्रे, पॉलेट गॉडर्ड आणि  १९४३  मध्ये १८ वर्षांच्या उना ओनिलसोबत संसार थाटला. त्यावेळी चार्ली ५४ वर्षांचे होते. चार्ली चॅपलिन यांची चारही लग्न फारच वादात राहिली होती.

महात्मा गांधींचे चाहते

प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन आणि ब्रिटनची महाराणी यांसारखे दिग्गज चार्ली चॅपलिन यांचे चाहते होते. तर स्वत: चार्ली  भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महात्मा गांधी यांच्या कार्यावर अतिशय प्रभावित होते. ते महात्मा गांधी यांचा नितांत आदर करत होते. मात्र, असे सांगण्यात येते की, गांधीजींना चार्ली यांना कधी भेटायचेच नव्हते. नंतर त्यांना कळले की चित्रपटात अभिनय करणारे चार्ली यांना गरिबांबद्दल कळवळा आहे़ यानंतर त्यांनी चार्लीची भेट घेतली. यावेळी दोघांत खादीविषयी मोठी चर्चा रंगली होती, असेही सांगितले जाते. बॉलिवूड कलाकारही चार्ली यांचे चाहते होते. राज कपूर यांनी आपल्या चित्रपटांत चार्ली चॅपलिन यांची नक्कल केली होती.

अभिनयाला अमेरिका घाबरली

एखाद्या विनोदी (कॉमेडियन) अभिनेत्यापासून कुण्या देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो का, असा प्रश्न विचारला तर कुणीही बुचकळ्यात पडेल. एखाद्या कलाकाराच्या अभिनयापासून कुण्या देशाला काय धोका निर्माण होणार; परंतु असे घडलेले आहे आणि ते अमेरिकासोबत...चक्क एका महा
शक्तीबरोबर!
साधारण: १९५०-६० च्या दशकात संपूर्ण जग दोन भागात विभागल्या गेले होते. एका बाजूूला अमेरिकाचे नेतृत्व, तर दुसºया बाजूला साम्यवादाचे समर्थक होते़ अर्थातच या गटाचे नेतृत्च रशियाकडे होते. त्याच काळात हॉलीवूडमध्ये चार्ली चॅपलिन सुपरस्टार होते. मात्र अमेरिकाची गुप्तचर संस्था एफबीआयला  चार्ली हे साम्यवादी विचारधारापासून प्रभावित असल्याचा संशय होता. तसेच, ते आपल्या अभिनयाच्या माध्यमातून लोकांना साम्यवादी विचारांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे एफबीआयचे म्हणणे होते. विशेष म्हणजे चार्ली यांच्या खासगी आयुष्यातील घटनांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला होता. सन २०१५ मध्ये ब्रिटनची गुप्तहेर संस्था एमआई-5ची काही गुप्त दस्तावेज सार्वजनिक करण्यात आला. त्यातून ही बाब उघड झाली होती. त्यावेळी चार्ली सर्वाधिक काळ लंडनमध्ये व्यतित करत होते. त्यामुळे एमआई-5 वर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, यातून काहीही सिद्ध झाले नाही. १९५३ मध्ये चार्ली चॅपलिन अमेरिकाबाहेर गेले असता त्यांना पुन्हा अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला. यानंतर ते  स्विर्त्झलँडमध्ये राहावयास गेले
२५ डिसेंबर १९७७  रोजी म्हणजे नाताळच्या दिवशीच वयाच्या ८८ व्या वर्षी चार्ली चॅपलिन यांचे निधन झाले; परंतु मृत्यूच्या दोन महिन्यानंतर काही लोकांनी त्यांचा मृतदेह चोरला होता. त्याचे कॉफिनच चोरल्याचे चौकशीतून समोर आले. चार्ली यांच्या कुटुंबियांकडून खंडणी मागण्याच्या उद्देशाने मृतदेहाची चोरी करण्यात आली होती. चोरांनी ६ लाख स्विस फ्रँक्सची मागणी केली होती; परंतु त्यांच्या पत्नीने ही रक्कम देण्यास नकार दिला होता. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यानंतर चोरीपासून वाचवण्यासाठी त्यांचा मृतदेह सहा फूट कॉंक्रिटच्या खाली दफन करण्यात आला.

© संजय इस्तारी मुंदलकर

Monday, 3 February 2020

कथेवरून उंची गाठलेला ‘शराबी’



अनेकदा चित्रपटात दारू पिणाºयाचे दृश्य असतात़ काहीजण दारूड्याच्या भूमिकेतही असतात; परंतु तो कथेचा भाग असतो़ मुख्य कथानकापासून (screen play) तो बराच लांब असतो़ काहीवेळा उपकथानक म्हणूनही तसे काही दृश्य चित्रित केले जातात. चित्रपटाच्या एकूण यशात त्याचे स्थान दुय्यमच ठेवले जाते; पण अख्खा चित्रपट दारूड्याच्या भूमिकेवर आधारित असेल तर....? असा चित्रपट बॉक्स आॅफिसवर (box office)  गटांगळ्या खाल्ल्याशिवाय राहणार नाही. प्रकाश मेहरा दिग्दर्शित शराबी चित्रपटाने मात्र मोठे यश मिळवले़ अगदी साध्या सोप्या कथेच्या सक्षम कथानकावर शराबी हिट ठरला.
भारतीय चित्रपटक्षेत्रातील महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट चित्रपट ‘शराबी’ला मागील वर्षात तब्बल ३५ वर्षे पूर्ण झालेत. अमिताभ यांच्यासह  जयाप्रदा, प्राण, दीपक पाराशर, ओम प्रकाश, सत्येन कपूर आदींची भूमिका असलेला हा चित्रपट १८ मे १९८४  रोजी पडद्यावर आला आणि हिट ठरला.(hit on screen)
अगदी साध्या कथेवरून उंचीचा कळस गाठलेला चित्रपट म्हणजे ‘शराबी’ होय असे म्हणता येईल. मुलाच्या दारू पिण्यावरून पित्याशी होत असलेले वाद, गैरसमज असे या चित्रपटात दिसून येते. अन्य चित्रपटासारखे याठिकाणी बाप हा दारूडा  नाही, तर मुलगा दारूच्या आहारी गेला आहे. त्यावरून बाप (प्राण) आणि मुलगा (अमिताभ) यांच्या वादाला सुंदर चित्रीत करण्यात आले आहे. सोबत आहे जयाप्रदासोबतचा प्रेमालाप तसेच मर्मभेदक संवाद आणि गाणी.
दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी कथेला दारूड्याचा चित्रपट असे काही होऊ दिले नाही, हेच त्यांचे मोठे यश आहे. या चित्रपटाचा बिग-बी यांच्या कारकिदीर्तील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये समावेश होतो.‘शराबी’ एक किस्सा सांगण्यात येतो की शूटिंगदरम्यान अमिताभ यांच्या हाताला अपघात झाला आणि त्यांना पूर्ण शूटिंग करताना त्यांना हात खिशात ठेवून काम करावे लागले. शराबी पाहताना ही बाब स्पष्ट जाणवते. अमिताभ आपला डाव खिशात ठेवून असल्याचे दिसून येते. ती घटना अशी की दिवाळीच्या सणादरम्यान ‘शराबी’चे शूटिंग अर्थात छायाचित्रण सुरू होते. एक जळता फटाका अमिताभ यांच्या हातावर पडला आणि त्यामुळे हात भाजला.  चित्रीकरणाच्या तारखा ठरल्यामुळे शूटिंग रद्द करणे शक्य नव्हते. म्हणून उशीर न लावता  काम  सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जळालेल्या हातासोबतच शूटिंग पूर्ण केली. बिग-बी यांना चित्रपटात आपला डावा हात खिशात ठेवावा लागला; पण त्याकाळी लोकांमध्ये ही फॅशन झाली होती. याशिवाय ‘इनक्लाब’ मध्येही त्यांना आपला डावा हात खिशात ठेवावा लागला होता. याबाबत अमिताभ सांगतात, की त्यावेळी हातावरील घाव भरलेले नव्हते. त्यामुळे हा डावा हात खिशात ठेवावा लागत होता. अनेकांना ती फॅशन असल्याचा समज झाला होता. विशेष म्हणजे लोकांनी तिचे अनुकरणही केले होते.

३५ हजार फुट उंचीवर कल्पना

अमिताभ यांनी एका आठवणीत सांगितले होते, शराबीची कल्पना १९८३ मध्ये सूचली होती. त्यासाठी त्यांचा पहिलाच जागतिक दौरा सुरू होता. त्यावेळी बिग-बी आणि त्यांच्या टीमने अमेरिका, इंग्लंडमधील १० शहरांत कार्यक्रम सादर केले होते. न्यू यॉर्कहून त्रिनिदाद, टोबागो प्रवासादरम्यान प्रकाश मेहरा यांनी वडील-मुलगा यांच्या नात्यावर चित्रपटाची कल्पना त्यांच्यासमोर ठेवली, ज्यामध्ये मुलगा एका मद्यपीच्या भूमिकेत असेल. बिग बी म्हणाले की, अटलांटिक महासागरावर हवेत सुमारे ३५ हजार फुटांच्या उंचीवर कल्पना सूचली होती.
संवाद लहान ठेवण्याचा सल्ला
आपल्या वैयक्तिक आयुष्यात दारूला कधीच हात न लावणारे अमिताभ यांना चित्रपटात एका दारू पिणाºया मुलाचा ‘परफेक्ट’ असा अभिनय करायचा होता. त्यामुळे त्यांनी प्रकाश मेहरा यांना संवाद लहान लिहिण्याचा सल्ला दिला. कारण नशेत डायलॉग बोलण्यास वेळ लागतो. बिग बी नुसार, पहिल्या दिवशीच्या  शूटनंतर मी सर्व गोष्टींचे निरीक्षण करून प्रकाशजींना सांगितले की, चित्रपटात मला जास्त वेळ नशेत राहायचे आहे आणि डायलॉग लांब असतील तर बोलायला वेळ लागेल. कदाचित चित्रपट पाच तासांचाही होईल. त्यानंतर काही सीन लहान करण्यात आले. असे सांगण्यात येते की काहीजण बारमध्ये अमिताभ यांचे घड्याळ, सोन्याची साखळीची चोरी करतात, ते दृश्य खुद्द बिग बी यांनी कोरियोग्राफ केले होते.

गाणीही लोकप्रिय (best songs) ‘शराबी’च्या यशात जितका वाटा कथा, पटकथा, संवादा आदींचा होता, तितकाच वाटा गाण्यांचाही होता. संगीतकार बप्पी लाहिरी यांनी सर्व गीतांचा उत्कृष्ट बाज चढवलेला.  दे दे प्यार दे...,  जहाँ मिल जाए चार यार..., इंतेहा हो गयी..., मुझे नौलखा मंगा दे...असो
की, मंझिले अपनी जगह , या सर्वांना  बप्पीदांनी न्याय दिला. अंजान आणि दिग्दर्शक प्रकाश मेहरांनीही लिहिलेली ही सर्व  गाणी  हिट ठरली. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील ही गाणी आजही सर्वांना ऐकावीशी वाटते. प्राण यांच्याशी कौटुंबिक वाद असो, ओम प्रकाश यांच्यासोबत मन मोकळे करणारे क्षण असो वा पे्रयसी जयप्रदासोबत प्रीतीचा प्रसंग असो अमिताभ यांनी सकस अभिनय केल्याचे दिसून येते. शराबीतील ‘मुछें हो तो नत्थुलाल जैसी, वरना ना हो, हा संवाद खूप लोकप्रिय झाला होता. 

© संजय इस्तारी मुंदलकर

Sunday, 2 February 2020

ब्रिटनची ए (ब्रे) क्झिट...

सन २०१६ पासून सुरू झालेल्या ताणतणावानंतर ब्रिटनने ३१ जानेवारी २०२० रोजी युरोपीय महासंघातून बाहेर पडल्याचा आपला निर्धार पूर्ण केला. यावर पंतप्रधान बोरीस यांनी आपल्या देशात नवी पहाट उगवली ाहे. बदलांच्या क्षणात नव्या कर्तृत्वासाठी व्यासपीठ सज्ज झाले असून देशाला एकत्र करत पुढे नेणे हे माझे पंतप्रधान म्हणून कर्तव्य असल्याचे म्हटले आहे़ तसेच, एक नवी सुरुवात असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. जॉन्सन यांनीच ब्रेक्झिटसाठी आक्रमक भूमिका घेतली होती आणि काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही जनतेने त्यांच्या बाजूने कौल दिला होता. ब्रेक्झिटच्या मागणीला जून २०१६ मध्ये सर्वांत आधी संडरलँड नावाच्या शहराने सहमती दर्शवली होती. दुसरीकडे ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर युरोपसाठी नवी पहाट उगवेल, असा विश्वास युरोपीय महासंघाच्या युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल, युरोपीय आयोगाच्या प्रमुख उरसुला वॉन डेर लेयेन आणि युरोपीय संसदेचे प्रमुख डेव्हिड सासोली यांनी संयुक्तपत्राद्वारे व्यक्त केला. तसेच, युरोपीय महासंघाचे सदस्य असताना मिळणारे फायदे आता ब्रिटनला मिळणार नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अतिशय महत्त्वाचे म्हणजे लंडनमधील पार्लमेंट स्क्वेअरमध्ये जल्लोष करण्यात येत आहे. लंडन शहरातील मॉलवर युनियन जॅक फडकवण्यात आला. सर्व सरकारी इमारतींवर लाल, पांढºया आणि निळ्या रंगात रोषणाई करण्यात आली आणि या क्षणाची आठवण म्हणून ५० पेन्सच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे. त्याच वेळी हा प्रश्नही मनात निर्माण होतो की, असे काय झाले की साधारण: ५० वर्षांचे राजकीय, आर्थिक संबंध तोडल्याने ब्रिटनवासी आनंद व्यक्त करत आहे. त्यासाठी काही वर्षे भूतकाळात जावे लागणार आहे.
ब्रेक्झिट नेमके काय...
ब्रेक्झिट शब्द ब्रिटन आणि ब्रेक्झिट या दोन शब्दांतून निर्माण झाला आहे. म्हणजेच युरोपीयन महासंघापासून बाहेर पडण्याबाबतच्या करारातून नवा शब्द बाहेर आला आहे. सन २०१६ मध्ये युरोपीयन महासंघातून बाहेर पडण्यावर ५२ टक्के-४ ८ टक्के असे मतदान झाले होते. या महासंघात काही युरोपीयन देशांचा समावेश असून त्यांच्यात मुख्यत्वे राजकीय आणि आर्थिक संबंध आहेत. दुसºया महायुद्धानंतर ‘ईयू’ अस्तित्वात आला होता. दोन देशांत आर्थिक संबंध असल्यास त्यांच्या युद्धाची शक्यता नसते. याच संकल्पनेवरच महासंघाने आकार घेतला होता, असे मानले जाते. काळाच्या ओघात महासंघाने मोठे रुप धारण केले असून, त्यांचे आता स्वत:चे चलन (युरो) सुद्धा आहे. यातील सदस्य देश त्याचा वापर करतात. याशिवाय सदस्य देशांतील नागरिकांना अन्य सदस्य देशांमध्ये प्रवास करण्यात कोणत्याही अडचणी येत नाहीत. सर्वकाही व्यवस्थित असताना ब्रिटनने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रक्रियेत आतापर्यंत दोन पंतप्रधानांना आपले पद सोडावे लागले आहे. सर्वांत प्रथम २३ जून २०१३ रोजी तत्कालिन पंतप्रधान डेव्हिड कामरन यांनी पहिल्यांदाच ईयूमधील आपल्या देशाच्या भूमिकेवरील भविष्याबाबत मत व्यक्त केले आणि तेथूनच ब्रेक्झिटला ‘हवा’ मिळाली. अर्थातच यात त्यांची दूरदृष्टी होती. असे असले तरी ब्रेक्झिटच्या ते विरोधातच होते. ही बाब त्यांच्या राजीनाम्यानंतरच दिसून आली.
दुसरे असे की पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी देशावर पडत असलेल्या आर्थिक ओझ्यावर लक्ष केंद्रित केले होते. कारण सन २०१४ मध्ये देशात येणारे विदेशी नागरिकांची संख्या ही देशातील तिसरी मोठी समस्या म्हणून अधोरेखित झाली होती.
दुसरे असे की ब्रिटनमध्ये १९९४ मध्ये जितकी संख्या होती, ती सन २०१४ मध्ये दुप्पट झाली. युरोपीयन महासंघातील सदस्य देशांतील मोठ्या संख्येतील नागरिक रोजगार आणि चांगल्या जीवनशैलीसाठी ब्रिटनच्या दिशेने धाव घेत आहे आणि त्यातून सरकारसमोर रोजगार पुरवण्याची आणि लोकसंख्या या दोन मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत, असे एका सर्वेक्षणातून दिसून आले होते़ यानंतर ब्रेक्झिटचा विचार समोर आला होता. २३ जून २०१६ रोजी घेतलेल्या मतदानात ब्रेक्झिटच्या पाठिंब्यात ५१.९ टक्के मते पडली होती, तर विरोधात ४८.१ टक्के मते आली होती. यात फारसा फरक नसला तरी ब्रिटनने महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता़ यात देशातील ३० दशलक्ष नागरिकांनी भाग घेतला होता. मात्र, त्याचवेळी युनाएटेड किंगडमचा भाग असलेल्या स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडने ईयूमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. ब्रिटनमधील सार्वमतामध्ये ५२ टक्के नागरिकांनी ब्रेक्झिटसाठी कौल दिल्याने कॅमेरून यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. नव्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी २९ मार्च २०१७ रोजी देशाचे प्रमुखपद स्वीकारले. युरोपीय महासंघाला पत्र लिहून दोन वर्षांचे वेळापत्रक निश्चित करण्याचे आवाहन केले. तसेच, ब्रेक्झिटचा फायदा घेण्यासाठी जून २०१७ मध्ये मुदतपूर्व निवडणूक घेतली. मात्र, त्यांच्या हुजूर पक्षाने बहुमत गमावले. मार्च २०१९ मध्ये संसदेने थेरेसा मे यांचा ब्रेक्झिटचा आराखडा फेटाळल्याने त्यांनी जून महिन्यात राजीनामा दिला. त्यानंतर जुलैमध्ये हुजूर पक्षाच्या नेतेपदी बोरिस जॉन्सन यांची निवड करण्यात आली. १२ डिसेंबर २०१९ रोजी मध्यावधी निवडणुकीत पंतप्रधान जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला ऐतिहासिक यश मिळाले. पंतप्रधानांनी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला अधिक गती दिली. नव्या वर्षात म्हणजेच २३ जानेवारी २०२० रोजी ब्रिटनच्या संसदेमध्ये कायदा मंजूर झाला आणि २९ जानेवारी २०२० रोजी युरोपीय संसदेने ब्रेक्झिटला मान्यता दिली़ यानंतर महाराणी ऐलिझाबेथ (द्वितीय) नेही त्यास मान्यता दिली. शेवटी ३१ जानेवारीला ब्रिटन देश अधिकृतरित्या युरोपीय महासंघाबाहेर पडल्याचे घोषित झाले. अशाप्रकारे तब्बत ५० वर्षांचे नाते संपुष्टात आले.
*****
x

Friday, 31 January 2020

उत्कंठापूर्ण श्रवणीय गाण्यांचा 
दाता : पंचमदा


भारतीय गाण्यांमध्ये पाश्चिमात्य चालींचा वापर करण्याचे श्रेय राहुल देव बर्मन उपाख्य आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांना दिले जाते. मात्र, त्यांनी आपल्या संगीतामध्ये भारतीय लोक संगीतालाही  उत्तमप्रकारे सामावून घेतले आहे. यात त्यांनी बिहारमधील लोकसंगीताचा वापर त्यांनी केला आहे. 
------------------------------------------------------------------------------------------------------------
पंचमदा अर्थात आर. डी. बर्मन  किंवा राहुल बर्मन अशा नावांनी भारतीय संगीतक्षेत्रात ओळखले जाणारे महान संगीतकार. त्यांनी अनेक अविस्मरणीय गाणी आपल्या रसिकांवर उधळून लावली आणि भारतीय रसिकही तितक्याच उत्कंठेने तृप्त झाले.
भारतीय रसिक  हा पूर्वापारच संगीताचा भोक्ता. संगीत कोणत्याही प्रकारातील असो, त्याला गोडव्याने ऐकले, तितक्याच तीव्रतेने प्रतिसाद दिला आणि उंच शिखरावर पोहोचवले. भारतीय संगीत उत्तुंग शिखरावर पोहोचवण्यात जसा रसिकांचा सहभाग आहे, तितकाच तो गीतकारांचा आणि संगीतकारांच्या श्रमाचा, साधनेचा, तल्लीनतेचा परिपाक आहे.
पंचमदांच्या एकूण ३३१ चित्रपटांच्या कारकिर्दीतील अनेक गाण्यांपैकी एक म्हणजे ‘तेरे बना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं... ’(आँधी) हे होय. आर. डी. बर्मन यांचे हे अतिशय रोमँटिक गाणे आहे. संजीव कुमार आणि  सुचित्रा सेन यांच्यावर चित्रित या गीताला ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा स्वर आहे. ‘घर आजा घर आयी बदरिया सावरिया...’(चित्रपट : छोटे नवाब) लता दीदी मंगेशकर यांनी गायिलेले गाणे शैलेंद्र यांनी लिहिले आहे. ‘चुनरी संभाल गोरी...’ (चित्रपट : बहारों के सपने)
भारतीय गाण्यांमध्ये पाश्चिमात्य चालींचा वापर करण्याचे श्रेय पंचमदांना दिले जाते. मात्र, त्यांनी आपल्या संगीतामध्ये भारतीय लोक संगीतालाही  उत्तमप्रकारे सामावून घेतले आहे. यात त्यांनी बिहारमधील लोकसंगीताचा वापर त्यांनी केला आहे. मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेले गाणे मन्ना डे आणि  लता मंगेशकर  यांनी गायिले आहे. ‘पल दो पल का साथ हमारा...’(द बर्निंग ट्रेन) धावत्या रेल्वेगाडीतील ही  कव्वाली  सर्वांचीच आवडती आहे. रोमांचक अशी ही कव्वाली मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायिली आहे.
पंचमदांनी संगीतबद्ध केलेल्या ‘अमरप्रेम’ या चित्रपटातील  ‘रैना बीती जाए...’ हे गाणे लता मंगेशकर यांनी गायिले आहे. वेगवेगळ्या  पद्धतीचे संगीत आपण देऊ शकतो हे पंचमदांनी यातून सिद्ध केले आहे. ‘अ आ इ ई मास्टर जी की आ गई चिट्ठी...’ (किताब) चे गीतकार गुलजार आहेत आणि गायिका आहेत पद्मिनी कोल्हापुरे आणि शिवांगी कोल्हापुरे (श्रद्धा कपूरची आई).  त्यावेळी दोघीही अगदी लहान होत्या. ‘कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना...’(अमरप्रेम) आनंद  बक्षींच्या शब्दांना पंचम यांनी सुंदर संगीत साज दिला . किशोरकुमार यांच्या आवाजामुळे त्याला वेगळी उंची मिळाली आहे. ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है...’ (इजाजत) गुलजार यांच्या  शब्दांना सुंदर चाल लावली आहे. आशा भोसले यांचा आवाज तर लाजवाबच. हरे रामा हरे कृष्णामधील ‘दम मारो दम...’ या गाण्यात पंचमदा यांनी तरुणवर्गाला चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व दिल्याचे दिसून येते. ७० च्या दशकातील खुलेपणा या गाण्यात वापरला आहे. त्या काळात तरुणवर्गामध्ये होत असलेले बदल गाण्यात चित्रित केल्याचे दिसून येते. या गाण्याचे शब्द आनंद बक्षी यांचे आहेत. इजाजतमधील अन्य एक गीत  ‘कतरा कतरा...’ गुलजार यांनीच लिहिले आहे. हे गाणं पंचमदांनी दोन वेगवेगळ्या ट्रॅक्सवर वेगवेगळ्या वेळी रेकॉर्ड केल्याचे सांगण्यात येते. हे दोन्ही ट्रॅक इतक्या बेमालूमरित्या एकमेकांमध्ये मिसळले आहेत, की संपूर्ण गीत एक स्वतंत्र भासते.
पंचमदांनी आपल्या गाण्यात वेगवेगळ्या थिम आणि संगीत वाद्यांचा उपयोग केल्याचे दिसून येते़ त्यांनी शालिमार (१९७८) मधील ‘वन टू चा चा चा...’ आणि हम किसीसे कम नहीमधील ‘तुम क्या जानो...’ या दोन्ही गाण्यात ईलेक्ट्रिक सितार वापरली आहे. घरमधील तेरे बिना जिया जाये ना आणि खुशबूमधील ओ मांझी रे...या गाण्यात तबल्याचा वापर केला आहे. मासूम (१९८३) मधील ‘तुझसे नाराज नही जिंदगी...’मध्ये १२ तारावाल्या सेमी इलेक्ट्रिक गिटारचा वापर केला आहे. अमरप्रेम (१९७१)मधील रैना बिती जाये...आणि चिंगारी कोई भडके...या दोन्ही गाण्यात संतूर आणि गिटार वापरली आहे. मेहबुबा मेहबुबामध्ये बिअरच्या बाटल्यांचा आवाज वापरला आहे. या सर्वांत पंचमदांनी ताल-सूर-लय आदींचा सुंदर संगम साधला आहे. वाद्यांच्या सुरांची सरमिसळ करत नवा अविष्कार करणे यात त्यांचा हातखंडा होता आणि म्हणूनच त्यांची गाणी लोकप्रिय पावली, असे म्हणता येईल.
आर.डीं. ची काही गाणी अशी: मेहबुबा मेहबुबा....़़शोले, यम्मा यम्मा...शान, तेरे बिना जिंदगी से शिकवा नाही......आंधी, प्यार हमें किस मोड पे ले आया....., चुरा लिया है तुमने जो दिल को......,आनेवाला पल.....गोलमाल,भिगी भिगी रातों में.....,दो लफ्जो की है एक कहानी...,हमे तुमसे प्यार कितना.......,चला जाता हूं.....अशी किती तरी गाणी लोकप्रिय ठरली आहेत, रसिकांच्या ओठी गुणगुणत आहेत.

Sunday, 26 January 2020

अख्खं जगच बेरोजगारीच्या वणव्यात


एखादे काम वा नोकरी वा रोजगार करण्याची पात्रता आणि कौशल्य असूनही (जोडीला काम करण्याची इच्छा) ते काम न मिळणे वा उपलब्ध न होणे म्हणजे तो व्यक्ती बेरोजगार समजण्यात यावा अशी ढोबळमानाने बेरोजगारीची व्याख्या करता येईल. मात्र, उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळाली नाही म्हणून आम्हीच बेरोजगार असे मानता कामा नये़ कारण बेरोजगारीचा संबंध हा केवळ शिक्षणाशी जोडू नये, तर संबंधित व्यक्तिची काम करण्याची पात्रता, त्याचे कौशल्य विचारात घ्यावे़, तरच बेरोजगारीच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर कायमचा उपाय शोधता येईल. कारण बेरोजगारी ही प्रत्येक क्षेत्रात आहे़ मग ते शिक्षण क्षेत्र असो, शेती क्षेत्र असो, बांधकाम, लहान मोठे उद्योग, सरकारी-निमसरकारी संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने वा तत्सम. या मोठ्या संकटाने अख्खं जगच बेरोजगारीच्या वणव्यात होरपळत आहे. कारण एकतर नोकरी नाही किंवा असेल तर ती टिकून राहिल की नाही अशी स्थिती तयार झाली आहे. ‘एडलमिन ट्रस्ट बॅरोमीटर’ या अहवालानुसार जगभरातील ८३ टक्के कर्मचाºयांना त्यांच्या नोकरीची किंवा रोजगाराची चिंता असल्याचे म्हटले आहे. यावरूनच काय ते स्पष्ट होईल.

रोजगारक्षमता नाही

धक्कादायक म्हणजे २०२० मध्ये बेरोजगारीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) ‘द वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आऊटलूक (डब्ल्यूईएसओ) : ट्रेंड्स २०२०’ या अहवालात वर्तवला आहे. हा अहवाल २० जानेवारी २०२० रोजी जाहीर करण्यात आला. यंदा जागतिक बेरोजगारीमध्ये २५ लाखांनी (२.५ मिलिअन) भर पडणार असून सुमारे ५० कोटी लोक अल्प मोबदल्यात काम करीत असल्याचे देखील यात नमूद करण्यात आले आहे.
मागील नऊ वर्षांपासून जागतिक बेरोजगारीचे प्रमाण बहुतांश स्थिर आहे. मात्र, जागतिक आर्थिक वाढ मंदावली आहे. याचाच अर्थ जागतिकस्तरावर कामगारांचे प्रमाण वाढत आहे; परंतु रोजगारक्षम तरुणांसाठी पुरेशी नवीन रोजगार निर्मिती होत नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. परिणामी यंदा जागतिक बेरोजगारी सुमारे २५ लाखांनी वाढणार असल्याचे ‘आयएलओ’ने म्हटले आहे. ही संयुक्त राष्ट्रांची संघटना असून आंतरराष्ट्रीय कामगार मानकांची स्थापना करून साजेशा रोजगारास चालना देणे आणि सामाजिक न्याय वाढविणे असे संघटनेचे प्रमुख कार्य आहे. याशिवाय विकसनशील देशांमध्ये सन २०२०-२१ मध्ये बेरोजगारी प्रचंड वाढणार असून २०३० पर्यंत जगभरातून गरिबीचे उच्चाटन करण्याच्या मोहिमेत अडथळे निर्माण होतील, असे म्हटले आहे.
डब्ल्यूईएसओनुसार, जगभरात १८.८ कोटी (१८८ मिलिअन) लोक बेरोजगार असल्याचे मानन्यात आले आहे़ १६.५ कोटी लोकांजवळ वेतन वा मजुरी मिळेल, अशा कामांचा अभाव आहे, तर ४७ लाख (४७० मिलिअन)लोक  रोजगारांच्या समस्यांनी त्रस्त आहेत. धक्कादायक म्हणजे १२ कोटी लोकांनी कंटाळून कामाचा शोध घेणेच बंद केले आहे. शहरातील सुशिक्षित युवावर्गात बेरोजगारीचा दर अधिक आहे़ २० ते २४ वर्षे वयोगटात बेरोजगारीचा दर ३७ टक्के इतका आहे़ वाढती बेरोजगारी आणि खोल अशा आर्थिक समानतेमुळे नोकरी वा रोजगारामुळे एक चांगली जीवनशैली उपभोगास मिळणे फार कठीण झाले आहे. ‘आयएलओ’चे महासंचालक ग्ये रायडर यांनी म्हटले की जगात बहुतांश लोकांना काम मिळवण्यासाठी श्रम बाजारावर अवलंबून राहावे लागत आहे़ (अर्थात याठिकाणी काम मिळेलच ही शाश्वती नसते.) या बाजाराच्या स्थितीवरून चांगले वेतन हाताशी येऊन जीवनमान सुधारण्याची शक्यताच नाही. कामातील समानता आणि नोकरी जाण्याची भीती यामुळे चांगल्या भविष्याची कल्पना केवळ स्वप्नातच राहणार आहे. दरम्यान, आंतराष्ट्रीय कामगार संघटनानुसार प्रतिदिन ३़२० अमेरिकन डॉलर्सपेक्षा (२२८़२८ भारतीय रुपये) कमी उत्पन्न मिळवणारा व्यक्ती हा गरिबी या व्याख्येत बसतो.

भारताचे काय...

आयएलओचा अहवाल नव्या वर्षात आला असला तरी डिसेंबर २०१९ मध्ये भारतातील काही संस्थांनी आपल्या देशाच्या रोजगार क्षेत्रातील स्थितीचा अंदाज व्यक्त केला होता़ इंडियन स्टाफिंग फेडरेशन, ग्लोबल हंट इंडिया, इंडिया प्रॉडक्ट लीडर अँड करिअर यासारख्या खासगी संस्थांनी काही महत्त्वपूर्ण अंदाज व्यक्त केले होते. इंडियन स्टाफिंग फेडरेशनच्या अध्यक्ष रितूपर्णा चक्रवर्ती यांनी रोजगाराच्या दृष्टीने नवीन वर्ष स्थिर असेल. उद्योगात गुंतवणूक वाढल्यास रोजगारांत वाढ होण्याची शक्यता आहे, असे म्हटले होते. ग्लोबल हंट इंडियाचे प्रबंध संचालक सुनील गोयल यांनी जीडीपी दर खाली आल्याने २०२० मधील पहिली तिमाही काही विशेष चमत्कार दाखणार नाही़ मात्र, वर्षाचा उत्तरार्ध रोजगारांच्या दृष्टीने काही संधी उपलब्ध होऊ शकते़ कारण उद्योगांकडून आपल्या कारभारच्या विस्ताराकडे लक्ष वेधल्या जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळे पुढील काही काळ तरी प्रतीक्षा करावी लागणार, हे निश्चित!

© संजय इस्तारी मुंदलकर

Tuesday, 7 January 2020

४० वर्षांपूर्वीचे ५२ जण  आणि अमेरिकेची धग


अमेरिकेने ३ जानेवारी २०२० रोजी इराकमधील बगदाद विमानतळ परिसरात हवाई हल्ला करून इराणच्या कुड्स फौजांचे प्रमुख जनरल कासिम सुलेमानी यांना ठार मारले. यानंतर इराणने आपल्या सर्वाेच्च शक्तिशाली अधिकाºयाच्या मृत्यूचा बदला घेण्याची घोषणा केली होती. तसेच, दुसºयाच दिवशी म्हणजे शनिवारी अन्य देशातील दूतावासावर हल्ला करण्यात आला. यानंतर दोन्ही देशात तणावाची स्थिती निर्माण झाल्याने यूनो, नाटोसह जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आदी देशांच्या प्रमुखांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे तसेच परस्परांसह संपूर्ण जगाची सुरक्षितता कायम राखण्याचे आवाहन केले. कारण त्यांच्यातील तणावामुळे जगभरातील इंधन पुरवठा मागणीवर, शेअर्सबाजारावर मोठा विपरित परिणाम होण्याचे चिन्हे होती. तसेच, ते घडून सुद्धा आलेत. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाची स्थिती आता एक दोन दिवसांत निर्माण झाली नसून त्यासाठी आपल्याला सुमारे ४० वर्षे मागे जावे लागते़. सन १९७९ मध्ये इराणी क्रांती सुरू झाली. यावेळी सुलतान रजा शाह पहलवी यांची सत्तापलट होण्याची चिन्हे दिसत होती. 
वास्तविक १९५३ मध्ये अमेरिकेच्याच मदतीने शाहने इराणची सत्ता मिळवली होती आणि आपल्या देशात अमेरिकन संस्कृती वाढीस पोषक वातावरण उपलब्ध करून दिले; परंतु त्याचवेळी सामान्य लोकांवर अनेक प्रकारचे अत्याचार केले. अशा परिस्थितीत देशातील धार्मिक नेत्यांनी शाहंच्या विरोधात आवाज उठवणे सुरू केले. याच वर्षात इराणचे स्वरुप पूर्णत: बदलले. शाह यांनी आॅक्टोबर १९७९ मध्ये अमेरिकेत आश्रय घेतला आणि नोव्हेंबर १९७९ मध्ये इराणवर इस्लामिक रिपब्लिक कायदा लागू करण्यात आला. धर्मगुरू अयातुल्ला रुहोलिय्याह खोमेनी यांच्या मदतीला अनेक धार्मिक संस्था धावून आल्या. तसेच, अनेक कट्टरपंथी विद्यार्थी संघटना स्थापना झाल्या. याच काळात इराणमध्ये शाह यांच्या माध्यमातून अमेरिकाविरोधात द्वेष निर्माण होऊ लागला. आणि अशातच ४ नोव्हेंबर १९७९ रोजी इराणची राजधानी तेहरानमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला झाला. यात ६३ जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच, आणखी तीन लोकांचे अपहरण केले. अशा एकूण ६६ लोकांना कैदेत टाकण्यात आले. काही दिवसांनंतर यापैकी १४ जणांची सुटका करण्यात आली़. मात्र, उर्वरित ५२ जणांना तेहरानच्या अमेरिकन दूतावासात ४४४ दिवस ओलीस राहावे लागले. (व्हिएन्ना कराराविरुद्ध कारवाई असे वर्णन करीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लष्कराच्या ‘आॅपरेशन ईगल क्लॉ’ द्वारे आपल्या नागरिकांची सुटका करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यात यश आले नाही. या कारवाईत १ इराणी नागरिकासह ८ अमेरिकन सैनिक मारल्या गेले.) यानंतर २० जानेवारी १९८१ रोजी त्यांना मुक्त करण्यात आले.  अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर यांनी या घटनेला ब्लॅकमेल आणि दहशतवादाची घटना संबोधले होते. अमेरिकेसाठी ही घटना इतकी भयंकर आणि तितकीच अपमानास्पद होती की जिमी कार्टर यांना आपले पद गमावावे लागले. यावेळी इराणमधील सुलतान शाह यांच्यावर अमेरिकेत कर्करोगावर उपचार सुरू होते आणि इराणी क्रांतीच्या बंडखोरांना त्यांचे परत येणे आवश्यक वाटू लागले. कारण आपल्या गुप्तचर पोलिसांच्या मदतीने इराणी लोकांवर अनेक गुन्हे केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. इराणची मागणी अमेरिकेने फेटाळून लावली आणि शाह यांच्या अमेरिकेतील वास्तव्यामुळे बंडखोरांच्या संतापात आणखी भर पडत गेली. यानंतर अमेरिकेशी संबंध असलेल्या इराणमधील अनेक नागरिकांवर बंदी घालण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या अमेरिकन नागरिकांपैकी कुणालाही ठार मारले नसले तरी त्यांना फारशी चांगली वागणूक देण्यात आली नाही. परिणाम असा झाला की अमेरिका आणि इराणमधील संबंध बिघडू लागले. त्यावेळी इराणी बंडखोरांमुळे अमेरिकेत सत्ता बदल झाला़. कारण जिमी कार्टर दुसºयांदा अध्यक्ष होऊ शकले नाहीत़.अमेरिकेला जगातील सर्वात कमकुवत देश असल्याचे सिद्ध करणारे बंडखोर वरचढ ठरत अमेरिकन नागरिकांना बंदी बनवण्यात यशस्वी ठरले. त्यावेळी मुत्सद्दी धोरणाअभावी काहीही होऊ शकले नाही़. म्हणूनच अमेरिका अद्यापही आपल्या ४० वर्षापूर्वीच्या प्रतिस्पर्ध्याचा सूड घेण्याच्या प्रयत्नात आहे, ही बाबही तितकीच अधोरेखित होत असल्याचे दिसून येते. अगदी नव्या वर्षातील ३ तारखेला (३ जानेवारी २०२०) अमेरिकेने इराकमध्ये धडक कारवाई केली, त्यामागे दोन्ही देशांतील चार दशकांपूर्वीचा संघर्ष कारणीभूत असल्याचे म्हणता येईल. त्यामुळेच आता या तणावामुळे पश्चिम आशियातील स्थिती तणावाची बनली आहे.

युद्धास हवा देणारे काही घटक

मागील वर्षीच्या सप्टेंबरपासून आॅस्ट्रेलियातील जंगलात आग लागली असून यात ५० कोटींपेक्षा अधिक प्राण्यांचा, पक्ष्यांचा जळून मृत्यू झाला आहे़ ही आग अचानक लागलेली नव्हती़ कुणीतरी लावलेली वा नैसर्गिकरित्या ती लागल्याने कुरपत कुरपत तिने अवाढव्य रुप धारण केले, असे म्हणता येईल. त्याच धर्तीवर अमेरिकाचा संताप हा एका दिवसाचा वा वर्षाचा नाही, तर त्यामागे तब्बल ४० वर्षांची धग असल्याचे सांगण्यात येते. याला एक प्रकारचा बदला वा सूडही म्हणता येईल.
झैनाबचा इशाराइराणमध्ये इंधन दराविरोधात झालेल्या मोठ्या आंदोलनात ३०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्यावरून सरकारवर आरोप प्रत्यारोप झालेत़ आता मात्र देशातील सर्व राजकीय पक्षांचे नेते सुलेमानी यांच्या ७ डिसेंबर २०२० रोजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते. त्यांची मुलगी झैनाब हिने जमावासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी तिने थेट अमेरिकेवर हल्ला करण्याचा इशारा दिला. पश्चिम आशियात तैनात अमेरिकी सैनिकांच्या कुटुंबियांनी आता त्यांच्या मुलांच्या मृत्यूची वाट पाहत दिवस घालवावेत, असे तिने म्हटले आहे. याचाच अर्थ पुढील काळात इराक वा शेजारच्या देशात असलेल्या अमेरिकन सैन्यांसह दूतावासांवर हल्ला होण्याचे संकेत आहेत.
इराकही झुकला...इराकी संसदेने अमेरिकेचा निषेध करत सध्या इराकमध्ये असलेल्या अमेरिकेच्या सुमारे पाच हजार सैनिकांना माघारी पाठवण्याचा ठराव पारित केला आहे. इराकमधील सरकार इराणच्या बाजूने झुकले असून इराकने आपल्या सैनिकांना माघारी पाठवल्यास इराकवरही निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. मागील दोन चार दिवसांतील भराभर घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इराण अणुबॉम्ब निर्मितीच्या निर्णयाकडे जाऊ शकतो. शिवाय इराकमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांना परत आणण्यात इराणकडून मदत करू शकतो,असेही बोलले जात आहे. त्यामुळे पश्चिम आशियात अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी वर्तवली आहे.


    मॉब नेव्हर क्वॉईट...

    असे म्हटल्या जाते की ‘मॉब नेव्हर क्वॉईट’(अर्थात कोणताही जमाव हा शांत नसतो वा तो शांत राहण्याचा हेतूने गोळा झालेला नसतो.) हीच बाब सोमवारी दिसून आली. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झालेले सुलेमानी यांच्यासह इतरांचे मृतदेह रविवारी इराकमधून प्रथम इराणच्या अहवाज शहरात आणि सोमवारी तेहरानमध्ये आणण्यात आले. सुलेमानी यांना अंतिम निरोप देण्यापूर्वी मुख्य रस्त्यावर हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. यात महिलांची संख्या प्रचंड होती. काळ्या कपड्यातील मोठ्या जमावातून अमेरिकाविरोधात घोषणा देण्यात येत होत्या. म्हणजेच इराणमधील लोकांमध्ये संतप्त भावना दिसून येते, असे म्हणता येईल़ त्यांच्या मनातील हा उद्रेक कोणत्या रुपात बाहेर येईल, याबाबत येणारा काळच उत्तर देईल.

    © संजय इस्तारी मुंदलकर

    Tuesday, 31 December 2019

    विकेंद्रीकरण व्हावेच!


    साधारण: लोकांनी लोकांसाठी आणि लोकांच्या वतीने चालवलेली राज्यप्रणाली म्हणजे ‘लोकशाही’ असे ढोबळमानाने म्हटले जाते. हे जरी खरे असले तरी या लोकशाहीचेही दोन प्रकार असून शकतात़ एक केंद्राधारित आणि दुसरीकडे विकेंद्रित! दुसºया प्रकारच्या लोकशाहीतच विकास दडलेला असतो़ सत्ता कोणत्याही एकाच्या हाती असल्यास तिला हुकुमशाहीचा गंध असू शकतो़ म्हणजे विकास साधावयाचा असल्यास विकेंद्रिकरणाला प्राधान्य दिले जाते़ सत्तेसाठी ही बाब लागू पडत असताना प्रशासकीय कामांसाठीही हाच मंत्र लागू होत असतो़

     कोणत्याही देशाचा कारभार हा विविध यंत्रणा पार पाडत असतात़ साधारणपणे कार्यकारी संस्था, न्यायालयीन संस्था आणि कायदेकारी संस्था अशा तीन यंत्रणांद्वारे देशाचा गाडा हाकण्यात येतो. आता या संस्थांचा संबंध थेट वाहतूक व्यवस्था, एखाद्या शहरात होणारी गर्दी वा नव्या क्षेत्राचा विकास या बाबींशीही येत आहे. कारण या तिन्ही बाबी विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत़ आणि त्यामुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या राज्यात तीन राजधानी असू शकते. या तिन्ही राजधानी स्वतंत्रपणे कार्य करतील. कार्यकारी, न्यायिक व विधानमंडळ अशी तीन वेगवेगळी शहरे राजधानी केली जातील, असे स्पष्ट केले आहे.

       आंध्र प्रदेशाबाबत आम्हाला आणखी काही माहिती करून घेण्यासाठी काही वर्षे मागे जावे लागेल. आंध्र प्रदेशची स्थापना १ नोव्हेंबर १९६६ रोजी झाली. ऐतिहासिकदृष्ट्या हा परिसर आंध्रपथ, आंध्र देस, आंध्रवाणी आणि आंध्र म्हणून ओळखला जात होता. भारताच्या दक्षिण-पूर्व किनाºयावर बसलेले हे राज्य आहे. क्षेत्रफळानुसार भारताचे चौथ्या क्रमांकाचे राज्य आणि लोकसंख्याच्या बाबतीत आठव्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. गुजरातनंतर या राज्याला दुसºया क्रमांकाचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. दरम्यान, फेब्रुवारी २०११ मध्ये भारतीय संसदेने स्वतंत्र तेलंगणा राज्यास मान्यता दिली. आंध्रातून तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली़ तेलंगणात १० तर आंध्र प्रदेशात (सीमांध्र) मधील १३ जिल्हे आहेत. हैदराबाद ही १० वर्षांसाठी दोन राज्यांची संयुक्त राजधानी राहणार आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृह अर्थात लोकसभेत १२ तर राज्यसभेत दोन जागा वाट्याला आल्या आहेत. ६० हजार २०५ किमी क्षेत्रफळ असलेल्या या राज्याची लोकसंख्या ४९, ३८६, ७९९ इतकी असून, प्रतिकिमी घनता ३०८ इतकी आहे. विशाखापट्णम, हैदराबाद ही महत्त्वाची शहरे आहेत. अमरावती ही नवी राजधानी वसवण्यात येत आहे.

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आपल्याकडे तीन वेगवेगळी शहरे राजधानी असू शकतात. तसेच, त्याची गरज आहे. यावर गांभीर्याने विचार करावा लागेल. मुद्याकडे लक्ष देण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. दुसरे असे की आंध्र सरकारने हैदराबाद, विशाखापट्टणम् शहरांची निवड केली आहे. निश्चित या शहरात प्रशासन योग्यरित्या चालवण्यासाठी गरजेच्या इमारती आदी प्राथमिक सुविधा उपलब्ध आहेत़ जमेची बाजू म्हणजे भाजपचे प्रवक्ते तसेच, खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी राज्याच्या विकासासाठी विकेंद्रीकरणाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

    अनेकदा एखाद्या सरकारी संस्थेवरील प्रशासकीय कामांचा भार कमी करण्यासाठी राज्यातील अन्य शहरात त्या संस्थेच्या शाखा निर्माण केल्या जातात़ उदाहरणार्थ, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला ेघोषित केली आहे. याशिवाय मुंबई न्यायालयाची दोन खंडपीठे आहेत़, त्यापैकी एक नागपूर आणि दुसरे औरंगाबादेत आहे. (तिसरे कोल्हापुरात सुरू होण्याची शक्यता आहे.) महाराष्ट्र सरकारने नुकत्याच पार पडलेल्या नागपुरातील अधिवेशनात प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालये (सीएमओ शाखा) सुरू करण्याचा निर्णय घोषित केला आहे़ निश्चित हा एक नवा पायंडा म्हणता येईल. विकेंद्रीकरण हे केवळ प्रशासकीय काम हलके व्हावे, इतकेच अभिपे्रत नसून विकासाचे व्हावे़ विकास हा गावखेड्यातील प्रत्येक चुलीपर्यंत पोहोचायला हवा़़़ मनामनाने त्याचा लाभ घ्यायला हवा, तेव्हाच विकेंद्रीकरणाचा हेतू यशस्वी शंभर आणे साध्य झाला, असे म्हणता येईल़

    याशिवाय मागील काही वर्षात राज्यातील वाहनांची संख्या अतोनात वाढली़ रस्त्यांवर अपघातही होत आहेत. काही मिनिटांपूर्वी आपल्याशी बोललेला कुण्या एकाच्या अपघाती मृत्यूची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. अशा घटनांमुळे अनेक कुटुंब उन्मळून पडली आहेत़ अनेक  मुले आईवडिलांना पोरकी झाली आहेत, होत आहेत. काही शहरांमध्ये सर्व प्रशासकीय कार्यालये एकाच भागात असल्याचे दिसून येते़ त्यामुळे याच भागात कर्मचाºयांसह लोकांची मोठी गर्दी होते़ परिणामी वाहतूक नियंत्रित करणाºया विभागावरील भार वाढतो. प्रदूषणासह अनेक समस्या निर्माण होतात. शहराच्या अन्य भागाला विकासाची संधी मिळत नाही, ही बाबही अधोरेखित होणे गरजेचे आहे.

    संजय मुंदलकर

    Tuesday, 17 December 2019

    परवेझ मुशर्रफांना काळाकडूनच शिक्षा!

    परवेझ मुशर्रफांना काळाकडूनच शिक्षा!

    पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना मंगळवारी (१७ डिसेंबर २०१९) इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने देशद्रोहाच्या आरोपात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याची सुनावणी पेशावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने केली. परवेझ यांनी ३ नोव्हेंंबर २००७ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर डिसेंबर २०१३ मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता, तर ३१ मार्च २०१४ रोजी त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. दरम्यान, मुशर्रफ मार्च २०१६ पासून उपचारांसाठी दुबईमध्ये आहेत. सुरक्षा आणि प्रकृतीचे कारण पुढे ते पाकिस्तानात परतलेले नाहीत. याआधी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने १७ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे जाहीर केले होते. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मुशर्रफ आणि पाकिस्तान सरकारने दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना विशेष न्यायालयाला २८ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यापासून रोखले होते.

    आजारपणाचे कारण...

    मागील आठवड्यात एका विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांना देशद्रोहाप्रकरणी ५ डिसेंबर रोजी जबाब नोंदवण्यास सांगितले होते. मुशर्रफ यांना विशेष न्यायालयासह उच्च न्यायालयाने सुद्धा वेळोवेळी समन्स बजावले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी आजारपणाचे कारण देत त्यांनी पाकिस्तानात येणे टाळले. कारण त्यांना सरकारकडून अटकेची भीती वाटत होती. रुग्णालयातील अंथरुणाशी खिळलेल्या मुशर्रफ यांचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. देशद्रोहाच्या खटल्यात काहीच तथ्य नाहीत. मी आपल्या देशाची नेहमीच सेवा केली आहे. कित्येकवेळा पाकिस्तानसाठी युद्ध लढवले आहेत. १० वर्षांची सेवा दिली असताना आता माझ्याविरोधात भयानक असा खटला चालवण्यात येत आहे. माझे काहीच ऐकून घेतले जात नाही. चौकशी समित्या अवश्य बनवा; परंतु न्यायालयाच्या प्रतिनिधींनी एकदा येऊन माझी प्रकृती पाहावी. माझा जबाब नोंदवावा, त्यानंतरच कारवाई करावी. या चौकशी समितीचे न्यायालयाने ऐकायला हवे. मला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवतो, असे सदर व्हिडिओत म्हटले होते. दरम्यान, पाकिस्तानच्या इतिहासातील असे पहिले प्रकरण आहे की ज्यात एखाद्या माजी लष्करप्रमुखावर देशद्रोहाच्या आरोपात खटला चालवण्यात आला.
    पाकिस्तानमध्ये सैन्य आणि सरकार यांच्यात सुसंवादापेक्षा संघर्ष आणि सत्तापलट हा किस्सा फार जुना आहे. त्याचमुळे त्या देशात लोकशाही, स्थिरता, विरोधी पक्ष आणि स्थिर सरकार यासारखे शब्द क्वचितच ऐकू येतात. १२ आॅक्टोबर १९९९ या दिवशी तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सरकार उलथून टाकून सत्ता हाती घेतली होती़ अगदी बेसावधपणे नवाज यांचा केसाने गळा कापण्यात आला होता. १९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नवाज शरीफ यांनी विजय मिळवला आणि पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. आपल्या सत्ताकाळात त्यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांना लष्करप्रमुख म्हणून नियुक्त केले. मुशर्रफांचा तसा डोळा तर पाकिस्तानची सत्ता बळकावण्याचाच होता. जनरल मुशर्रफ श्रीलंका दौºयावर असताना पंतप्रधान शरीफ यांनी संशयावरून परवेझ यांना पदावरून काढून टाकले आणि त्यांच्या जागी जनरल अजिज यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्त केली. मात्र, नवाज यांनी येथेच चूक केली. त्यांची नवी निवड विश्वासयोग्य नव्हती़ त्यांना समजून आले नाही की जनरल अजिज हे मुळातच परवेझ मुशर्रफ यांचे निष्ठावंत आणि विश्वासू आहेत. या घडामोडीनंतर
    श्रीलंकेहून परत आल्या आल्या जनरल परवेझ मुशर्रफ यांनी अजिज यांच्या मदतीने नवाज शरीफ यांचे सरकार उलथून टाकले. इतकेच नव्हे नवाज शरीफ यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांना अटक करून तुरुंगात पाठवले आणि स्वत: ला लष्करी शासक म्हणून घोषित केले. यानंतर मुशर्रफ यांनी स्वत: ला राष्ट्रपतिपदी नेमून घेतले होते.

    कारगिल युद्धाचे मास्टरमार्इंड

    यंदा २६ जुलै २०१९ रोजी कारगिल युद्धाने दोन दशक म्हणजे वीस वर्षे पूर्ण केली़ पाकिस्तानच्या ‘आॅपरेशन कोह-ए-पैमा’ ला भारतीय जवानांनी ‘आॅपरेशन विजय’ ने उद्धवस्त केले होते. (दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात) मात्र, मे - जुलै १९९९ मधील या युद्धामागे मास्टरमार्इंड म्हणून तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ हेच होते. ही बाब काही वर्षांनंतर नवाज शरीफ यांनी कबूल केली होती. आपणास यातील काहीही माहिती नव्हते, अशी बाजूही यावेळी स्पष्ट केली. मुशर्रफ हे मुळातच अन्य एक लष्करशहा झिया उल हक यांचा वारसा चालवत होते. कारण कारगिल भागात घुसखोरी करण्याची योजना पाकिस्तान लष्कराचे जनरल झिया उल हक यांच्या काळापासून बनवली जात होती; परंतु अफगाण युद्धामध्ये जनरल झिया सोव्हिएत सैन्याच्या विरोधात अडकल्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याने झियाच्या काळात कारगिल हल्ल्याची योजना टाळली होती. बेनझीर भुट्टो पुन्हा सन १९९३ ते १९९६ या काळात सत्तेत असतानाही पाकिस्तान सैन्याने कारगिलमध्ये घुसखोरी करून काश्मीर खोºयापासून लडाख वेगळा करण्याची योजना आखली होती. ही योजना मंजुरीसाठी दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यासमोर ठेवण्यात आली, तेव्हा त्यांनी ती फे टाळून लावली होती. कारगिल युद्धानंतरच पाकिस्तानात राजकीय आणि आर्थिक अस्थिता निर्माण झाल्याचे पाहून आणि नवाज शरीफांनी आपल्याला पदावरून हटवल्याने मुशर्रफांनी त्यांचे सरकार उलथवून लावले होते.

    भारताविरोधी कारवायांची कबुली

    परवेझ मुशर्रफ यांनी मागील नोव्हेंबर महिन्यात एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत काही धक्कादायक गोष्टी कबूल केल्या होत्या. काश्मिरींना काश्मीरमधील भारतीय सैन्याविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. ओसामा बिन लादेन आणि जलालुद्दीन हक्कानीसारखे दहशतवादी पाकिस्तानी सैन्याचे नायक होते, असे मुशर्रफ त्यावेळी म्हणाले होते. आम्ही सोव्हिएतला हाकलून लावण्यासाठी पाकिस्तानच्या बाजूने येथे एक धार्मिक दहशतवाद आणला. जगभरातून मुजाहिदीन आणले, आम्ही तालिबान्यांना प्रशिक्षण दिले़ शस्त्रे दिली आणि त्यांना भारताविरोधात लढावयास पाठवले, असेही खुलेआम सांगितले होते.
    त्यावेळी काळ मुशर्रफांच्या बाजूने होता़ त्यानुसार हाती सत्ता असल्याने त्यांनी लष्करप्रमुखपद, लष्करी शासक म्हणून स्वयंघोषितपद आणि त्यानंतर राष्ट्रपतीपदही उपभोगले. भारताविरोधात युद्धही केले. काळ त्यावेळी त्यांच्या अवतीभवती फिरत होता़ आमा मात्र तो बदलत आहे आणि या काळानेच त्यांना योग्य ती शिक्षा दिली, असे म्हणता येईल़ त्याचवेळी पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाने लष्करीशहांनाही चक्क इशारा दिला आहे. कारण विद्यमान पंतप्रधान इमरान खान यांच्यावर सुद्धा लष्कर दबाव टाकत असल्याची टीका काही दिवसांपूर्वी विरोधीपक्षांनी केली होती़ आता लष्कराच्या मदतीने देशातील लोकशाहीची गळचेपी करून घटनाविरोधात काम करणाºयांना हज्जारदा विचार करावा लागेल.

    © संजय इस्तारी मुंदलकर      




    Friday, 13 December 2019

    शिक्षण नोकरीसाठीच घ्यायचे का ?


    आयुष्यात दहावी, बारावी उत्तीर्ण व्हायचे़ मग कुठल्यातरी शाखेत पदविका, पदवी, कुणी  त्याच्या जोडीला पीएच़डी़ , एम़फिल  वा तत्सम शिक्षण घेतलेले दिसून येतात़ पण या शिक्षणाचा उपयोग केवळ चांगल्या पगाराची नोकरीच मिळवण्यासाठी करायची, इतर काही ही करावयाचे नाही, ही मानसिकता  मागील कित्येक वर्षांंपासून येथील समाजाच्या मानगुटीवर बसलेली आहे. शिक्षण  हे केवळ  आणि केवळ  नोकरीसाठी आणि त्यानंतर लग्नासाठी ़ नोकरी असल्यावरच  लग्न करावयाचे वा नोकरी लागता क्षणीच लग्नाच्या बोहल्यावर चढायाचे, या दोन्ही बाबी समाजाला हानीकारक ठरल्या़ दुर्दैव असे की  एका एकसंघ, निकोप समाजाच्या निर्मितीसाठीही त्याकडे  लक्ष देण्यात आले नाही़


    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    एक जमाना असाही होता की व्यक्तिची पात्रता आणि प्रभाव त्याने घेतलेल्या पदव्या, त्याचे एकूण शिक्षण याभोवती फिरत असे. डॉक्टरचे शिक्षण त्याला डॉक्टर आणि इंजिनीअरिंगच्या शिक्षणामुळे तो अभियंता ंं(इंजिनीअर) बनत असे. अन्य शिक्षणातील पदव्यांबाबत असेच काहीसे होते. मात्र, आता काळाने कुस बदलली आहे. सध्याच्या घडीला शिक्षणातील पदव्या आणि त्या माध्यमातून मिळणारा रोजगार किंवा नोकरी याचा  काहीही  संबंध राहिलेला नाही, असे दिसून येते. आपल्या आयुष्यात डॉक्टर, इंजिनीअर बनून मोठ्या रकमेच्या नोकरीची आस ठेवणारे तरुण आता कोणत्याही अगदी कोणत्याही म्हणजे कारकून (क्लर्क), शिपायासारख्या नोकरीसाठी अर्ज करत आहेत, केलेले आहेत किंवा तशी नोकरीही मिळवलेली आहे. दहावी, बारावीत चांगल्या शाळा महाविद्यालयात शिक्षण, सोबतीला महागडे शिकवणीवर्ग (कोचिंग क्लासेस), त्यानंतर नीट किंवा तत्सम प्रवेश परीक्षा देऊन चांगल्या मेडिकल, इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश़़़ तीन ते चार वर्षांपर्यंत शिक्षण घेऊन पदवी मिळवणे. आता  इतक्या  वर्षांत  झालेला  खर्च, सोबत आईवडिलांनी त्यासाठी केलेली  धावपळ, आईने  आपल्या  मुलांच्या अभ्यासासाठी केलेले जागरण असो वा  पतीच्या कमाईला हातभार म्हणून केलेली लहान मोठी नोकरी या सर्व बाबी एका बाजूला आणि दुसºया बाजूला आतापर्यंतच्या स्वप्नापासून  एकदम  झिडकावून  टाकत हाती आलेली शिपाई वा क्लार्कची नोकरी़़़किती  विसंगत!  दोष कुणाला  द्यावा?  नशिब, तो स्वत:, समाज, आईवडिल, शैक्षणिक संस्था, नोकरी देणारे की शासनव्यवस्था...यापैकी कोण स्वीकारणार आपली चूक़़़़नक्कीच या सात घटकांपैकी कुणीही नाही. असे म्हणतात की घडवून घेणारा आणि घडवणारा यापैकी आपली चूक मान्य करणारच नाही. कारण परिस्थिती हातातून  कधीच  निसटून गेली आहे. म्हणून पदवीधर,पदव्युत्तर (यात कला शाखेपासून व्यवस्थापनापर्यंतचे सर्व), कायदा, अभियांत्रिकी,वैद्यकीय क्षेत्रातील बेरोजगारांना इयत्ता आठवी  किंवा  १० वी  उत्तीर्ण सरकारी नोकरीसाठी अर्ज करावे लागत आहे.

    मागील दिवसांत गुजरात हायकोर्ट आणि त्याच्या अंतर्गत येणाºया न्यायालयातील  शिपाईसह अन्य काही पदांसाठी (वर्ग ४) एकूण १,१४९ पदांसाठी जाहिरात  प्रकाशित  करण्यात आली़ यासाठी १ लाख ५९ हजार २७८ उमेदवारांनी अर्ज सादर केले़ आश्चर्य म्हणजे यापैकी ४४ हजार ९५८ उमेदवार हे पदवीधर आहेत. परीक्षा आणि मुलाखत आदी प्रक्रिया आटोपल्यानंतर सात डॉक्टर्स अ६६ाणि सुमारे ४५० इंजिनीअरिंग, ५४३ पदवीधर तरुणांनी शिपायाची नोकरी ‘कबूल’ केली आहे. आता त्यांना मासिक ३० हजार रुपये  वेतन मिळेल. एकीकडे  अशा  गोष्टी  मनात  कुतुहल निर्माण करतात़ मात्र, त्याचवेळी  देशाची विद्यमान अर्थव्यवस्थेची दशा डोळ्यांसमोर उभी राहते.
    काही वर्षांपूर्वी पोलिस भरतीच्या निमित्ताने राज्यभर फिरणारी काही  मंडळी दिसून येत होती. कोणत्या तरी जिल्ह्यात आपण  पात्र ठरू अशी त्यामागे भावना. नंतर मात्र प्रत्येक जिल्हास्तरावर ही भरती आयोजित करण्यात आली. त्यामुळे एखाद्या जिल्ह्यावरील भार कमी झाला असला तरी काहींच्या समोर आता नवे संकट उभे   झाले आहे़ कारण   पोलिस भरतीसाठी साधारणत: इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम  अपेक्षित असतो. मात्र, पोलिस भरतीसाठी चक्क उच्च तंत्रशिक्षणातील पदविका आणि पदवीधारक उमेदवारांनी हजेरी लावल्याचे दिसून आले होते. अगदी एमबीबीएस, बी.टेक, बी.ई. एम. एस्सी, एमबीएपर्यंतच्या उमेदवारांचा यात भरणा होता. देशातील बेरोजगारीची प्रचंड दाहकता येथेच दिसून आली.

    मुळातच अशी स्थिती का निर्माण व्हावी? ती कुणीही नियोजितपणे केलेली असावी, असेही नाही;परंतु तशी परिस्थिती निर्माण मात्र काही मूठभर लोकांनीच निर्माण केली, याकडे डोळेझाक करता येणार नाही. कोणे एके काळी बी़पी़ एड़, डी़एड़, आयटीआय, बी़एड, इंजिनीअरिंग, पाँलिटेक्निच्या शिक्षणाचे फँड आणलेले होते, ते आलेले नव्हते़ कुणा शिक्षण संस्थांच्या मालकांच्या फायद्यासाठी हा सगळा रचलेला डाव होता. मग ही वरील अभ्यासक्रमांच्या किती उमेदवारांना  त्या शिक्षणाच्या आधारे नोकरी मिळाली, याबाबतचे सर्वेक्षण केले तर मोठी निराशा लागण्याची शक्यता आहे.

    विदर्भातील बी़पी़ एड़ महाविद्यालयातून पदवी घेण्यासाठी अगदी जम्मू काश्मिरातील तरुण तरुणी आल्याचे पाहण्यात आले आहेत़ धक्कादायक म्हणजे यात गर्भवती विद्यार्थिनीचा समावेश होता. म्हणजे पोटात गर्भ असताना तिने खरोखरच शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिक पूर्ण असेल का?  हा  मोठा प्रश्न त्यावेळी  निर्माण  झाला होता. काही वर्षानंतर त्याची क्रेझ उतरली़ नंतर पाँलिटेक्निक सुरू झाले़ यातही चढता-उतरता क्रम दिसून आला. डी़एड़, आयटीआय, बी़एड, इंजिनीअरिंगबाबत तेच झाले. या शिक्षणसंस्थांनी अक्षरश: उत्तीर्ण विद्यार्थी पैदा  केले़ पैसा खर्च करून पदवी घेतलेल्या या उमेदवारांच्या नोकरीसाठी प्रयत्न केले नाही. मोठी बेकारी निर्माण झाली असताना काहींनी ‘कँम्पस् सिलेक्शन’चा प्रयोग सुरू झाला़ सन १९९१ मधील उदार आर्थिक नितीमुळे देशात नव्या उद्योगांना उभारी मिळाली़ अशातच ‘कँम्पस् सिलेक्शन’द्वारे तज्ज्ञमंडळी उद्योगक्षेत्रात आली. आता मात्र त्यास ओहोटी लागल्याचे दिसून येते. अभियांत्रिकीकडे वळणारी पावले आता एम.बी. ए. च्या दिशेने आहेत़ मोबाईल क्षेत्रातील क्रांती ही महत्त्वाची ठरली आहे.असे असले तरी बेरोजगारीचा ठसा उमटून दिसत आहे.

    अभियांत्रिकी, वैद्यकीय, एमबीए अशा असंख्य महाविद्यालयांची केलेली पेरणी...मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक ही महानगरे तर सोडा, तालुक्याच्या ठिकाणीही अभियांत्रिकीचे शिक्षण उपलब्ध झाले. अवाढव्य स्वरुपाच्या इमारती आणि त्याच्या वसुलीसाठी व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांकडून या ना त्या कारणाने केलेली लूट.  दुसरीकडे  लाखो रुपये खर्च करूनही हाताला न मिळणारा रोजगार यामुळे हताश झालेला तरुण लहानमोठ्या नोकरीकडे वळतो आहे, हे मान्य करावेच लागते.

    भारत... तंत्रज्ञानाला हाताशी धरून जागतिक महासत्तेच्या स्पर्धेत आगेकूच करणारा प्रमुख दावेदार असला तरी तंत्रज्ञानाशी केलेली  दोस्ती भविष्यात घातक तर ठरणार नाही ना, अशी भीतीही आता डोकं वर काढू लागली आहे. भारताच्या आयटी क्षेत्रावर अवलंबून असणाºया लाखो कर्मचाºयांपैकी  अनेकांना त्यांच्या कौशल्यात आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत;अन्यथा बेरोजगारीचे संकट आहेच! यात आशेचा किरण म्हणजे,‘आर्टिफिशअल इंटेलिजन्स’ रोजगाराच्या संधीही  उपलब्ध  करू शकणार आहे. किती प्रमाणात आणि त्याला पात्र कोण, हे मात्र अनुत्तरित आहे. बेरोजगारीची धग अद्यापही अनेकांना चांगलीच शेकून काढत आहे, इतके मात्र नक्की!

    © संजय इस्तारी मुंदलकर

    Thursday, 10 October 2019

    गजरा ना सुकला अजुनी


                                                     

                                                        दिल्या घावांना फुंकारून राखतो कुरवाळतो मी

        त्या वळणावरी ठेविल्या जखमा कित्येक मी 

       टाक पाऊल माघारी गजरा ना सुकला अजुनी

    तुझ्याच मिलनी रोखला राखला श्वास मी 



    संजय मुंदलकर

    (सर्वाधिकार सुरक्षित)